State President @BJPMinMorchaMH

Joined August 2020
2,224 Photos and videos
सदिच्छा भेट आणि मार्गदर्शनाचा लाभ... आज राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे नाना यांची सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक,राजकीय व विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. #HaribhauBagde #SillodSoygaon #CourtesyMeeting #भाजपा
5
18
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त कपिलजींच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर बँक सहकार क्षेत्रात यशस्वी भरारी घेईल, असा विश्वास आहे. #KapilPatil #TDCC #BJP4Maharashtra @KapilPatil_
9
119
1,491
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वात आपला महाराष्ट्र डेटा सेंटर क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील पेण येथे अत्याधुनिक डेटा सेंटर प्रकल्प उभारणार आहे. राज्याला देशातील अग्रगण्य डेटा सेंटर हब बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. #DataCenterHub #DataCenter #Maharashtra
9
91
1,096
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अनेक दशकांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने, विनोदाच्या अचूक शैलीने आणि विविधांगी भूमिकांमधून अशोकजी आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सर्वांचे लाडके ‘अशोक मामा’ म्हणून त्यांनी अनेक पिढ्यांना आपलंसं केलंय. अशोकमामा, आपल्या अभिनयाचा हा प्रवास मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. यापुढेही आपल्या कलासाधनेतून मराठी चित्रपटसृष्टीचे वैभव वृद्धिंगत होत राहो, तसेच आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! अशोकमामा, शतायुषी व्हा ! #AshokSaraf #MarathiCinema #Birthday
8
78
1,384
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा-३) या योजनेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यात येणार आहे. येत्या काळात ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीचा कायापालट करणारा गेमचेंजर मेगाप्लॅन ठरेल.   #GramSadak #MaharashtraInfrastructure #RuralDevelopment
8
87
1,096
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
2
65
926
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देण्यास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत समर्थ आहे. सीमाभागात मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी वाढल्यानं भारतीय सैन्याचं सामर्थ्य कमालीचं वाढलं. भारत संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाला, त्यासोबतच जगातील एक प्रमुख संरक्षण सामग्री निर्यातदार देश म्हणूनही पुढे आला आहे. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारमुळे भारत सुरक्षित आणि समर्थ कसा झाला? चला जाणून घेऊया ! #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
1
7
77
1,072
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी 'आंखे', 'शोला और शबनम' आणि 'पाप की दुनिया' यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. तसेच गोविंदा आणि चंकी पांडे या दिग्गजांना इंडस्ट्रीत पहिली संधी दिली. आदरणीय मोदीजींच्या समर्थनार्थ 'हर हर मोदी, घर घर मोदी' या प्रचारगीताची निर्मिती पहलाजजींनीच केली होती. २०१५ ते २०१७ दरम्यान सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद आणि तब्बल २९ वर्षे 'असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम्स प्रोड्युसर्स' संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पहलाजजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि निहलानी परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!
1
4
36
1,242
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वात ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. याचाच परिणाम म्हणून 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५' मध्ये आपल्या महाराष्ट्राने अद्वितीय कामगिरी करत मानाचे ४ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे: 🏆बालस्नेही पंचायत - इटगाव (पु) (जि. भंडारा)- देशात प्रथम क्रमांक 🏆जल-समृद्ध पंचायत - खारीवली (ता. खालापूर, रायगड) - देशात प्रथम क्रमांक 🏆सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत - चांभारली (खालापूर, रायगड)- देशात द्वितीय क्रमांक 🏆सुशासन ग्रामपंचायत श्रेणी - निंबाळे (चांदवड, नाशिक) - देशात द्वितीय क्रमांक केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून देशपातळीवर देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी ग्रामीण विकासाच्या यशस्वी वाटचालीचे द्योतक आहे. ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन ! #NationalPanchayatAwards2025 #GramPanchayat #Maharashtra
7
77
1,058
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
2
60
915
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपला महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करत आहे. याच अनुषंगाने 'पंतप्रधान कुसुम' तसेच 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या महत्त्वाकांक्षी योजनांना राज्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राने एका महिन्यात सुमारे ४५,९११ सौर कृषी पंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत तब्बल १० लाखांहून अधिक सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. ही आकडेवारी राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलाची साक्ष देते. #PMKUSUM #SolarPumpScheme #MaharashtraNo1
