Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Joined February 2013
11,814 Photos and videos
'Guess कर मुंबईकर!' मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे,’जागतिक रक्तदान दिन’🩸 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात, रक्तपेढीत रक्तदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे. आपल्या मुंबईच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या प्रश्नासोबत ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल #ShaniwarchaSawal #SaturdayQuiz #माझीमुंबई #बृहन्मुंबईमहानगरपालिका #health #WorldBloodDonorDay #DonateBlood #blooddonation #SaveLives #PublicHealth #जागतिकरक्तदानदिन #रक्तदान
1
13
20
2,780
आधुनिक, तंत्रज्ञान आधारित शिक्षण देताना ते संस्कारमय देखील असावे - पालकमंत्री श्री. आशिष शेलार सुजाण आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न - महापौर श्रीमती रितू तावडे शासन, पालकमंत्री आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने कोंडिविटा शाळा जलदगतीने पूर्ण - आमदार श्री. मुरजी पटेल अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा सीबीएसई नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण संपन्न 🔷मुंबई महानगर हे सर्वसामान्यांच्या स्वप्नाला आकार देणारं शहर आहे. सर्वसामान्य घटकातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्नं साकार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची शिक्षण व्यवस्था उत्तम सुविधा पुरवत आहे. आधुनिक आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण पुरवताना ते संस्कार मध्ये देखील असावे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे उद्गार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांनी काढले. 🔷अंधेरी (पूर्व) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या, के दक्षिण विभाग अंतर्गत कोंडिविटा सीबीएसई नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण आज (दिनांक १३ जून २०२६) सायंकाळी करण्यात आले, त्यावेळी श्री. शेलार हे बोलत होते. 🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. आमदार श्री. मुरजी पटेल, के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मुसळे, नगरसेविका श्रीमती केशरबेन पटेल, नगरसेविका श्रीमती ममता यादव, नगरसेविका श्रीमती दिशा यादव, नगरसेविका श्रीमती अंजली सामंत, नगरसेवक श्री. रितेश राय, माजी नगरसेवक श्री. कमलेश राय, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन कीरतकुडवे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, पालक आणि नागरिक या सोहळ्यात उपस्थित होते. 🔷पालकमंत्री श्री. आशिष शेलार म्हणाले की, ज्या ठिकाणी आज ही भव्य शाळा आकारास आली आहे, तिथे काही वर्षांपूर्वी पडीक जागा होती. आमदार श्री. मुरजी पटेल यांनी सतत पाठपुरावा केला आणि महानगरपालिका प्रशासनाने सहकार्य केले, त्यामुळे या जागेवर नवीन शालेय इमारत उभी राहिली आहे. या शाळेमध्ये चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे समाधान आहे. 🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, कोंडिविटा शाळेची सात मजली इमारत अवघ्या दोन वर्षांच्या आत साकारली. सामान्य वस्तीतून आणि कष्टकरी वर्गातून येणारी मुले आता कॉर्पोरेट सारख्या देखण्या, सर्व सुविधायुक्त शालेय इमारतीमध्ये शिकतील, याचा एक महापौर म्हणून नव्हे तर एक आई म्हणून खूप अभिमान आहे. कोंडिविटा गाव, लहुजी साळवे नगर, विजयनगर, साईबाबा नगर आणि मरोळ पाईपलाईन वसाहतीसह आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या सीबीएसई शाळेचा मोठा फायदा होणार आहे. ही मुलं आधुनिक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं साकार करू शकतील. होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल. पैशांअभावी या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची स्वप्ने अपूर्ण राहणार नाहीत, ही गॅरंटीच जणू या शाळेच्या माध्यमातून मिळाली आहे. म्हणूनच या शाळेत आत्तापर्यंत ३०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला आहे, असे महापौर श्रीमती तावडे यांनी नमूद केले. 🔷आमदार श्री. मुरजी पटेल म्हणाले की, पालकमंत्री श्री. आशिष शेलार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्यामुळे अल्पावधीत या ठिकाणी शाळा मंजूर होऊन इमारत उभी झाली. परिणामी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना अतिशय चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली आहे. फक्त शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकास घडवणाऱ्या सुविधा या ठिकाणी आहेत, असे श्री. पटेल यांनी नमूद केले. 🔷प्रास्ताविक करताना उपायुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी या नवीन शाळेविषयी सविस्तर माहिती दिली. यंदापासून या शाळेत सीबीएसई संलग्न अभ्यासक्रम सुरू होत आहेत. तळमजला अधिक सहा मजले असे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये ३५ वर्ग खोल्या आहेत. तर प्रत्येक मजल्यावर मुख्याध्यापकांकरिता कार्यालय कक्ष आहे. एक संगणक कक्ष, एक वाचनालय, एक प्रयोगशाळा, एक व्हर्च्युअल क्लासरूम, एक डिजिटल क्लासरूम, एक सभागृह, एक शालेय पोषण आहार वितरण कक्ष, दोन लिफ्ट, वाहनतळ अशा परिपूर्ण सुविधा असलेल्या या इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाले आणि दोन वर्षात पूर्ण झाले, अशी माहिती डॉ. जांभेकर यांनी दिली. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @MurjiPatel_
