Filter
Exclude
Time range
-
Near
“सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचं वय जाणवतं का?” हा प्रश्न थोडा विचित्र वाटू शकतो. पण अनेक वर्षांच्या practice मध्ये एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. काही लोकांचं वय वाढतं… पण त्यांची ऊर्जा टिकून राहते. तर काही लोकांचं वय वाढण्याआधीच… त्यांच्या शरीराला वय जाणवायला लागतं. आणि त्याचा पहिला संकेत अनेक वेळा सकाळी दिसतो. 1 सकाळी उठल्यावर अंगात ताकद वाटते का? का अजून थोडं पडून राहावंसं वाटतं? हा फक्त आळस नसतो. अनेक वेळा तो recovery चा संकेत असतो. 2 सकाळी उठल्यावर पहिला विचार काय असतो? 🙂 “चल, दिवस सुरू करूया.” 😩 “अरे देवा… पुन्हा एक दिवस.” हा फक्त मूड नसतो. अनेक वेळा ही शरीराच्या recovery, ऊर्जा आणि ताणाची गोष्ट असते. 3 बेडवरून उठताना शरीर साथ देतं का? 😵 कंबर 😣 गुडघे 😩 मान यांना वेळ लागतो का ? अनेक लोक यालाच “वय” समजतात. पण अनेक वेळा प्रश्न वयाचा नसतो… प्रश्न शरीराच्या स्थितीचा असतो. 4 मला अनेकदा एक गोष्ट जाणवते काही लोक 60 वर्षांचे असतात… पण त्यांच्याबरोबर चालताना तुम्हाला त्यांचं वय जाणवत नाही. तर काही लोक 45 वर्षांचे असतात… आणि त्यांना स्वतःलाच स्वतःचं वय जाणवत राहतं. फरक वर्षांचा नसतो. फरक शरीर कसं जगलं याचा असतो. 5 जिने दिसले की काय वाटतं? 🙂 काही हरकत नाही. 😓 शक्य असेल तर लिफ्ट शोधूया. हा सुद्धा एक health marker आहे. कारण शरीराची क्षमता अनेक वेळा रोजच्या छोट्या कृतींमध्ये दिसते. 6 सकाळी आरशात स्वतःकडे पाहताना काय वाटतं? 🙂 “ठीक आहे.” 😓 “मी खूप थकल्यासारखा दिसतोय.” अनेक वेळा चेहरा सुद्धा रात्रीच्या recovery ची गोष्ट सांगत असतो. 7 संशोधनही वारंवार एक गोष्ट सांगतं. आपण किती वर्षांचे आहोत यापेक्षा… आपण किती सक्रिय आहोत, किती हालचाल करतो, किती चांगली झोप घेतो, किती स्नायू टिकवून ठेवतो, याचा आरोग्यावर जास्त परिणाम होतो. 8 “तुमचं वय किती आहे?” यापेक्षा… “तुमच्या शरीराला स्वतःचं वय किती वाटतं?” हे उत्तर अनेक वेळा जास्त महत्त्वाचं असतं. आधार कार्डवरील वय आणि शरीराला जाणवणारं वय हे नेहमी सारखं नसतं. सकाळी उठल्यावर: 🙂 उत्साह वाटतो का? 💪 ताकद वाटते का? 🚶 हालचाल सहज होते का? 😴 शरीर refresh वाटतं का? यावरून अनेक वेळा शरीर स्वतःचं वय सांगत असतं. काही लोक वाढदिवस मोजतात… आणि शरीर recovery मोजत असतं. ❤️ 📱 एक छोटं अपडेट… Android आणि iOS App Launch आता अगदी जवळ आलं आहे ज्यामुळे आरोग्य फक्त वाचलं जाणार नाही, तर समजून घेतलं जाईल, ट्रॅक केलं जाईल आणि गोपनीयपणे जपलं जाईल. Like | Repost | Follow Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉@KulkarniRL #MorningHealth #JustForHearts #MetabolicHealth #LifestyleMedicine
3
48
1,531
