india’s Largest Power Distribution Utility | Serving 35 Mn Consumers across Maharashtra | Driving Energy Transition, Innovation & Sustainable Future

Joined June 2016
4,594 Photos and videos
Replying to @VilasJoshitkv
प्रिय ग्राहक, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया तुमचा १२-अंकी ग्राहक क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक 'DM' (थेट संदेश) द्वारे कळवा, जेणेकरून आम्ही तुमची तक्रार त्वरित निवारणासाठी पुढे पाठवू शकू. x.com/messages/compose?recip…

2
801
प्रिय ग्राहक, आम्ही तुमच्या प्रश्नाला 'DM' (थेट संदेशा) द्वारे उत्तर दिले आहे. कृपया ते तपासा आणि तुम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास आम्हाला कळवा.
669
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा महावितरणच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणादायी संदेश! #MSEDCL #Mahavitaran #Electricity
102
3
10
6,509
महावितरणच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #MSEDCL #Mahavitaran #Electricity
26
1
8
5,495
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #Mahavitaran #MSEDCL #Electricity
25
2
13
2,935
महावितरणच्या ५२ कर्मचाऱ्यांचे रक्तदान वर्धापन दिनाच्या पूवसंध्येला सामाजिक बांधिलकीची जोपासना मुंबई, दि. ५ जुन २०२६: महावितरणचा २१ वा वर्धापन दिन शनिवारी (०६ जून) मोठ्या उत्साहात मात्र साधेपणाने साजरा होत आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यालय ‘प्रकाशगड’ येथे शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिराला सामाजिक बांधिलकी जोपासत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर जे. जे. महानगर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महावितरणचा २१ वा वर्धापन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता ‘प्रकाशगड’ येथील प्रेक्षागृहात आयोजित वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विधायक व सामाजिक उपक्रमाची जोड देताना पूर्वसंध्येला मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांनी शिबिरात सहभागी होत रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. #MSEDCL #Mahavitaran #BloodDonation
18
1
5
2,474
अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांना विजेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'पुढारी‌’ माध्यम समूहाने ‌‘महा आयकॉन 2026‌’ हा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला. आज, गुरुवारी (दि. 4 जून) परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर, पुढारी समूहाचे संपादक श्री. योगेश जाधव, पुढारीचे मुख्य संपादक श्री. प्रतापसिंह जाधव मंचावर उपस्थित होते. #MSEDCL #Mahavitaran
14
1
4
2,436
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd retweeted
Proud to announce a historic milestone for Maharashtra's farmers! Maharashtra has installed 10 Lakh Off-Grid Solar Pumps — the highest in India! We hold 64% of India's total 15.62 Lakh solar pumps, lighting up fields and transforming lives. When Maharashtra's farmers thrive, India thrives. @narendramodi #Maharashtra #SolarEnergy
545
2,014
2,550
22,766
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd retweeted
A Brighter Maharashtra. A Greener India. ☀️⚡ PM Surya Ghar: Muft Bijli Yojana has achieved a historic milestone of 15,000 rooftop solar installations in a single day under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji. Maharashtra played a leading role with a record 4,700 installations in a day and has now crossed 6 lakh rooftop solar installations, powering homes, empowering citizens and accelerating the journey towards a sustainable and self-reliant India. @narendramodi @JoshiPralhad #Maharashtra #PMSuryaGhar #SolarEnergy
441
1,927
2,217
18,284
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd retweeted
A landmark achievement in India’s clean energy journey! On 29th May 2026, the highest-ever single-day record of 15,000 rooftop solar installations across the country was achieved under the @PMSuryaGhar: Muft Bijli Yojana. Maharashtra set a new record with 4700 installations in a single day and became the second state after Gujarat to cross the landmark of 6 lakh installations. These milestones reflect the rapid adoption of #CleanEnergy under the visionary leadership of Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji, driving India towards a greener, more sustainable future. #PMSuryaGhar #SolarEnergy
12
24
90
14,523
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ​आपल्या कुशल प्रशासनाने, न्यायबुद्धीने आणि दातृत्वाने प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा! #MSEDCL #Mahavitaran #AhilyadeviHolkarJayanti
11
1
12
2,008
वेळ वाचवा, धावपळ थांबवा! महावितरणचे वीजबिल घरबसल्या ऑनलाईन भरा. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
42
2
11
2,894
अफवांवर विश्वास ठेवू नका! स्मार्ट बना, स्मार्ट मीटर बद्दलचे गैरसमज मनातून काढून टाका! #MSEDCL #Mahavitaran #Electricity
53
6
17
4,465
"अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला!" स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MSEDCL #Mahavitaran #VeerSavarkarJayanti
4
1
7
1,706
शेतकऱ्यांना, सौर कृषी पंप बिघडल्यास महावितरणच्या मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये 'सौर पंप तक्रार' यावर क्लिक करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
11
4
11
2,285
Replying to @rahulbembade
Dear consumer, we sincerely regret the inconvenience caused. We will review your issue and get back to you shortly.
