Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.

Joined January 2014
3,854 Photos and videos
Pinned Tweet
अखेर इतिहास घडला. जनता झाली आमदार. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली यासाठी सर्वप्रथम जनतेचे मनापासून आभार मानतो. माझे सहकारी आमदार योगेश अण्णा टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे, महायुती चे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. या सर्वांनी दिलेली साथ आणि विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे. हडपसर चा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा शब्द आहे. #जनतेचा_आमदार #इतिहास_घडला #हडपसर_विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे #महायुती
23
10
75
4,623
माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे आणि या संकटातून सर्वांना सावरण्याचे बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
1
54
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून पक्षाच्या संघर्षमय वाटचालीचा आणि जनतेप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचा पुन्हा एकदा संकल्प करण्याची संधी मिळाली. स्व. अजितदादांच्या अकाली निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने त्यांच्या कार्याची, नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली. पक्ष उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी दिलेला लढा हीच आपली प्रेरणा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पक्षाची एकजूट आणि जनतेप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. स्व. अजितदादांनी जपलेले विचार, पक्षाची वैचारिक परंपरा आणि लोकहिताचे ध्येय अधिक ताकदीने पुढे नेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यानिमित्ताने अधिक दृढ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! #राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष #27thfoundationday #NCP
26
आधारवड स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासदृष्टीचा वारसा जपत आणि जनतेचा विश्वास सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २७ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे.विकास, प्रगती आणि जनसेवेचा हा संकल्प अधिक बळकट करण्याचा निर्धार आज पुन्हा करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #NCP27 #विकासाचा_वारसा
1
2
69
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन निमित्ताने आज पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा यांनी सोन्याचा नांगर फिरविलेल्या पवित्र वास्तूला भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि रयतेच्या कल्याणासाठीच्या कार्याचे स्मरण केले. तमाम शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #शिवराज्याभिषेक #लालमहाल
1
1
47
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि संस्थेच्या मान्यतेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या निवड प्रक्रियेसाठी रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभागीय चेअरमन या नात्याने उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा माजी विद्यार्थी संघाचे पदसिद्ध सचिव दत्तात्रय जाधव सर आणि मैनेजिंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी डॉ. अमित तुपे, उपाध्यक्षपदी अमर चौधरी आणि खजिनदारपदी स्वप्नील धर्मे यांची निवड करण्यात आली. तसेच डॉ. शंतनू जगदाळे, मयूर तुपे, महेश तुपे, बाळासाहेब तुपे, अक्षय आबनावे, सोनम कुणाल कामठे आणि मनीषा राऊत यांची संचालक म्हणून निवड झाली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, योगदान आणि सहभाग यांच्या माध्यमातून संस्थेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करतो. सर्वांना आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा! #रयतशिक्षणसंस्था #माजीविद्यार्थीसंघ #साधनाविद्यालय
1
5
82
भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा.. गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा !! प्राणांहून प्रिय अशा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन, अर्थातच "महाराष्ट्र दिन"... यानिमित्त या मराठी मातीला त्रिवार वंदन व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ! आजवरच्या देदीप्यमान वाटचालीत महाराष्ट्राने अविश्वसनीय प्रगती साधली, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, उद्योग, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये देशाचे नेतृत्व केले. महाराष्ट्राचा हा लौकिक असाच उंचावण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया.. #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
1
2
131
जगातील सर्वात व्यापक आणि समावेशक दस्तऐवज मानल्या जाणाऱ्या भारतीय संविधानाचे निर्माते, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवणारे, लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसली पाहिजे, असे मानणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
3
104
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।। श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #हनुमान_जन्मोत्सव
1
2
8
120
आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याबाबत आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. करोडो लिटर पाणी वाया गेले. आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्याचे आपल्यापुढे आव्हान असतानाच अशा प्रकारच्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत कुठे हलगर्जीपणा झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुरुस्तीचे काम अधिकारी युद्धपातळीवर करत आहेत यात दुमत नाही मात्र यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने भरपाई द्यावी. #हडपसर #जलसंपदा #मुठा_उजवा_कालवा #पाणी #विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
2
10
286
आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच मी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आढावा घेतला. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. साचलेले पाणी वाहून जाण्यास काही तास लागतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी साडेबारा वाजता पुन्हा आढावा घेतला असता कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णतः बंद करण्यात आलेला असून फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे समजले. कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून वाहतूक वळविण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या असून परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मनपा हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. खंदारे, मनपा उपायुक्त श्री. माळी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. सोनवणे तसेच ईशान तुपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कीर्तने बाग परिसरात पाणी साचले होते, ते जेट मशीन व पंपांच्या साहाय्याने काढण्यात आले असून स्वच्छतेचे काम सुरू आहे. बाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
