This is the official twitter handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

Joined October 2015
2,432 Photos and videos
समृद्धी महामार्ग होणार अधिक हरित! 🌱 समृद्धी महामार्गाच्या हरितीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मा. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि. यांच्यात समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापक वृक्षारोपण व हरितीकरणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाला बळ मिळणार असून समृद्धी महामार्ग अधिक हिरवागार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. #HaritMaharashtra #SocialForestry #SamruddhiMahamarg #TreePlantation #GreenMaharashtra #ForestDepartmentMaharashtra
3
88
हरित नंदुरबार उपक्रमांतर्गत अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या हस्ते वृक्षारोपण #हरितनंदुरबार #Nandurbar #GreenNandurbar #TreePlantation #MaharashtraGovernment #MajhiVasundhara #माझीवसुंधरा #वृक्षारोपण #नंदुरबार
3
97
"हरित नंदुरबार" उपक्रमांतर्गत सर्किट हाऊस मुख्य मार्गावर महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा. श्री. विकास खारगे, जिल्हाधिकारी मा. डॉ. मिताली सेठी व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. #हरितनंदुरबार #Nandurbar #GreenNandurbar #TreePlantation #MaharashtraGovernment #MajhiVasundhara #माझीवसुंधरा #वृक्षारोपण #नंदुरबार
1
3
118
सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर ​शेतकऱ्यांना जाहीर आवाहन: ठोंबरा (सामाजिक वनीकरण परिक्षेत्र उमरेड) रोपवाटिकेमधून सवलतीच्या दरात बांबूची रोपे उपलब्ध! ​सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे सूचित करण्यात येते की, 'वन महोत्सव' कालावधी येत्या १५ जूनपासून सुरू होत आहे. या सुवर्णसंधीचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत असलेल्या ठोंबरा रोपवाटिकेमध्ये उच्च दर्जाची बालकोवा (Bambusa balcooa) आणि टुलडा (Bambusa tulda) या बांबूच्या प्रजातींची रोपे अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ​ही रोपे मिळवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संबंधित अधिकारी/कर्मचारी वर्गाशी त्वरित संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक: 1. श्री. दीपक बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण उमरेड ९७६४८४८६९५ 2. श्री. बालाजी टिपराळे, वनरक्षक ९७६५३४२०२० ​बांबूची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन ही उत्तम दर्जाची बांबूची रोपे आपल्या शेतात तसेच शेताच्या बांधांवर नक्की लावावीत. यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि भविष्यात उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार होईल. त्याकरिता आपण वरील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून आपला शेताचा ७/१२ उतारा सादर करावा व ठोंबरा रोपवाटिका येथून सदर बांबू रोपे शासकीय दरात प्राप्त करून घ्यावीत. ​सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे अवाहन करण्यात येत आहे. - नंदकिशोर राऊत, सामाजिक वनीकरण विभाग,नागपूर. #वनमहोत्सव #सामाजिक_वनीकरण #बांबूशेती #बालकोवा #टुलडा #बांबू_लागवड
1
2
5
89
सह्याद्रीत काजव्यांची दीपमाळ; भीमाशंकर परिसरात पाहायला मिळतोय अद्भुत नजराणा #भीमाशंकर #सह्याद्री #काजवे #Bhimashankar #Sahyadri #WesternGhats #Fireflies
1
1
7
126
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाणे प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🌳 यानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तथा मा. वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त श्री. गजेंद्र हिरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवास परिसरातील “सजिरी उद्यान” येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध शाळांमधील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक, महिला बचत गट सदस्य आणि नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 🌿 नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी केंद्र, न्यायालय परिसर, रोपवाटिका तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. 🌾 यासोबतच सिसम, कांचन, आवळा, अंजन, कुसुम, बेहडा, बेल, खैर, बाभूळ, मोहगणी आणि महारुख यांसारख्या विविध वनवृक्षांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अक्कलकुवा येथे बेहडा बियाण्यांपासून सीड बॉल निर्मिती उपक्रम राबवून भविष्यातील हरित संवर्धनासाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आला. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या या उपक्रमांमुळे पर्यावरण, वनसंपदा आणि जैवविविधता संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण झाली. #WorldEnvironmentDay #EkPedMaaKeNaam #SocialForestry #GreenNandurbar #EnvironmentProtection #TreePlantation #Biodiversity #Nandurbar #DrMittaliSethi #SaveEnvironment #GoGreen #जागतिकपर्यावरणदिन #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #सामाजिकवनीकरण #हरितनंदुरबार #एकपेडमाँकेनाम #जैवविविधता #नंदुरबार
