साठे गार्डन येथे प्रभागातील शुक्रवार पेठ येथील आरोग्य कोठीवरील सर्व सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली. स्वच्छतेसंदर्भातील प्रश्न, अडचणी आणि प्रत्यक्ष कामातील अडथळे यांचा सखोल आढावा घेतला.
संपूर्ण प्रभागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, परिणामकारक आणि शिस्तबद्ध कशी करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक अडचण मूळापर्यंत जाऊन समजून घेत, त्यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी माझ्यासह प्रभागातील नगरसेवक श्री राघवेंद्र बापू मानकर, नगरसेविका सौ स्वरदा ताई बापट, नगरसेविका सौ स्वप्नाली ताई पंडित, श्री नीलेश जी कदम, श्री किरण जी जगदाळे, श्री दिलीप जी पवार, श्री सोहन जी भोसले, श्री प्रणव गंजीवाले, श्री अनिल तेलवडे, श्री अशोक कदम, श्री संजय जी हसिजा, श्री मुकेश जी राजावत, श्री किशोर जी नवले, श्री चेतन मुंढे, श्री रवी मावडीकर, श्री नागेश पंडित, श्री पुरण हुडके, श्री सचिन मुजुमले, श्री स्वानंद गोळे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत सफाई अधिकारी व स्वच्छ संघटनेचे प्रतिनिधी यांनी सकारात्मक सूचना मांडल्या.
स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा व प्रभाग क्रमांक २५ घडवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील.
#kunalstilak #punecity #cleanlife #cleanlinesscampaign