आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी प्रत्येक गुरुवारी सायकलने कार्यालयात येण्याचा संकल्प केला आहे.
त्या अनुषंगाने आज घर ते महापालिका कार्यालय असा सायकलने प्रवास केला. विशेष आनंदाची बाब म्हणजे माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत धाडस अकॅडमीचे विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले.
ऊर्जा बचत, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यासाठी प्रत्येकाने छोटंसं पाऊल उचललं, तरी मोठा बदल घडू शकतो.
#CycleToWork #FuelSaving #GreenCity #PimpriChinchwad #NoVehicleDay #Pune #SupportingNation