Vitamin B12 = 180 हा report पाहिला की माझ्या मनात एक “Virtual Patient” उभा राहतो… तो OPD मध्ये येतो. Reports चा फाईल घेऊन. आणि अनेकदा एकच वाक्य सांगतो… “डॉक्टर, काहीतरी बरोबर वाटत नाही…” पण नेमकं काय बरोबर वाटत नाही हे सांगणं त्यालाही कठीण जातं. 1️⃣ थकवा असतो. पण इतका नाही की लोकांना दिसेल. 2️⃣ काम चालू असतं. पण पूर्वीसारखी ऊर्जा, उत्साह जाणवत नाही. 3️⃣ नावं, शब्द किंवा छोट्या गोष्टी आठवायला थोडा जास्त वेळ लागतो. 4️⃣ पुस्तक वाचताना, मीटिंगमध्ये किंवा संभाषणात लक्ष वारंवार विचलित होतं. 5️⃣ हातापायात मुंग्या, बधिरपणा, जळजळ किंवा विचित्र sensations जाणवू शकतात. 6️⃣ झोप घेतली तरी ताजेतवाने वाटत नाही. 7️⃣ जिना चढणं, चालणं, काम करणं सगळं होत असतं… पण शरीर आणि मन दोन्ही पूर्वीसारखी साथ देत नाहीत. 8️⃣ आणि गंमत म्हणजे… अनेकदा बाकीचे reports जवळपास normal असतात. म्हणून ही माणसं स्वतःलाच समजावतात… “वय वाढतंय…” “Stress असेल…” “कदाचित माझाच गैरसमज असेल…” 🎯 Vitamin B12 च्या रुग्णांमध्ये एक गोष्ट वारंवार पाहिली आहे… ते अनेकदा आजारी दिसत नाहीत. पण त्यांना स्वतःला पूर्वीसारखं वाटतही नाही. हा report मला अनेकदा Vitamin पेक्षा जास्त… मेंदू, मज्जातंतू आणि ऊर्जा यांची कथा सांगतो. Vitamin B12 = 180 पाहिल्यावर मला एकच प्रश्न पडतो… “तुम्ही आजारी आहात का?” यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे… “तुम्हाला खरंच पूर्वीसारखं वाटतंय का?” कारण काही वेळा… रोग सापडण्यापूर्वीच शरीर आपल्याला सांगत असतं की, “मी अजून काम करतोय… पण पूर्वीसारखा राहिलेलो नाही.” Like | Share | Subscribe Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ReportToReality #VitaminB12 #ClinicalWisdom
10
19
128
6,242
आज OPD मध्ये UPI मुळे त्रासलेला एक Diabetes चा रुग्ण भेटला. 60 वय. पत्नी आणि मुलासोबत आले होते. Sugar, reports, medicines याबद्दल चर्चा सुरू होती. अचानक काका थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाले… “डॉक्टर, आता UPI मुळे जगणं अवघड झालंय.” मी थोडा confused . UPI आणि Diabetes यांचा संबंध माझ्या तरी लक्षात येत नव्हता. मग खरी गोष्ट बाहेर आली. घरचे अनेक वर्षांपासून Diabetes सांभाळत होते. काका ही काळजी घेत होतेच , पण पथ्य बंधनांनी थोडे त्रस्त पण काकांनी स्वतःसाठी एक छोटासा मार्ग शोधला होता. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चालण्यात… एखादा वडा-पाव. एखादी भेळ. कधी एखादा गोड पदार्थ. आणि मग घरी परत. 🙂 सगळं व्यवस्थित चाललं होतं. समस्या तेव्हा सुरू झाली… जेव्हा जवळच्या मिठाईवाल्याने एके दिवशी काकूंना विचारलं… “काय हो, काका दोन-तीन दिवस दिसले नाहीत?” काकू आश्चर्यचकित. मुलगा आश्चर्यचकित. आणि काका… थोडेसे अडचणीत. 🙂 पुढे चौकशी झाली. मग UPI transactions तपासले गेले. सकाळच्या walk नंतरचे. संध्याकाळच्या walk नंतरचे. आणि काकांच्या “गुप्त खाद्य मोहिमा” इतिहासजमा झाल्या. मी हसत विचारलं… “मग आता काय करणार?” क्षणाचाही विलंब न लावता उत्तर आलं… “आता पुढे सगळं cash मध्ये!” संपूर्ण OPD हसायला लागली. काकू, मुलगा, मी… आणि शेवटी काकाही. 🙂 त्या क्षणी reports, sugar, medicines… सगळं काही दोन मिनिटांसाठी बाजूला गेलं. आणि एक साधा, खट्याळ, मनमोकळा माणूस समोर आला. practice मध्ये हजारो रुग्ण भेटतात. पण काही stories reports मुळे लक्षात राहत नाहीत… त्या अशा छोट्या संवादांमुळे लक्षात राहतात. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #OPDStories #ClinicalWisdom #JustForHearts