1
79
As part of SwachhataPakhwada2026, the Maharashtra State Biodiversity Board organized a Drawing Competition at Van Bhavan, Nagpur on the theme "Clean India of My Dream." Forest Department officers and staff beautifully expressed their vision of a clean, green, healthy and sustainable India through inspiring artwork highlighting cleanliness, biodiversity conservation, waste management and environmental responsibility. Congratulations to all the winners and participants for their enthusiastic contribution towards spreading the message of environmental stewardship and the spirit of SwachhBharat. #SwachhataPakhwada #SwachhataPakhwada2026 #SwachhBharat #CleanIndiaOfMyDream #MaharashtraForestDepartment #CleanAndGreenIndia #GreenIndia #DrawingCompetition
93
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकृत रोपवाटिका कोडोली सातारा व शिरवळ रोपवाटिका खंडाळा येथे वृक्ष लागवड व सीड बॉल बनविण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्थानिक बियांचे ओळख करुन देत प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच विद्यार्थी सहभागातून वृक्षारोपणाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. #जागतिकपर्यावरणदिन #वृक्षलागवड #SeedBalls #सीडबॉल
2
113
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झिरो माईल, नागपूर येथे ग्रीन राइड सायक्लोथॉनचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर यांच्यामार्फत करण्यात आले या सायकल रॅलीमध्ये २७५ सायकलस्वार सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये सायकलिंगची संस्कृती रुजवणे तसेच पर्यावरण संवर्धन, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांमध्ये सायकल चालवण्याची संस्कृती रुजावी आणि आपल्या वसुंधरेचे रक्षण व्हावे, यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने या पर्यावरणपूरक मोहिमेचे पाऊल उचलले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री एन.आर. राऊत, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, नागपूर यांनी केले. श्री. विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविल्यावर गाडीची सुरुवात करण्यात आली. रॅली झिरो माईल- महाराजबाग- दिक्षाभुमी-अंबाझरी- फुटाळा तलाव- विधान भवन मार्गे “ निसर्ग वाचला तरच जिवन फुलेल”, “स्वच्छ पर्यावरण-निरोगी जीवन” अशा प्रकारचे चित्र सायकलवर लाऊन व पर्यावरणाविषयी घोषणा देत झिरो माईल येथे पोहचले. सदर रॅलीमध्ये नागपूरच्या नागरिकांनी, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विशेषतः तरुणांनी या हरित मोहिमेत मोठ्या संख्येने लहान मुलांपासुन ते ८६ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सहभागी सायकलस्वारांना वनीकरण विभागातर्फे प्रमाणपत्र, पारितोषिके प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी विभागीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी करणाऱ्या मोबाईल LED व्हॅनचे उद्घाटन श्री. विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. #WorldEnvironmentDay #GreenRideCyclothon
79
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मोबाईल LED व्हॅनचा उद्घाटन सोहळा मुंबई येथे मा. वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून तर नागपूर येथे नागपूर येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. विवेक खांडेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. नागपूर येथील नवीन प्रशासकीय इमारत, वन भवन येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला असून त्याची क्षणचित्रे #३००कोटीवृक्षलागवड #वनमहोत्सव२०२६ #महाराष्ट्रवनविभाग #जागतिकपर्यावरणदिन #वृक्षसंवर्धन #MahaForest
2
87
पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागामार्फत राज्यव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथून विधान परिषदेचे गटनेते श्री. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच मा.मंत्री वने श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. मोबाईल LED व्हॅन आणि पथनाट्याच्या माध्यमातून वन विभागाच्या विविध योजना, उपक्रम तसेच आगामी वनमहोत्सव आणि ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाची प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे. #३००कोटीवृक्षलागवड #वनमहोत्सव२०२६ #महाराष्ट्रवनविभाग #जागतिकपर्यावरणदिन #वृक्षसंवर्धन #MahaForest
3
70