6
16
29
3,308
अंधेरी आणि मिलन भुयारी मार्ग तसेच गांधी मार्केट आणि हिंदमाता येथील लघू उदंचन केंद्रांची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी 🔷पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्याचा एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक १२ जून २०२६) अंधेरी भुयारी मार्ग, मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट आणि हिंदमाता लघू उदंचन केंद्र या चारही ठिकाणी भेटी देवून स्थळ पाहणी केली. 🔷यावेळी आमदार श्री. मुरजी पटेल, के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मुसळे, एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मानसी सातमकर, नगरसेविका श्रीमती ममता यादव, नगरसेविका श्रीमती दिशा यादव तसेच उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) श्री. रमाकांत मोरे, सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगुले यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते. 🔷अंधेरी भुयारी मार्ग येथील पाहणीवेळी आमदार श्री. मुरजी पाटील म्हणाले की, हा परिसर अतिसखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या नित्याची आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिवेशनात देखील सातत्याने विषय मांडला आहे, असे श्री. पटेल यांनी नमूद केले. 🔷संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळ्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काही उपाययोजना विचाराधीन आहेत. त्यातील व्यवहार्य आणि संभाव्य उपाययोजना अमलात आणता येऊ शकते. 🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी लवकरच महापौर दालनात संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी अतिरिक्त उदंचन संच लावावेत, जेणेकरून पावसाळी पाण्याचा उपसा जलदगतीने करता येईल, असे महापौरांनी नमूद केले. 🔷मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट तसेच हिंदमाता येथील लघु उदंचन केंद्र आणि पावसाळी पाणी साठवण टाकी प्रकल्पाची महापौरांनी पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. संपूर्ण पावसाळ्यात यंत्रणा सुस्थितीत कार्यरत राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. 🔷दरम्यान, या तिन्ही ठिकाणी स्थानिक नागरिकांशी देखील महापौरांनी संवाद साधला आणि त्यांच्या सूचना तसेच मुद्दे जाणून घेतले. 🔷दौऱ्याच्या अखेरीस, हिंदमाता उड्डाणपुलाखालील स्केट पार्कची सखोल स्वच्छता, दुरुस्ती व रंगरंगोटी कामाची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पाहणी केली. ही कामे लवकर पूर्ण करून, स्केट पार्क पूर्ववत करून खेळाडूंना लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @MurjiPatel_
8
19
57
5,230
वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेला कोणता राष्ट्रीय दिवस १४ जून रोजी असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 'कमेंट बॉक्स'मध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल #ShaniwarchaSawal #SaturdayQuiz #माझीमुंबई #बृहन्मुंबईमहानगरपालिका #health
8
16
15
3,212
🌊मोठया भरतीच्या दिवशी व भरती कालावधी दरम्यान नागरिकांनी समुद्र किनाऱ्याजवळ जावू नये. तसेच याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. #MyBMCUpdates
4
36
68
8,315
🔹मुंबई महानगरात सुरू असलेल्‍या १० टक्‍के पाणी कपातीच्‍या अंमलबजावणीचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज आढावा घेतला. त्‍यात पाणी व्यवस्थापन, पाणीचोरी व पाणीगळती रोखणे, अधिकृत जलजोडींना प्रोत्साहन देणे आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करणे यांचा समावेश आहे. 🔹मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्यात घट झाल्याने १५ मे २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या १० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी सर्व भागांत समसमान पद्धतीने करावी. टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग अथवा संवेदनशील क्षेत्रांमध्ये अधिक तुटवडा जाणवल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत जल अभियंता विभागातील संबंधित अभियंता / अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधावा आणि प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. 