5
9
183
12,775
सकाळी उठल्यावर पहिली 30 मिनिटं तुमच्याबद्दल काय सांगतात? अनेक वेळा reports बदलण्यापूर्वी शरीर बदललेलं असतं. आणि त्याचे संकेत सकाळच्या पहिल्या ३० मिनिटांत दिसायला लागतात. हजारो ECG, Echo, Sugar आणि BP reports पाहिल्यानंतरही… मला आजही तुमच्या दिवसाची पहिली 30 मिनिटं खूप काही सांगून जातात असं वाटतं. 1 सकाळी उठल्यावर पहिला विचार कोणता येतो? 🙂 “आजचा दिवस छान जाईल.” 😓 “आज पुन्हा खूप काम आहे.” 😟 “काय काय करायचं आहे?” हे फक्त विचार नसतात. ते अनेक वेळा तुमच्या stress load बद्दल संकेत देत असतात. 2 उठल्यावर शरीर कसं वाटतं? 🙂 हलकं? 😐 सामान्य? 😵 जड? अनेक लोक BP, Sugar आणि Weight मोजतात पण शरीर हलकं वाटतं की जड… हे मोजत नाहीत. माझ्या अनुभवात हा एक महत्त्वाचा health marker आहे. 3 उठल्याबरोबर तुम्ही काय शोधता? 💧 पाणी? ☕ चहा? 📱 मोबाईल? अनेक वेळा ही निवड सुद्धा शरीर आणि मनाच्या स्थितीबद्दल बरंच काही सांगते. 4 तुम्हाला भूक लागते का? काही लोक उठल्यावर लगेच नाश्ता शोधतात. काहींना दुपारपर्यंत भूक लागत नाही. दोन्ही गोष्टींच्या मागे: 🍬 metabolism 😴 sleep ⚖️ lifestyle यांचा सहभाग असू शकतो. 5 तुमची ऊर्जा कशी असते? हा प्रश्न मी OPD मध्ये अनेकदा विचारतो. कारण… सकाळी ऊर्जा कशी वाटते हे अनेक वेळा संपूर्ण दिवसाचं forecast असतं. 6 एक गोष्ट संशोधनातही वारंवार दिसून येते , जे लोक सकाळी: 🥱 थकलेले वाटतात 😴 unrefreshed उठतात ⚡ ऊर्जा कमी जाणवते त्यांच्यात अनेक वेळा: 😴 poor sleep quality 😓 chronic stress ⚖️ metabolic problems 🫁 sleep apnea यापैकी एक किंवा अधिक घटक आढळतात. म्हणूनच… सकाळची ऊर्जा ही फक्त feeling नसते. ती आरोग्याचा एक महत्त्वाचा marker असू शकते. 7 तुम्हाला हालचाल करायला वेळ लागतो? उठल्यावर: 🚶 चालायला 🪑 उठायला 🧍 सरळ उभं राहायला वेळ लागत असेल… तर शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. 8 OPD मध्ये मी अनेकदा एक प्रश्न विचारतो “सकाळी उठल्यावर तुम्हाला स्वतःच्या शरीरात राहायला आवडतं का?” विचित्र प्रश्न वाटेल. पण उत्तर खूप काही सांगून जातं. काही लोक म्हणतात: 🙂 “हो, छान वाटतं.” तर काही म्हणतात: 😵 “डोकं जड असतं.” 😩 “अंग जड असतं.” 🥱 “ऊर्जा नसते.” हा प्रश्न BP machine विचारत नाही. Sugar report विचारत नाही. Smart Watch सुद्धा विचारत नाही. पण आरोग्य समजून घ्यायचं असेल तर हा प्रश्न खूप काही सांगून जातो. उद्या सकाळी फक्त 30 मिनिटं स्वतःचं निरीक्षण करून पाहा. कदाचित शरीर तुम्हाला काही महत्त्वाचं सांगत असेल… आणि आपण ते अनेक वर्षांपासून ऐकतच नसू. आरोग्याची काही महत्त्वाची उत्तरं lab मध्ये सापडतात… आणि काही रोज सकाळी आपल्या शरीरात. तुमच्या सकाळच्या पहिल्या ३० मिनिटांत सर्वात आधी काय घडतं? ☕ चहा 📱 मोबाईल 💧 पाणी 🚶 हालचाल 😴 पुन्हा झोप Comments मध्ये नक्की सांगा 📱 एक छोटं अपडेट… Android आणि iOS App Launch आता अगदी जवळ आलं आहे लाखो वाचकांबरोबरचा संवाद आता पुढच्या टप्प्यात जाणार आहे… जिथे आरोग्य फक्त वाचलं जाणार नाही, तर समजून घेतलं जाईल, ट्रॅक केलं जाईल आणि गोपनीयपणे जपलं जाईल. Like | Repost | Follow Dr Ravindra L Kulkarni , MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #MorningHealth #MetabolicHealth #JustForHearts #LifestyleMedicine
7
14
119
6,644
ICU round दरम्यान आज पुन्हा एक विचार मनात आला… आपण अनेकदा समजतो की आपल्या निर्णयांवर आपला पूर्ण ताबा असतो. पण खरंच असतं का? एका ओळखीच्या व्यक्तीला Heart Attack आला की… अचानक स्वतःच्या छातीत धडधड जाणवायला लागते. Road Rage च्या बातम्या वाढल्या की… रात्री गाडी चालवताना नकळत सावधपणा वाढतो. NEET च्या चर्चा सुरू झाल्या की… फक्त विद्यार्थीच नाही, तर संपूर्ण घर तणावाखाली जातं. कारण माणूस फक्त स्वतःच्या आयुष्यात जगत नाही… तो आजूबाजूच्या वातावरणातही जगत असतो. आज ICU मध्ये 19 वर्षांची मुलगी दाखल होती. उलट्या, अशक्तपणा… सुरुवातीला कोणीही स्पष्ट माहिती देत नव्हती पण अनुभव काहीतरी वेगळंच सांगत होता. थोडं खोलात गेल्यावर कबुली मिळाली… तिने विषारी पावडर घेतली होती. मी सहज विचारलं… “Rat killing औषध?” अनेकदा उत्तर बहुतेक वेळा “हो” असतं. ती म्हणाली… “नाही.” मी पुन्हा विचारलं… “मग?” ती शांतपणे म्हणाली… “Cockroach मारायची पावडर.” क्षणभर मी शांत झालो. कारण रुग्णाने नाही… माझ्या अनुभवाने चूक केली होती. 🙂 आणि पुढच्याच क्षणी मला हसू आलं. कारण उत्तरात Cockroach होतं… पण प्रश्न माणसांचा होता. मागील काही दिवस Cockroach आपल्या आजूबाजूला खूप वाढली आहेत. घरात नाही… फोनमध्ये. Reels मध्ये. Memes मध्ये. चर्चांमध्ये. Algorithms मध्ये. थोडा विनोद बाजूला ठेवला तर… त्या क्षणी पुन्हा एकदा जाणवलं… आपण अनेकदा समजतो की आपण फक्त माहिती पाहतो. पण खरं म्हणजे… माहितीही आपल्याला घडवत असते. आपण ज्या गोष्टी वारंवार पाहतो… ज्या चर्चा वारंवार ऐकतो… ज्या भीती, ज्या कल्पना, ज्या Trends आपल्या भोवती फिरत असतात… त्या हळूहळू आपल्या विचारांचा भाग बनतात. आणि काही वेळा… आपल्या निर्णयांचाही. माणूस अचानक बदलत नाही. तो रोज थोडाथोडा बदलत असतो. त्याने पाहिलेल्या गोष्टींनी. ऐकलेल्या गोष्टींनी. मानलेल्या गोष्टींनी. म्हणूनच… आरोग्य म्हणजे फक्त आपण काय खातो हे नाही. आरोग्य म्हणजे आपण मनाला रोज काय खाऊ घालतो हे सुद्धा आहे. कारण त्याचे परिणाम कधी OPD मध्ये दिसतात. आणि कधी ICU मध्ये. Like | Share | Subscribe Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ClinicalWisdom #HumanBehaviour
1
2
42
2,911