1
7
73
1,065
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात देशातील तरुणाईला नवी दिशा मिळाली आहे. नवकल्पना, स्टार्टअप आणि कौशल्य विकास यांसारख्या उपक्रमांमुळे युवकांच्या सामर्थ्याला मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळेच आजचा युवा वर्ग आत्मविश्वासाने पुढे येत असून देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देत आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के दूरदर्शी नेतृत्व में देश के युवाओं को नई दिशा प्राप्त हुई है। नवाचार, स्टार्टअप और कौशल विकास जैसे विभिन्न उपक्रमों के माध्यम से युवाओं की क्षमताओं को एक बड़ा मंच उपलब्ध हुआ है। इसी कारण आज का युवा वर्ग आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है और देश की प्रगति में सक्रिय योगदान दे रहा है। #YouthEmpowerment #SkillDevelopment #NewIndia
2
7
69
1,115
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
Addressing the Yogasana World Championship in Ahmedabad. Yoga is India's timeless gift to humanity! Uniting mind, body and spirit, it inspires a healthier, more harmonious world. @yogasanabharat @worldyogasana x.com/i/broadcasts/1nJOLLXVX…
917
3,714
14,374
384,841
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्याबद्दल भाजपा-महायुतीचे उमेदवार श्री. अरुणजी लखाणी यांचे हार्दिक अभिनंदन ! आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकारच्या लोककल्याणकारी कार्याला आणि आपल्या विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेली ही पोचपावती आहे. आपल्या कार्यकाळात वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या विकासाला नवी गती मिळेल, हा विश्वास आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! #ArunLakhani #VidhanParishad2026 #BJP4Maharashtra
1
4
43
1,065
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
3
58
989
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचा रोडमॅप आखला आहे. या व्हिजनवर विस्तृत चर्चा करण्यासाठी Y4D फाऊंडेशनच्या वतीने ताज प्रेसिडंट हॉटेल येथे 'India@2047 Dialogue' हा संवादपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामुळे युवा, उद्योजक आणि जनसामान्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. या कार्यक्रमाच्या उद् घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी Y4D फाऊंडेशनच्या वतीने वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. Y4D फाऊंडेशन कौशल्य विकास, युवा सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहे. या कार्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे यावेळी कौतुक केले. याप्रसंगी पद्मश्री सावजी ढोलकिया, पद्मश्री गिरिश प्रभुणे, पद्मश्री चैत्राम पवार, पद्मश्री शामसुंदर पालिवाल, भाजपा प्रवक्ता श्वेताताई शालिनी आदी मान्यवर उपस्थित होते. #IndiaAt2047 #ViksitBharat #Y4DFoundation
1
8
71
1,147
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने भोर परिसरातील जनतेच्या सेवेसाठी समर्पित असणारे लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. अनंतरावांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि समर्थकांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! भावपूर्ण श्रद्धांजली ! ॐ शांती
5
26
1,160
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रद्धेय माधव सदाशिव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी यांस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! 'इदं राष्ट्राय इदं न मम' या मंत्रानुसार त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले. 'व्यक्तीपेक्षा संघटना आणि संघटनेपेक्षा राष्ट्र मोठे' हा मूल्यविचार त्यांनी लाखो स्वयंसेवकांच्या मनात रुजवला. शिस्त, समर्पण, त्याग आणि राष्ट्रसेवा या चार मूलभूत मूल्यांच्या आधारावर त्यांनी संघाला योग्य दिशा दिली. त्यांचे राष्ट्रकार्य, विचार आणि संस्कार आपल्या सर्वांसाठी सदैव अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी राहतील. #MSGolwalkar #RSS #Nationalism
5
13
58
1,421
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
आज जागतिक पर्यावरण दिन! 'निसर्ग' ही आपल्याला लाभलेली अमूल्य देणगी आहे. तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. याच अनुषंगाने आपलं मोदी सरकार हरित क्रांतीला गती देत शाश्वत आणि हरित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सौर ऊर्जा, स्वच्छ भारत अभियान, नमामि गंगे, एक पेड माँ के नाम यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मोदी सरकारने पर्यावरणपूरक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध राहूया आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करुया! #WorldEnvironmentDay #EnvironmentDay #GreenIndia
2
6
49
1,439
Idris Multani - इद्रिस मुलतानी retweeted
2
33
993