Nation First

Joined February 2024
652 Photos and videos
आरोग्य क्षेत्रात कशाप्रकारे आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे, याची एक झलक….
Healthcare accessibility is one of the most important investments a nation can make. Over the past 12 years, under PM @narendramodi’s leadership, India has made significant strides to ensure quality healthcare reaches more people, more efficiently, and more affordably. The healthcare ecosystem today is more accessible, resilient, and future-ready for its citizens. Read the full thread to explore the milestones that strengthen public health and lay the foundation for a Viksit Bharat. #12YearsOfSwasthBharat
4
113
133
2,212
गेल्या 12 वर्षांत भारताने दर्जेदार आरोग्य सेवा अधिक परवडणारी आणि सुलभ करण्यासाठी काम केले आहे. जेव्हा आपली ओळख जगातील सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम, 'आयुष्मान भारत' असणारा देश म्हणून होते, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो; हा कार्यक्रम अत्यंत वंचित घटकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करतो. 'पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना' यांसारख्या इतर प्रयत्नांमुळे औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली आहेत. स्टेंट आणि गुडघ्यांच्या रोपणाच्या किमती परवडणाऱ्या झाल्या आहेत आणि यामुळे अनेक लोकांना मदत झाली आहे. त्याच वेळी, अधिक संस्था आणि जागा उपलब्ध झाल्यामुळे लोकासांठी वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ झाले आहे. एक निरोगी भारत घडवण्यासाठी आम्ही आतापर्यंत केलेल्या या कामाचा पाया अधिक मजबूत करत राहू. #12YearsOfSwasthBharat
1
110
131
1,855
एनडीए सरकार हे तरुण-नेतृत्वाखालील विकासासाठी खंबीरपणे काम करणारे सरकार आहे. गेल्या 12 वर्षांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या तरुणांनी ज्या आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा केला आहे, ते आहे. 'स्टार्टअप इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'स्किल इंडिया' आणि 'अटल इनोव्हेशन मिशन' यांसारख्या उपक्रमांद्वारे, एक अशी परिसंस्था निर्माण झाली आहे जी नवोपक्रम, उद्योजकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देते. आज भारत जगातील आघाडीच्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनला आहे आणि या यशोगाथांपैकी अनेक आपल्या युवा शक्तीकडून, तेही छोट्या शहरांमधून आणि गावांमधून लिहिल्या जात आहेत. #12YearsOfYuvaShakti
1
2
4
147
भारताचे तरुण विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उत्पादन, अवकाश, सेमीकंडक्टर्स आणि ड्रोन्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. तरुण भारतीय आपल्या देशाचे आणि जगाचे भविष्य घडवणाऱ्या क्षेत्रांमध्ये योगदान देत आहेत, हे पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. आपल्या तरुणांनी क्रीडा क्षेत्रातही देशाचा मोठा गौरव केला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, तरुण भारतीय खेळाडूंनी सातत्याने देशाची मान उंचावली आहे. त्याच वेळी, एक मजबूत क्रीडा परिसंस्था, उत्तम पायाभूत सुविधा आणि खेळाडूंना मिळणारा अधिक पाठिंबा यामुळे तरुण प्रतिभेसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. #12YearsOfYuvaShakti
3
118
गेल्या 12 वर्षांत, एनडीए सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी काम केले आहे. आणि हे विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे. वित्तीय समावेशकता आणि उद्योजकतेपासून ते शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता, गृहनिर्माण, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासनापर्यंत, महिला विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एनडीए सरकारचे प्रयत्न सन्मान, संधी आणि सक्षमीकरणावर आधारित आहेत. त्यांनी असे वातावरण तयार करण्यास मदत केली आहे जिथे महिला त्यांच्या पूर्ण क्षमतेची अनुभूती घेऊ शकतात आणि राष्ट्रउभारणीत आणखी मजबूत योगदान देऊ शकतात. #12YearsOfNariShakti
1
2
5
191
भारताची 'नारी शक्ती' विज्ञान, अंतराळ आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपली मुद्रा उमटवताना पाहून मला विशेष आनंद होत आहे. ड्रोन तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील त्यांचा वाढता सहभाग संधींचे नवे मार्ग खुले करत आहे आणि देशभरातील विकासाचे चित्र बदलत आहे. आमचे सरकार बचत गटांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे, जे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. #12YearsOfNariShakti
1
4
172
गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक मोठे बदल पाहिले आहेत आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण हेच राहिले आहे. आपण नेहमीच 'अंत्योदय' प्रेरणेने काम केले आहे, आणि दशकांपासून विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणे हाच आमचा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे. जन धन खाती आणि थेट लाभ हस्तांतरणापासून (डीबीटी) ते स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत आणि अशा इतर अनेक योजनांमागे, लोकांना सन्मान आणि संधी मिळवून देणे हा एकच सोपा उद्देश राहिला आहे. #12YearsOfGaribKalyan
1
6
12
669
तंत्रज्ञानाने गरिबांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ही देखील एक अत्यंत आनंददायी बाब आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सर्व मदत लोकांपर्यंत थेट आणि पारदर्शकपणे पोहोचत आहे. यामुळे भ्रष्टाचार आणि त्रुटी कमी झाल्या आहेत, कार्यक्षमता वाढली आहे आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशाच प्रकारे, 'गरीब कल्याण' पुढे नेण्याचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरण आणि 'विकसित भारताचे' आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक सामूहिक चळवळ बनला आहे. #12YearsOfGaribKalyan
2
5
430
भारताची विकासगती मजबूत राहिली आहे! आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.7% जीडीपी वाढदर आणि आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 7.8% वाढ ही आपल्या अर्थव्यवस्थेची अंतर्निहित ताकद, सुधारणांचे यश आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमांचे प्रतिबिंब आहे. 'जीवन सुलभता’, ‘व्यवसाय सुलभता’ अधिक वाढवण्यासाठी आणि आपल्या युवकांसाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.