सकाळी उठल्यावर सर्वात आधी चहा का लागतो? अनेक लोक म्हणतात: चहा मिळाला कीच डोळे उघडतात. पहिला चहा झाल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. बाकी सगळं कमी करतो Doctor… पण सकाळच्या एका चहातली साखर चालेल ना? हा प्रश्न इतक्या वेळा ऐकला आहे की आता तो OPD चा नियमित भागच झाला आहे. अनेक वेळा लोकांना चहा लागत नाही… त्यांना जागं वाटण्यासाठी काहीतरी लागत असतं. 1 सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. सकाळचा चहा हा अनेकांच्या दिवसाचा भाग असतो. घरात… ऑफिसमध्ये… प्रवासात… गप्पांमध्ये… चहा अनेकांच्या दिनक्रमात घट्ट बसलेला असतो. म्हणून प्रश्न चहाचा नाही… प्रश्न त्याच्यावरच्या अवलंबित्वाचा आहे. 2 शरीराला चहा लागतो की जागेपणा? हा खरा प्रश्न आहे. रात्रभर शरीराची recovery चांगली झाली असेल… तर अनेक लोक चहाशिवायही फ्रेश उठतात. पण जर: 😴 झोप नीट झाली नसेल 😓 ताण जास्त असेल 📱 रात्री उशिरापर्यंत स्क्रीन असेल 🧠 मेंदू थकलेला असेल तर शरीराला सकाळी “स्टार्ट बटन” हवं असतं. आणि अनेकांच्या बाबतीत ते स्टार्ट बटन म्हणजे चहा. 3 OPD मध्ये एक pattern वारंवार दिसतो. जे लोक म्हणतात: “Doctor, चहाशिवाय माझं काही चालत नाही.” त्यांच्यात अनेक वेळा: 😴 Sleep Quality कमी 🥱 सकाळचा थकवा 😓 Chronic Stress ⚖️ Metabolic Problems यापैकी काहीतरी सापडतं. 4 एक गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटेल सकाळचा चहा अनेक वेळा समस्येचं कारण नसतो… तो समस्येचा संकेत असतो. जर शरीर व्यवस्थित recharge झालं असेल… तर त्याला बाहेरून जागं करण्याची गरज कमी पडते. 5 मग सकाळच्या चहातली साखर चालते का? हा प्रश्न मला जवळजवळ रोज विचारला जातो. माझं उत्तर अनेकदा असतं: फक्त त्या एका चमच्याकडे पाहू नका… संपूर्ण दिवसाकडे पाहा. जर: 🥗 खाणं संतुलित असेल 🚶 हालचाल चांगली असेल ⚖️ वजन नियंत्रणात असेल 🍬 Sugar नियंत्रणात असेल तर अनेक लोकांसाठी सकाळच्या एका चहातील थोडी साखर हा सर्वात मोठा प्रश्न नसतो. पण… त्या एका चमच्याच्या नावाखाली दिवसभर बिस्कीट, गोड पदार्थ, साखरयुक्त पेय आणि अतिरिक्त calories वाढत असतील… तर picture बदलतं. 6 चहाचे फायदेही आहेत. योग्य प्रमाणात घेतलेला चहा: ☕ जागरूकता वाढवू शकतो 🧠 लक्ष केंद्रित करायला मदत करू शकतो 🙂 मूड सुधारू शकतो म्हणून चहा वाईट आहे असा संदेश अजिबात नाही. 7 मग कॉफी चांगली की चहा? हा प्रश्न पुढचा आहे पण आजच्या पोस्टचा मुद्दा पेय कोणतं आहे हा नाही… प्रश्न हा आहे की सकाळी तुम्हाला जागं वाटण्यासाठी आधार का लागतोय? 8 मी अनेकदा एक उदाहरण देतो सकाळी मोबाईलची battery किती आहे ते आपण पाहतो… पण शरीराची battery किती charge झाली आहे हे अनेकदा तपासतच नाही. आणि सकाळी चहाची तीव्र गरज वाटणं… हा अनेक वेळा त्याच battery चा पहिला इशारा असतो. 9 म्हणून उद्या सकाळी एक छोटा प्रयोग करा. चहा घेण्याआधी स्वतःला विचारा: 👉 मला चहा हवा आहे की ऊर्जा? 👉 मी फ्रेश उठलो आहे का? 👉 कालची झोप कशी होती? 👉 मी तणावाखाली आहे का? 👉 चहा नसेल तर मी ठीक राहीन का? या प्रश्नांची उत्तरं अनेक वेळा चहापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. 📱 एक छोटं अपडेट… Android आणि iOS App Launch आता अगदी जवळ आलं आहे 🙂 लाखो वाचकांबरोबरचा संवाद आता पुढच्या टप्प्यात जाणार आहे… जिथे आरोग्य फक्त वाचलं जाणार नाही, तर समजून घेतलं जाईल, ट्रॅक केलं जाईल आणि गोपनीयपणे जपलं जाईल. Like | Repost | Follow Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 Just for Hearts #MorningHealth #MetabolicHealth #JustForHearts
