Joined March 2013
1,198 Photos and videos
"खरातला जे कोणी भेटले आहेत, त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावर मोठे संकट येईल." -काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार
2
1
54
3,000
अभ्यास झाला नाही म्हणून सरळ दहावीचा पेपरच चोरला👇 सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेमधून दोन दिवसापूर्वी चोरीला गेलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका काल पोलिसांना मिळाल्या आहेत. याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करणारा विद्यार्थीही दहावीत शिकत असून याच केंद्रावर त्याचा नंबर होता. दहावीच्या भूगोलाच्या पेपरला हा विद्यार्थीही आला होता. मात्र, पेपर सुटल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने हा सर्व प्रकार केल्याची कबुली दिली आहे. इतर पेपर चांगले गेले मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने हे पेपर चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी या अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाची त्याच्या पालकांसमोर चौकशी केली असता त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. चोरी करण्यापूर्वी त्याने या केंद्रावरील स्ट्रॉंग रूमची चांगली पाहणी करुन घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास हा मुलगा इलेक्ट्रिक बाइकवर इलेक्ट्रिक कटर घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने या स्ट्रॉंग रूमला लावलेले कुलूप कटरच्या साह्याने कट केले आणि आत जाऊन प्रश्नपत्रिका असलेली ट्रंक उघडली.  त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिका असलेले दोन गठ्ठे आणि तीन कोऱ्या उत्तर पत्रिका आपल्या सोबत घेऊन तेथून तो पुन्हा घरी आला. यातील एक गठ्ठा फोडून त्याने ती प्रश्नपत्रिका पाहिली होती. पेपर चोरणाऱ्या या मुलाने या प्रश्नपत्रिकेचा गैरवापर केला नसल्याची खात्रीही पोलिसांनी चौकशी करून घेतली असल्याचे समजते. आता उद्या नियमानुसार या विधीग्रस्त संघर्ष बालकास बाल न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
7
1,521
नाशिक! आरोपी अशोक खरात येथील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. याहूनही कळस म्हणजे स्वतः लघुशंका करुन तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला ज्योतिष म्हणणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला. खरातची काळी कृत्य उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे
6
12
96
17,868
पाकिस्तान, इराण , रशिया , चीन, उत्तर कोरिया हे अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील, अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या सभागृह समितीसमोर दिली आहे.
2
308
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करुन धाराशिवकडे परतत असताना मध्यरात्री त्यांच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणीही गंभीर जखमी झाले नसून धनंजय सावंत आणि त्यांचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत.
1
12
1,268
नाशिक! गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. तसेच अशोक खरातचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र हा व्हिडीओ कुणीतरी व्हायरल केल्याचं दिसून येत आहे.
3
20
2,987
बुधवारी संध्याकाळी संपूर्ण भारतात 'धुरंधर: द रिव्हेंज'चे 'पेड प्रिव्ह्यू' शोज सुरू झाले. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या 'पेड प्रिव्ह्यू' शोजचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत; बॉलिवूडचे जुने रेकॉर्डस् तब्बल 340% च्या मोठ्या फरकाने मागे आहेत. चित्रपटाबद्दल असलेल्या प्रचंड उत्सुकतेमुळे आणि चर्चेमुळे, 'धुरंधर 2' ला इतर भारतीय चित्रपटापेक्षा आजवरची सर्वात मोठी 'पेड प्रिव्ह्यू स्क्रीनिंग' स्केल देण्यात आली; केवळ भारतातच 6000 स्क्रीन्सवर या चित्रपटाचे 9000 शोज रिलीज करण्यात आले. Sacnilk' कडील आकडेवारीनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने 18 मार्च 2026 रोजी रिलीज झालेल्या आपल्या 'पेड प्रिव्ह्यू' शोजमधून भारतात 44 कोटींची निव्वळ कमाई केली आहे. यावरुन दिसून येते की या सिनेमाने 025 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागाला मागे टाकले आहे. धुरंधरने रिलीजच्या पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई नोंदवली होती
1
7
85
7,873
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट येथे कंटेनरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर आणि सिमेंटचा बल्कर या दोन वाहनांच्या मध्ये पुढे जात असलेली कार चेपली गेल्याने अपघात झाला. दरम्यान दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळली. यात तिघांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. अंबादास पेटारे (रा. सिंहगड रोड), श्रीकांत जाधव (वय ६३), प्रमोद पवार अशी कारमधील मृत्युमुखींची नावे आहेत. जखमींमध्ये स्वप्नील भुजबळ (३६), नवनाथ भुजबळ (३२, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे), अक्षय गायकवाड (३१, रा. शिक्रापूर), भानुदास गायकवाड (२६, रा. चाकण, खेड) आणि कंटेनरचालक अवधेश राधेश्याम यादव (वय ३७, रा. सहराजा, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
1
7
378
वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६ विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं. वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं.
2
18
552
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून मानधनात वाढ करण्यात येणार असून याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल २०२६ पासून देण्यात येणार आहे.
6
534
NASA च्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कारण, मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करणारे घटक सापडले आहेत.  नासाचे रोव्हर क्युरिऑसिटी मंगळावर फिरत असताना एका साध्या खडकावर आदळले. 899 किलोग्रॅम वजनाच्या रोव्हरने मऊ खडकाला चिरडले तेव्हा आतून पिवळे स्फटिक बाहेर पडले. हे स्फटिक शुद्ध सल्फर होते, ज्याला गंधक असेही म्हणतात.
20
1,619
मनरेगा अंतर्गत कुशल व अकुशल कामांच्या देयकांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘स्पर्श’ ही नवीन संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली असून, लवकरच सर्व प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
6
637
'गुलजार ए रजा' या संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर बाबी समोर आल्याने या प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
4
464
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचलं होतं. पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचं काम सुरू असल्याने मुख्य महामार्गावरची वाहतुकीला मोठा फटका बसला. सुमारे एक तासभर जोरदार बसलेल्या अवकाळी पावसाने सेवा रस्त्यावरील सखल भागात कंबरे इतकं पाणी साचलं होतं. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पाऊस थांबल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
2
14
1,062
पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगटासह पडलेल्या पावसानं भोर तालुक्यातील काही गावांना झोडपलं. पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ, किकवी, हरिश्चंद्री भागात वाऱ्यासह गारांचा पाऊस पाहायला मिळाला. सुमारे अर्धा तास बरसलेल्या पावसाने परिसरात पाणीच पाणी झालं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाळी. पाऊसामुळं हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र शेतातील पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे.
7
618
बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' असे नाव दि. ३१ मे २०२३ रोजी देण्यात आले होते. आता बारामती येथील शासकीय वैद्यकीय संलग्नित रूग्णालयासही 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' यांचे नाव देण्याचा निर्णय दि. १३ मार्च २०२६ रोजी शासनाने घेतला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
9
711
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी खळबळजनक दावा केला. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब मारले गेले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. तथापि, इराणने अद्याप खतीब यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.
13
689
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ साठी निवडणूक आयोगाकडून ३ महत्त्वाचे निरीक्षक दाखल झाले असून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
3
217
गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लिम तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून आज शेकडो हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
8
476
आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली असून सुमारे १३४ कोटी सक्रिय आधारधारक आहेत. आधारसंबंधित डेटा साठवण आणि प्रक्रिया पूर्णपणे भारतातच केली जाते.
11
421