1
10
373
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन ll उपमुख्यमंत्री #अजित_पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका असून याचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे असं आमदार @ChetanVTupe म्हणाले.‌ मात्र प्रशासन आणि पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप त्यांनी केला. #MahaBudget2026
2
2
94
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऊर्जावान आणि तरुण नेतृत्व, खासदार मा. श्री. पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अजितदादांनी जपलेला दृष्टिकोन आणि विचार आपण पुढे नेत आहात, ही अभिमानाची बाब आहे. आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो आणि समाजासाठी आपण अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावे, हीच शुभेच्छा. आपल्याला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. @parthajitpawar
2
6
103
विधानसभेत बोलताना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी या नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावाच्या विकासासाठी विशेष निधीची ठाम मागणी केली. मांजरी हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून येथील लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक त्या मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या भागातील अनेक गल्ल्या १ किलोमीटरपर्यंत लांब असून, मोठ्या व सुसज्ज रस्त्यांची नितांत गरज आहे. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनची उभारणी, वीज सुविधेची सुधारणा आणि इतर पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक आहे. या सर्व विकासकामांसाठी पुरेसा आणि स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठोस मागणी शासनाकडे केली. मांजरी परिसराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन! #मांजरी #हडपसर #पुणे_मनपा #विकासकामे #विधानसभा #जनतेचा_आवाज #उत्कृष्ट_संसदपटू #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
1
1
4
172
काल संध्याकाळी सिंचन विभागाकडून अचानक कालव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, गोपाळपट्टी आणि घुले वस्ती परिसरात पाणी घरांमध्ये शिरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंच अण्णा दारवटकर तसेच अजित घुले यांनी तात्काळ कळवले आणि संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सध्या बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन शाळांमध्ये करण्यात आले आहे. मात्र, या सर्व कुटुंबांचे लवकरात लवकर कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, यासाठी आज विधानसभेत विशेष सूचनेद्वारे अध्यक्षांकडे माझी ठाम मागणी मांडली आहे. आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे त्यांना न्याय मिळावा हीच माझी आग्रही मागणी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, ही अपेक्षा. #मांजरी #कॅनॉल #पुनर्वसन
1
8
224
Chetan Vitthal Tupe retweeted
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी जलसंपदा विभागाने कॅनोलमध्ये पाणी सोडल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघाील नागरिकांचे नुकसान झाल्याचे सांगत, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करा, अशी मागणी सभागृहात केली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
3
6
9
182
Chetan Vitthal Tupe retweeted
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी पुण्यातील कचराप्रश्नी मंत्र्यांचे नेतृत्व, तसेच आमदारांचा सहभाग असलेले भरारी पथक नेमण्याची गरज असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
8
7
10
180
Chetan Vitthal Tupe retweeted
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी साैरऊर्जा धोरणात अधिक स्पष्टता आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
1
7
11
179
Chetan Vitthal Tupe retweeted
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हडपसरचे आमदार श्री. चेतन तुपे यांनी पुण्यातील कचराप्रश्नी मंत्र्यांचे नेतृत्व, तसेच आमदारांचा सहभाग असलेले भरारी पथक नेमण्याची गरज असल्याची भूमिका सभागृहात मांडली. @ChetanVTupe #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
8
7
11
172
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. अदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपण करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वातून समाजहिताचे अनेक उपक्रम पुढे येत राहोत. आपणास उत्तम आरोग्य, यश आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. @iAditiTatkare
2
3
99
विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेत मी सहभाग घेतला. या चर्चेदरम्यान पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. आमचे नेतृत्व, दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा शब्द दिला होता. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या आवश्यक सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही गावे पुणे मनपात समाविष्ट करण्यात आली. मात्र वास्तव परिस्थिती अशी आहे की, गावे समाविष्ट होऊन बराच काळ लोटला असतानाही आजही या भागात अपेक्षित सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी विकासाच्या योजनादेखील प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. उलट या भागातील नागरिकांना पूर्वीपेक्षा जवळपास सातपट कर भरावा लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. माझ्या मतदारसंघातील साडेसतरा नळी, केशवनगर आणि मांजरी या समाविष्ट गावांमधील नागरिकांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मूलभूत सुविधा न देता वाढीव कर आकारणे हे अन्यायकारक आहे. तो कर सातपट न ठेवता दुप्पट असावा, म्हणूनच विधानसभेत मी स्पष्टपणे मागणी केली की, ज्या वेळी या भागांना पुणे शहरासारख्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, त्या वेळीच वाढीव कर लागू करण्यात यावा. तसेच स्व.अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना दिलेला शब्द शासनाने पूर्ण करावा आणि जनतेच्या भावनांची दखल घ्यावी. नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहणे हीच आपली जबाबदारी आहे, आणि यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन. #समाविष्ट_गावे #पुणे_मनपा #विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे #हडपसर_विधानसभा
2
10
210