6
1
2,209
Dear consumer, we have responded to your query over DM.
2
1,931
मानव संसाधनातील महावितरणच्या कामगिरीचा जागतिक सन्मान! नवी दिल्ली येथे 'ग्लोबल एनर्जी ॲण्ड एन्व्हायरमेंटच्या (GEEF)' वतीने आयोजित 'जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद २०२६' मध्ये महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना विद्युत क्षेत्रातील मानाचा 'ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर २०२६' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकास आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा हा सन्मान आहे. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
28
4
8
3,592
शांती, प्रेम आणि समतेचा दीप अखंड तेवत राहो, दहशतवादाचे समूळ उच्चाटन होवो! जागतिक दहशतवाद विरोधी दिन! #MSEDCL #Mahavitaran #Electricity
8
3
6
2,827
सौर ऊर्जा ग्राहकांनो, ग्रीड सपोर्ट चार्जबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या! छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांवर 'ग्रीड सपोर्ट चार्ज' (Grid Support Charge) लागू झाल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार, अशी भीती काही स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र ९९ टक्के ग्राहकांना हा चार्ज लागू होत नसताना गैरसमज पसरवण्यात येत आहे. या विषयातील तांत्रिक गुंतागुंत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी, विद्युत क्षेत्राचे तज्ज्ञ आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांचा हा विशेष लेख नक्की वाचा. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
40
31
107
18,846
ग्रीड सपोर्ट चार्ज: गैरसमज दूर करा! राज्यातील ९९% वीज ग्राहकांना 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू नाही. काही गटांकडून पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे. वस्तुस्थिती काय आहे? जाणून घ्या: # ज्यांचा मंजूर भार (Sanctioned Load) १० किलोवॅटपेक्षा जास्त आहे, फक्त त्यांनाच हा 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू होईल. # घरगुती ग्राहक - राज्यातील २ कोटी ३७ लाख घरगुती ग्राहकांपैकी केवळ १६ हजार ४१० (०.०७%) ग्राहकांनाच 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू. # औद्योगिक ग्राहक: राज्यातील ४.४५ लाख औद्योगिक ग्राहकांपैकी केवळ ८,८९४ (सुमारे २%) ग्राहकांनाच हा चार्ज लागू. # व्यावसायिक ग्राहक- एकूण २३.३० लाख व्यावसायिक ग्राहकांपैकी फक्त १२,८३२ (०.५५%) ग्राहकांना हा चार्ज लागू. # गेल्या वर्षभरात सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून तब्बल १२९ कोटी ५७ लाखांचा लाभ झाला आहे. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
17
8
23
5,446
पुण्यातील बालेवाडी येथे रंगला अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ सोहळा! एमएसईबी होल्डिंग कंपनी अंतर्गत महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांच्या यजमान पदाखाली आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (AIESCB) ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे (बालेवाडी) येथे दि. ६ ते ८ मे २०२६ दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यातील काश्मीर ते कन्याकुमारी सांस्कृतिक कलेचे दर्शन, पथसंचलन व महाराष्ट्राचा पाहुणचार पाहून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू अक्षरशः भारावून गेले. या उद्घाटन सोहळ्यास पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनिल काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप, AIESCB चे पदाधिकारी श्री. जिग्नेश राय, नरेश कुमार, भरत पाटील, ललित गायकवाड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. #MSEDCL #Mahavitaran #Electricity #Power #Sports
43
4
5
6,582