Joined March 2017
1,847 Photos and videos
ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा. #जागतिक_रक्तदाता_दिन
3
10
17
920
चिमुकल्या हाती काम नाही, शिक्षणाची संधी द्या! या जागतिक बालमजुरी विरोधी दिनी बालमजुरीमुक्त समाज घडवण्याची जबाबदारी उचलूया. #जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन
6
7
28
1,268
सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
33
54
231
6,776
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
25
38
73
4,736
This #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters
10
30
56
5,429
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मे २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५० | प्रतिक्षा | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine May 2026 | Best Detection Story - 50 youtu.be/jqnf0v2a3Ag?si=xgrK…
7
20
38
3,676
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police retweeted
डायल ११२ वर मिळालेल्या माहितीची तात्काळ दखल घेऊन बालविवाह थांबविण्यात आला,पोलीस ठाणे बुलढाणा शहर यांची कारवाई . अशी कुठलीही माहिती मिळाल्यास ११२,१०९८ वर फोन करा . #buldhanadistrict #BULDHANAPOLICE #dial112 @CMOMaharashtra @DGPMaharashtra @IGP_AmtRange
2
4
17
3,110
ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सतर्क
7
35
70
5,723
जालना बदनापूर हद्दीत एका विकलांग महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीने सदर महिलेस मोटार सायकलने २-३ किमी लांब नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याबाबत फिर्यादीने आणि पीडितीने सांगितले. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी आणि महिलेची वैद्यकीय तपासणी केली. सदर प्रकरणात एकूण ५ आरोपींना अटक करून २० वर्षे सश्रम कारावास तसेच ₹ ६०,००० दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते मासिक सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार मार्च २०२६ ने सन्मानित करण्यात आले. #आपले_मपो #DistrictCaseFiles
12
8
69
3,489
फिर्यादी यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून अंदाजे ३५५ स्थानिक व शासकीय कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. या पार्श्वभूमीवर आरोपीचा मागोवा घेऊन पुणे येथील एका लॉजमध्ये सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणात आरोपीच्या राहत्या घराची झडती घेऊन सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹ ६५,८०,००० मुद्देमाल जप्त केली. या कामगिरीबाबत नागपूर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते मासिक सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण पुरस्कार मार्च २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. #आपले_मपो #DistrictCaseFiles
5
10
46
2,664
हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे
3
33
74
4,002
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे मागील वर्षभरात जिल्ह्यातून हरवलेले एकूण ११८ मोबाईल शोधून काढण्याची मोठी कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही शोधमोहीम राबविण्यात आली. या हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत ₹१२,६३,९२० असून, हे सर्व मोबाईल एका विशेष कार्यक्रमात संबंधित मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. #आपले_मपो #DistrictCaseFiles #Maharashtra_Police #Police_Action #Chandrapur_Police
11
9
75
3,012
दि. १२/०५/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे "GOOD SAMARITAN" ॲपची माहिती तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचाराबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये MEMS (Maharashtra Emergency Medical Services) या कंपनीतील डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांनी पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अपघातानंतरचा प्रथम प्रतिसाद, मूलभूत जीवन रक्षा पद्धती, तात्काळ रुग्णवाहिका सेवा उपलब्धता तसेच "GOOD SAMARITAN" ॲप याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. #आपले_मपो #DistrictCaseFiles #Maharashtra_Police #Palghar_Police #Police_Action
3
5
26
1,531
काही वेळेस नकार हा होकारपेक्षा जास्त मौल्यवान ठरतो. म्हणून चुकीच्या गोष्टींना ठाम नकार कधीही बरा! #निर्णय_तुमचा #नशा_नाही_आयुष्य_निवडा
2
34
91
3,526
जळगाव हद्दीतील शिवारामध्ये अज्ञात प्रेत सापडल्याची नोंद फिर्यादी यांनी केली. गुन्ह्याची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि अवघ्या १२ तासाच्या तपासणी नंतर मृतकाच्या वडील आणि भावानेच महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात सदर आरोपींना अटक करून पुढील कार्यवाहीकामी जळगाव जामोद यांच्या ताब्यात दिले आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles
3
5
30
2,049
पिस्तुलाचा धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹ ६९,९०,००० किंमतीची चोरी झाल्याची तक्रार फिर्यादीने अकोला पोलीस ठाणे येथे नोंदवली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पथके तयार करून गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण ५८० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. अंदाजे ७०० कि.मी चा प्रवास करून पोलिसांनी आरोपीस ७२ तासात अटक करून विविध धातूंचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles
3
3
42
1,948
मीरारोड येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ गुन्ह्यांतर्गत २ आरोपींकडून १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एकूण २ लाखाहून अधिक किंमतीचा एमडी ड्रग जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात अद्याप २ महिला आरोपी आणि ११ पुरुष आरोपींना अटक करून ६ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग, २५५ लिटर रसायन जप्त करण्यात आला असून अंदाजे एकूण ₹ १३,६५,४५,०९५ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles #Maharashtra_Police #MBVV_Police
4
6
34
1,651
ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #मातृदिन_२०२६
17
52
250
5,467
विशेष मोहिमेअंतर्गत गहाळ झालेले ९ लाखाहून अधिक किंमतीचे एकूण ४३ मोबाईल हस्तगत! वारंवार मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच भुईंज पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. सदर मोहिमेअंतर्गत त्यांनी ९ लाखाहून अधिक किंमतीचे एकूण ४३ मोबाईल फोन हस्तगत केले. यापूर्वी देखील त्यांनी ६ लाखाहून अधिक किंमतीचे एकूण ३० मोबाईल फोन परत केले आहेत. #आपले_मपो #DistrictCaseFiles
5
5
52
2,525
आपले भविष्य आपल्याच हातात आहे म्हणून वेळीच सावध व्हा आणि नशेवर नियंत्रण मिळवा. #निर्णय_तुमचा #नशा_नाही_आयुष्य_निवडा
10
19
81
2,697