SIR राज्य समन्वय समितीची बैठक आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेत टिळक भवन, दादर, मुंबई येथे पार पडली. SIR साठी नियुक्त विभागीय समन्वयक व समन्वयक यावेळी उपस्थित होते.
या मोहीमेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिजित सपकाळ, विभागीय समन्वयक डॉ. गजानन देसाई, ॲड. संदेश कोंडविलकर, श्री. मोहन तिवारी, श्री. श्रीरंग बर्गे, ॲड.अमित कारंडे, श्रध्दा ठाकूर, सहसमन्वयक श्री. आशिष दुबे, डॉ. मनोज उपाध्याय, श्री. राजेश जाधव, ॲड. वर्षा शिखरे, श्री. प्रकाश पाटणे, श्री. नितीन मोहिते, श्री. रमेश साळवी, अनिस इद्रीसी, श्री. प्रशांत धुमाळ उपस्थित होते.