Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar

Joined July 2016
4,629 Photos and videos
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
4
50
सावधान!बोगस ‘कृषी मित्र’ भरतीच्या जाहिरातींपासून दूर रहा.➡️भरतीसंबंधित माहिती फक्त शासनाच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. ➡️वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करू नका आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा. 🚨सतर्क रहा, सुरक्षित रहा!#कृषीमित्र #बोगसभरती #सावधान #कृषीविभाग
1
1
8
196
#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण सुरु झाले आहे.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आवाहन केले आहे. @MahaDGIPR @InfoMarathwada @vinaygc
2
55
#छत्रपतीसंभाजीनगर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान येथे मंगळवारी (दि.१६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन: सहभागी होण्यासाठी विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.अथवा दुरध्वनी 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधा.
2
33
बालरुग्णांसाठी ‘कर्करोग निदान सुविधा’ अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्यामुळे ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे प्रेरणादायी काम झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे.
1
35
#छत्रपतीसंभाजीनगर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण २०२६ तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण २०२६ राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणास आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
1
38
सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३ किमीपर्यंत पोहोचले आहे. देशातील रेल्वे संपर्क मजबूत झाला असून,कार्बन उत्सर्जनात घट,कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
40
दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे.
42
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
27
एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो. वाढती कनेक्टिव्हिटी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकास यांना या एक्सप्रेसवे क्रांतीने नवी गती दिली आहे.
1
37
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून #नवीमुंबईइंटरनॅशनलमेडिसिटी विकसित केली जाणार ▶️राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार ▶️प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. ▶️या प्रकल्पातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा @ClevelandClinic @Brookfield @ArcelorMittal @IndiainNewYork @IndianEmbassyUS
25
20
1,399
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍क्लीव्हलँड, ओहायो जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ‘#मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले." मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या. @Dev_Fadnavis @ClevelandClinic @Brookfield @ArcelorMittal @IndiainNewYork @IndianEmbassyUS
30
25
1,996
#छत्रपतीसंभाजीनगर जिल्हाधिकारी @vinaygc वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीला भेट दिली. शहाजीराजे भोसले स्मारकाची पाहणी केली. घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांची पाहणी करून विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. @MahaDGIPR @InfoMarathwada
4
221
#छत्रपतीसंभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता. खुलताबाद या गावास भेट दिली व जनगणना कार्याची पडताळणी केली. @MahaDGIPR @InfoMarathwada @vinaygc
84
#छत्रपतीसंभाजीनगर, दि.१०(जिमाका)- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता. खुलताबाद या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. @MahaDGIPR @InfoMarathwada @vinaygc
1
94
#छत्रपतीसंभाजीनगर प्रधानमंत्री सेतू या योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन रोजगारक्षम कौशल्य विकास करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
2
114
#छत्रपतीसंभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता.खुलताबाद या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली.
2
70
सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर:२०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमानतळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. यामुळे देशभरातील विकासाला नवी गती मिळाली आहे.#LongestServingElectedPMModi
1
52
सरकार स्थापन झाल्यानंतर ४०१ दिवसांत 'डिजिटल इंडिया' अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज १०२ कोटींहून अधिक इंटरनेट जोडण्या, डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे भारताची काम करण्याची, शिकण्याची आणि व्यवहार करण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे.#LongestServingElectedPMModi
1
38
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या #जीएसटी मुळे विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याऐवजी एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली.भारतभर व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले. #LongestServingElectedPMModi
1
29