रोहित दादा, आम्ही येतोय तुम्हाला बळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी!
पंढरपूरच्या भूमीत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या @RRPSpeaks यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे !
राज्यभरातून शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येऊन या लढ्याला पाठिंबा देत आहेत. ही साधी लढाई नसून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाची, जीवनमरणाची लढाई आहे.
सरकारने आता वेळकाढूपणा न करता शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी.
#सरसकटकर्जमाफी#शेतकरीन्याय#RohitPawar#Pandharpur
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. सुनील केदार साहेब, सलील देशमुख यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली आणि अन्नत्याग आंदोलनात पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास देऊन उपस्थितांशी संवाद साधला.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन#विनाअट_सरसकट_कर्जमाफी#पंढरपूर
संगम बेट वाळकी (ता. दौंड) येथील योगीराज श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नामदेव महाराज साठे आणि त्यांचे सहकारी किर्तनकर रणजित महाराज शिंदे, सुरज महाराज जराड, रामदास महाराज गव्हाणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अन्नत्याग आदोलनाला पाठींबा दिला. तसंच यावेळी त्यांनी आणलेल्या सोहळ्यातील पादुकांचं मनोभावे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
पंढरपुरातील श्री जय राम स्वामी मठाचे मठाधिपती (वडगाव ज स्वा) श्री. विठ्ठल स्वामी महाराज यांनी भेट घेऊन अन्नदात्यासाठी सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा दिला. तसंच यावेळी प्रस्तावित वाणिज्य कॉरिडोअरसंबंधी चर्चा केली.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
अन्नत्याग आंदोलन – दिवस ३ रा.
पहाटे ५.३० वाजल्यापासूनच भेटून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांची, युवांची रीघ सुरुय. या वाढत्या जनसमर्थनापुढं सरकारला झुकावंच लागेल आणि कोणत्याही अटीशर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावीच लागेल..!
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन#विनाअट_सरसकट_कर्जमाफी#पंढरपूर
ज्यांच्या विचारांना खोली आहे, वैचारिक बैठक पक्की आहे त्या प्रवीणदादा गायकवाड यांनी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी सरकारला यावी, यासाठी महर्षी वाल्मिकी संघ आणि आदिवासी महादेव कोळी समाजाच्यावतीने पंढरपुरात चंद्रभागेमध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी गणेश अंकुशराव, बापू शिंदे यांच्यासह अनेक समाज बांधव, भगिनी उपस्थित होत्या.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
बळीराजाच्या हक्कासाठी, त्याच्या घामाच्या दामासाठी आणि जाचक अटींमुक्त सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित दादा पवार @RRPSpeaks यांनी विठ्ठलाच्या पावन भूमीत, पंढरपुरात सुरू केलेले 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन हे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई आहे!
ज्या शेतकऱ्याने संपूर्ण जगाला पोसलं, आज त्याच्याच हक्कावर गदा आणणाऱ्या या असंवेदनशील सरकारला झुकवल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही.
रोहित दादा, आपला हा संघर्ष महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देईल. आम्ही सर्वजण या लढ्यात तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत!
#अन्नदात्यासाठीअन्नत्याग#शेतकरीकर्जमाफी#RohitPawar
महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची मदत नसून दिशाभूल आहे. निवडणुकीपूर्वी "सातबारा कोरा करू", "संपूर्ण कर्जमाफी देऊ" अशी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आता जाचक अटी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
याच फसव्या कर्जमाफीविरोधात आणि संपूर्ण कर्जमाफी, कोरा सातबारा या रास्त मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आमदार रोहितदादा पवार यांनी पंढरपुरात उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुरू असलेला त्यांचा सत्याग्रह पूर्णपणे योग्य आणि समर्थनीय आहे.
काँग्रेस पक्ष या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत असून सरकारने तातडीने सुधारित जीआर काढून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून हे उपोषण तात्काळ सोडवावे.
दोन दिवसांनंतर मी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून या संघर्षात सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.
#कर्जमाफी