🔹जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांच्या बदलासह जलवाहिनी सक्षमीकरणाची (Augmentation) कामे पावसाळ्यानंतर हाती घ्‍यावीत. त्‍यासाठी आवश्यक नियोजन, मंजुरी व निविदा प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करावी. संबंधित कामांचे कार्यादेश दिनांक १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत निर्गमित करून दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात यावी. तसेच, नवीन जलवाहिन्या विनाविलंब भारित (Charge) कराव्‍यात, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले. 🔹मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत आहे. 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत टाळावा. तसेच, विशेषतः मोठ्या गृहनिर्माण संस्था व निवासी संकुलांनी आपल्या परिसरात पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा दुराग्रह करू नये. त्‍याऐवजी व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री.अभिजीत बांगर यांनी केले. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
15
22
40
4,716
कीटकनाशक फवारणी म्हणजे आजारांना रोखणारा प्रतिबंधात्मक उपाय. शहराच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहचणार्‍या कीटकनाशक विभागाच्या यंत्रणेला सलाम! 🫡 #MyBMCUpdates #RangMajhaVegla #Mumbai #रंगमाझावेगळा
3
17
22
2,795
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू तारांगण येथे मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत आज बैठक व गुणगौरव समारंभ पार पडला. गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. 🔹मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, शिक्षण समिती सदस्य श्रीमती वर्षा टेंबुलकर, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक श्री. निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. 🔹यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत 'सायन्स सोमवार' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @RajeshreeAtWork
3
20
28
2,841
A large tree fell on the Nature Trail at Malabar Hill earlier today. Fortunately, no injuries or casualties were reported in the incident. Garden Department and the Hydraulic Engineer's Department immediately reached the site and commenced the work of removing the fallen tree. For the public safety, Nature Trail has been temporarily closed to visitors until urgent repair works and safety inspections are completed. Citizens are requested to extend their co-operation. #mybmcupdates
8
36
65
10,234
मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गावर (Nature Trail) मोठे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान आणि जल अभियंता विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निसर्ग उन्नत मार्गावरील तातडीची दुरुस्ती आणि सुरक्षितता तपासणी पूर्ण होईपर्यंत हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती. #mybmcupdates
3
30
29
5,414
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी CNN News-18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील विविध विकास कामे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide @CNNnews18
15
19
56
8,377
🔹माननीय उच्‍च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगरातील नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटपाची कार्यवाही दिनांक १ जून २०२६ पासून महानगरपालिकेच्‍या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) सुरू झाली आहे. एकूण ९९ हजार ४३५ पैकी २० हजार नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 🔹उर्वरित नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांनी दिनांक २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करावी. तसेच, क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्राप्‍त करून घ्‍यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. #MyBMCUpdates
12
29
48
6,100
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज घेतली.  🔷मुंबई महानगरातील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची (Recharge) व्यवस्था उभारावी. पावसाळ्यादरम्‍यानदेखील नाले स्‍वच्‍छतेची कार्यवाही सुरू ठेवावी. रस्‍त्‍यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्‍यावर राडारोडा, इतर साहित्‍य,रस्‍तेरोधक (बॅरिकेड्स) तातडीने हटवावेत. अपघातप्रवण (Black Spot) ठिकाणी आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा कराव्‍यात. शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔷कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. महानगरपालिका सेवांमध्येही ए.आय. चा वापर करून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्याव्‍यात. तसेच, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पाणीपुरवठा, तक्रार निवारण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ए.आय. आधारित प्रणालीचा उपयोग करावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.  🔷विद्यार्थ्यांमध्ये नागरिक भान (Civic Sense) विकसित होणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिका प्रशासनाची कार्यपद्धती, दैनंदिन पाणीपुरवठा - पाण्‍याचा वापर, कचरा संकलन व विल्‍हेवाट, उदंचन प्रक्रिया, अग्निशमन यंत्रणांची माहिती विद्यार्थ्‍यांना दिली पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने स्‍वत:ची मार्गदर्शन / व्‍यवसाय पुस्तिका काढावी, अशी महत्‍त्‍वपूर्ण सूचना श्रीमती भिडे यांनी केली.  🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्‍त (वाहतूक) श्री. सत्‍य नारायण चौधरी, उपायुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