13
82
155
4,713
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने काम करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या आणि शाश्वत विकासाला पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा दिवस आहे. गेल्या दशकात आमच्या सरकारने केलेले असंख्य प्रयत्न या दिशेने आमचे काम अधोरेखित करतात. भारताच्या प्रमुख यशांमध्ये हरित क्षेत्र विस्तारणे आणि विविध प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ यांचा समावेश आहे. सामूहिक प्रयत्न, धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवकल्पना (इनोव्हेशन) यांच्या माध्यमातून आपले पर्यावरण कसे सुधारता येऊ शकते, हे भारताच्या जनतेने दाखवून दिले आहे.
1
5
15
539
आम्हाला भारतातील आमच्या जैविक विविधतेचा प्रचंड अभिमान आहे. आमची वैविध्यपूर्ण परिसंस्था असंख्य प्रजातींना आणि उपजीविकेला आधार देते. विशेष प्रजातींच्या पुनरुज्जीवनासाठी आमचे प्रयत्नही लक्षणीय राहिले आहेत. माळढोक, हिमचित्ते, अस्वल आणि चित्ते यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांनी हे दाखवून दिले आहे की सातत्यपूर्ण वचनबद्धतेमुळे वन्यजीव आणि परिसंस्था पूर्ववत होण्यास कशी मदत होऊ शकते. एक पेड माँ के नामसारख्या उपक्रमांनी दरवर्षी सुमारे 1.19 लाख हेक्टर जंगलाची भर घालण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
2
6
323
आज आपण #6YearsofPMSVANidhi साजरी करत आहोत. तळागाळातील लाखो पथविक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) विना-तारण कर्ज, वित्तीय समावेशकता आणि प्रगतीच्या नवीन संधी सुनिश्चित करून या योजनेने त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. ही योजना संपूर्णपणे विश्वास, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणावर आधारित आहे. ज्यांच्या जिद्दीने आणि उद्योजकतेने आपल्या देशाची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
From Street Side Dreams to Digital First Growth Six years of PM SVANidhi have brought more than change to the lives of our street vendors. They have brought confidence, opportunity, and a stronger sense of possibility. This was not just a scheme; it reflected PM @narendramodi’s commitment to empower street vendors through Swarozgar, Svavlamban, and Swabhimaan, strengthening the foundation of an Aatmanirbhar Bharat. A thread on how millions of stories became pathways to financial confidence! #6YearsofPMSVANidhi
105
1,366
1,388
8,017
पंतप्रधान @narendramodi यांचे #MannKiBaat आता मराठीत त्यांच्याच आवाजात ऐका. ऐकायला विसरू नका! (@SarvamAI वापरून AI-निर्मित)
254
1,670
1,703
8,604
भारतातील विविध भागांमध्ये सध्या कडक ऊन पडत असून, त्यामुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ही उष्णता आपल्या सर्वांसाठीच असह्य आहे, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने शक्य तितकी काळजी घ्यावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका (हायड्रेटेड राहा) आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी नक्की ठेवा. अशा हवामानात, इतरांनाही पाण्याचा ग्लास देऊन मदत करा. तुमचे हे छोटेसे सौजन्य खूप मोलाचे ठरेल.
9
71
141
6,171
या कडक उन्हाच्या लाटेत जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा आणि आपल्या प्रियजनांना फोन करून त्यांची चौकशी करा. त्यांना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्याची, दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याची आणि शक्य तितकी विश्रांती घेण्याची आठवण करून द्या.
1
5
12
567
या भीषण उष्णतेमध्ये, आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांची आणि प्राण्यांचीही काळजी घेऊया. आपल्या घराबाहेर, बाल्कनी, गच्ची, दुकाने किंवा कार्यालयांबाहेर ठेवलेला पाण्याचा एक छोटासा वाडगा एखाद्या तहानलेल्या पक्ष्यासाठी जीवनदायी ठरू शकतो. या कठीण दिवसांत आपली दयाळू वृत्तीच आपल्याला मार्ग दाखवो.
2
7
424