📍 श्री बृहन्मठ होटगी शाखा,वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मठ,अक्कलकोट रोड
पवित्र पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या इष्टलिंग महापूजा, जगद्गुरु उत्सव, धर्मसभा व सांगता समारंभ या पावन कार्यक्रमास उपस्थित राहून रंभापुरी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ.विरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, यांच्या सह विविध महंतांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले.
यावेळी वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मठाच्या भव्य सभा मंडपासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे अभिवचन जगद्गुरूंच्या साक्षीने दिले. विष्णुपंत नगरात विविध रस्त्यासाठी ४० लाख रुपये निधी, मल्लिकार्जुन नगर येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित मुख्य रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात सुरू असून तसेच परिसरातील रस्ते व इतर मूलभूत सुविधांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामे करण्यात आली असून, भविष्यातही या भागाचा व सर्वसामान्य सोलापूरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि जनकल्याणाच्या कार्यात यश मिळावे यासाठी परमपूज्य जगद्गुरूंचे आशीर्वाद घेतले.
परमपूज्य गुरुवर्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून समाजाच्या सुख, समृद्धी, ऐक्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी,माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पिठाचे डॉ.शैलेश पाटील,नगरसेवक श्री अजय पोन्नम सर, मीनाक्षी ताई कडगंची, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुषांत धुत्तरगांवकर, प्रकाश काका वाले, मल्लिनाथ काका मसरे, अप्पू कडगंची आदी उपस्थित होते.
#पुरुषोत्तममास #जगद्गुरु #चंद्रशेखरशिवाचार्यमहास्वामीजी #इष्टलिंगमहापूजा #धर्मसभा #सोलापूर #संस्कृती #BJP #SolapurDevelopment