23
27
94
9,118
उद्यानांच्या माध्यमातून मन प्रसन्न करण्यासाठी असंख्य हात राबतात, तेव्हाच फुलणारी, बहरणारी सुंदर बाग साकारणे शक्य होते. उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी उद्यान विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे अविरत असे योगदान आहे. चला, एक जबाबदार मुंबईकर म्हणून आपणही या उद्यानांमध्ये कचरा न करता, झाडांना हानी न पोहोचवता त्यांच्या कष्टाचा आदर करूया!🙏 आपली मुंबई, आपली उद्याने, आपली जबाबदारी! 🌳 #MyBMCUpdates #RangMajhaVegla #Mumbai #रंगमाझावेगळा
4
12
28
4,193
बृहन्मुंबई क्षेत्रातील नालेस्वच्छतेचा दैनंदिन प्रगती अहवाल – दिनांक १० जून २०२६ पर्यंत #MyBMCUpdates
9
15
32
4,373
सेवा क्षेत्रासाठी (Service Area) अनिवार्य मोकळ्या जागेचा (Compulsory Open Space) वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ही कारवाई करण्यात येत आहे. या निर्देशानुसार के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच, वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (दिनांक ९ जून २०२६) ही कारवाई केली. आरोग्य विभाग (MOH), अनुज्ञाप्ती विभाग (license), अग्निशमन विभाग (Fire) व बांधकाम व कारखाना विभाग (B&F) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोड व ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील What’s Your Bahana, Trov9, Juliet आणि Yazu या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, ३ कूलर्स, १ इलेक्ट्रिक फ्रायर व २ स्पीकर्स जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
103
101
457
64,653
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, हवा प्रदूषण, धूळ प्रदूषण, कचरा जाळणे तसेच पर्यावरणाशी संबंधित कोणतीही तक्रार दूरध्वनी क्रमांक १९१६ किंवा MARG (Management and Redressal of Grievance) प्रणालीद्वारे नोंदवावी. #MyBMCUpdates
15
32
47
5,028
🔷मुंबईच्या पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) जवळील छोटी चौपाटी येथे तांत्रिक इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. या तांत्रिक इमारतीसाठी आवश्यक जागेची पाहणी करण्यासाठी उच्चाधिकार समितीने (High Power Committee) स्वराज्य भूमी परिसराला आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. 🔷मफतलाल जलतरण तलाव येथील बास्केटबॉल मैदानाच्या ठिकाणी सदर इमारत बांधण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) पडताळणी करून त्याबाबतचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेला सादर करावा, असे निर्देश डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. 🔷यावेळी स्थळ पाहणी दौऱ्यात डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी (मुंबई शहर) श्रीमती आंचल गोयल, उच्चाधिकार समितीच्या सदस्या श्रीमती इंद्रायणी मलकानी, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. संतोष साळुंके, मत्स्य विभागाचे अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
6
17
58
7,144
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश 🔷गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तथापि, काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत. 🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ९ जून २०२६) सायंकाळी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. 🔷स्थानिक नगरसेवक श्री. संदीप पटेल, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 🔷महापौर श्रीमती तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली. 🔷संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली. 🔷सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तथापि लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
83
26
105
18,552
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत मेघवाडी, लालबाग, परळ परिसरातील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील ७ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. या एकूण भूखंडाचे क्षेत्रफळ ७ हजार ८७२.१४ चौरस मीटर इतके आहे. पैकी सुमारे २७४ चौरस मीटर क्षेत्रफळावर १३ रिक्त भूखंडधारक भाडेकरू वास्तव्यास होते. हा भूखंड मोकळा करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या कारवाईमुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल. उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
26
75
338
29,778