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाव्दारे दिनांक २२ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाद्वारे जागतिक जैवविविधता दिन हरीसिंग सभागृह नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी श्री. एम. श्रीनिवास राव, भावसे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. जी. गुरुप्रसाद, भावसे, वनसंरक्षक (प्रादे) नागपूर, डॉ. विनिता व्यास, भावसे, उपवनसंरक्षक (प्रादे) नागपूर वनविभाग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वटवृक्षास पाणी देऊन करण्यात आली. डॉ. भारत सिंह हाडा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी कार्यक्रमात उपस्थित अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर कु. पूनम पाटे, भावसे, संचालक, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची मुख्य संकल्पना (Theme) बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाव्दारे प्रकाशित "वाघ म्हणजे जंगल नाही" या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे वार्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक श्रीमती दिव्यभारती, भावसे, व श्री. जयकुमारन, भावसे यांचा सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आला. तसेच "वाघ म्हणजे जंगल नाही" या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे श्री. अरविंद आपले, भावसे से.नि. यांचाही आभासी पध्दतीने सत्कार करण्यात आला. Dragonflies and Damselflies of the Maharashtra State या मंडळामार्फत प्रकाशित पुस्तकांचे लेखक डॉ. आशिष टिपले व सहलेखक यांचा सुध्दा आभासी पध्दतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वार्षिक वाटचालीचा प्रगती अहवाल मंडळाचे सदस्य सचिव डॉ. भारत सिंह हाडा, भावसे यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि श्री. एम. श्रीनिवास राव, भावसे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे मार्गदर्शनपर भाषणात मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा केली. तसेच मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचा व वार्षिक वार्तापत्राच्या प्रकाशनांची स्तुती केली. मुख्य अतिथी यांनी जैवविविधता संवर्धन, जैवविविधतेचा शाश्वत वापर या कार्यांमध्ये कार्यरत असलेल्या विविध संशोधन संस्थांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी त्यांचेशी समय समझोता लेख करण्याच्या सुचना दिल्यात, जेणेकरुन जैवविविधता संवर्धनामध्ये विविध सहभागीधारकांचा सक्रीय सहभाग घेणे शक्य होईल. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचारी, स्वंयसेवी संस्था इत्यांदिकरीता जैविक विविधता अधिनियम २००२ संबंधि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाची सुविधा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध व्हावी याकरीता आभासी पध्दतीचा अवलंब करण्यात आला. सदर प्रशिक्षणामध्ये श्री. रविंद्र वानखडे, प्रकल्प अधिकारी यांनी कायद्याच्या पाश्वभुमिबाबत सखोल माहिती दिली. तसेच श्रीमती रुपाली सावंत, विभागीय वन अधिकारी यांनी कायद्याचे क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करणेबाबत तांत्रीक माहिती दिली. श्रीमती श्वेता आडे, सहाय्यक वनसंरक्षक यांनी जैविक विविधता (जैविक संसाधन व त्यासंबंधीत पारंपारिक ज्ञानाची उपलब्धता आणि लाभांचे योग्य व समन्यायी वाटप) विनियमन, २०२५ याबाबत उपस्थितांना माहिती अवगत करुन दिली. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे राज्यातील विविध जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात आलेल्या रु. ८१२.०० लक्ष निधी वितरण व वापर करण्यात आलेल्या जैविक संसाधनांबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच महाराष्ट्र राज्यातील जैवविविधता वारसा स्थळांबद्यल माहिती दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थितांच्या प्रश्नांना सादरकर्त्यांनी व मान्यवरांनी उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली सावंत, विभागीय वन अधिकारी यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती श्वेता आडे, सहाय्यक वनसंरक्षक यांनी केले. #आंतरराष्ट्रीय_जैवविविधता_दिवस #जागतिक_जैवविविधता_दिन #महाराष्ट्र_राज्य_जैवविविधता_मंडळ #जैवविविधता #पर्यावरण_संवर्धन #वनविभाग #नागपूर
1
1
7
236
Maha Forest Official retweeted
आज नाशिक येथे संपन्न झालेल्या वन विभागाच्या आढावा बैठकीचे नेतृत्व केले. सदर बैठकीत नाशिकसह राज्यभरातील वनसंवर्धनाचे मुद्दे मांडले. बैठकीचा मुख्य उद्देश्य राज्यासाठी ठरवलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांचा आढावा घेणे आणि स्थानिक समस्यांवर तोडगा काढणे हा होता. यावेळी ज्या विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली त्यामध्ये समावेश होता: - 300 कोटी वृक्षलागवड मोहीम - बिबट्या -मानव संघर्ष निवारण - वणवा प्रतिबंधात्मक उपाय - ई-गव्हर्नन्स आणि पारदर्शकता - वन्यजीव गणना - पर्यावरणपूरक कुंभमेळा - ग्रीन कॉरिडोर तंत्रज्ञानाची जोड आणि पारदर्शक कारभारामुळे नाशिक विभागातील वनसंपदा अधिक समृद्ध होईल आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल. ------ Chaired a review meeting of the Forest Department in Nashik, focusing on key conservation priorities across the state. Discussions covered the large-scale tree plantation drive, human-wildlife conflict mitigation, fire prevention, e-governance, wildlife census, eco-friendly Kumbh Mela and development of green corridors. Emphasis was laid on using technology and transparency to strengthen forest resources and reduce human-wildlife conflict. #नाशिक #वनविभाग #आढावाबैठक #वनसंवर्धन #ForestConservation
2
2
6
294
बुद्ध पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा #बुद्धपौर्णिमा #BuddhaPurnima
1
3
269