क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने देशाची भक्कम वाटचाल!
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत २० कोटींहून अधिक संवेदनशील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २८ लाखांहून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
#12YearsOfSwasthBharat#TBMuktBharat
युवा भारत करतोय ‘विकसित भारत मिशन’चे सारथ्य!
✅२.०७ कोटींहून अधिक तरुणांची 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी.
✅कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ६ कोटींहून अधिक तरुणांचे सक्षमीकरण.
✅नवउद्योजकांसाठी १२ कोटींहून अधिक ‘मुद्रा लोन’ मंजूर.
#12YearsOfYuvaShakti#YouthPower
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते भीमाशंकर येथे मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा व ब्रह्मध्वजारोहण. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हेरिटेज वाडी प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी श्रीक्षेत्र #भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी करुन घेतला सविस्तर आढावा. भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या दिल्या सूचना.
#पुणे
एका पिढीचा अभूतपूर्व टप्पा…प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतीक्षा संपवली. भारताच्या पहिल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची इम्फाळ, मणिपूर येथे स्थापना. सन २०१८ मध्ये हे स्वप्न सत्यात उतरले.
#12YearsOfYuvaShakti#NationalSportsUniversity#SportsEducation
भारताची स्टार्टअप क्रांती तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि अभूतपूर्व पातळीवर आर्थिक विकासात हातभार लावण्यासाठी सक्षम करीत आहे.
#12YearsOfYuvaShakti
१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!
शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक.
आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांच्या उपस्थितीत बैठक. राज्यातील इतर संतांचे पालखी सोहळे पुणे विभागात आल्यानंतर आजपर्यंतच्या परंपरेला साजेसा व अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक विधानभवन येथे संपन्न. मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
#बारामती तालुक्यातील कटफळ येथे २० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे क्रीडा संकुल समितीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत निर्देश.
उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी घेतला 'पुणे ग्रँड टूर' सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, @CPPuneCity अमितेश कुमार, @PCcityPolice विनय कुमार चौबे,क्रीडा आयुक्त दीपक सिंगला आदी उपस्थित...१/२
दुसऱ्या पर्वाच्या आयोजनाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, तयारीचा आढावा व निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी-उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar ..२/२