6
18
183
10,844
HbA1c = 6.4 हा report पाहिला की माझ्या मनात एक “Virtual Patient” उभा राहतो… तो स्वतःला Diabetes चा रुग्ण समजत नसतो. आणि खरं सांगायचं तर… तो चुकीचाही नसतो. कारण तो अनेकदा म्हणतो… Sugar थोडीशी वाढली आहे. अजून Diabetes झालेला नाही बाकी मी ठीक आहे. पण अनेक वर्षांच्या अनुभवातून मला अनेकदा वेगळीच कथा दिसते… 1️⃣ कंबर वाढलेली असते. वजन फार वाढलेलं नसतं. 2️⃣ Energy पूर्वीसारखी वाटत नाही. पण ते वय, काम किंवा stress वर ढकललं जातं. 3️⃣ जेवणानंतर झोप येणं, सुस्ती किंवा energy crash जाणवत असतो. 4️⃣ Fatty Liver, Triglycerides, Uric Acid किंवा BP यापैकी एखादा साथीदार आधीच आलेला असू शकतो. 5️⃣ झोप, stress, activity आणि routine यांचा परिणाम शरीरावर दिसायला लागलेला असतो. 6️⃣ Reports मध्ये Sugar नुकतीच दिसायला लागते… पण Insulin Resistance अनेकदा वर्षानुवर्षे आधीपासून चालू असते. 7️⃣ आणि सर्वात महत्त्वाचं… हा report मला Sugar बद्दल कमी… आणि Metabolism बद्दल जास्त सांगतो. Sugar वाढणं अनेकदा शेवटी दिसतं. #Metabolism बिघडायला सुरुवात खूप आधी झालेली असते. #HbA1c 6.4 हा Diabetes चा report कमी आणि दिशा बदलण्याची संधी जास्त असतो. ते फक्त शांतपणे सांगत असतं… जे सुरू आहे ते चालू ठेवलंत तर एक दिशा आहे… आणि बदल केलात तर दुसरी.” #Diabetes अचानक होत नाही. तो अनेक वर्षांच्या Metabolic प्रवासाचा पुढचा टप्पा असतो. Like | Share | Follow Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ReportToReality #HbA1c #MetabolicHealth #ClinicalWisdom
4
7
81
3,205
Anu Lala (Anuradha Lala-Trindade) retweeted
Congratulations to Roxana Mehran, MD, FACC, FACP, FCCP, FESC, FAHA, FSCAI, on receiving the 2026 Andreas Grüntzig Ethica Award for her impactful work aimed at improving outcomes for patients undergoing interventional procedures. The Award is the highest honor given out by @PCRonline to recognize and celebrate people who have made outstanding contributions to interventional procedures and patient care. View a timeline of Dr. Mehran’s achievements: youtu.be/SrwlwM7LhR0 Group Photo from left to right: Thomas Cuisset, Nieves Gonzalo, Christiana Dangas, Roxana Mehran, George Dangas, Bernard Prendergast, Nicolas Dumonteil #CardioX #Cardiology @Drroxmehran
1
1
10
1,011
सकाळी उठल्यावर डोकं जड का वाटते ? सकाळी डोकं जड वाटणं हा फक्त एक symptom नाही… तो अनेक वेळा शरीराच्या रात्रीच्या “quality report” मधला पहिला संकेत असतो 1 रात्र म्हणजे शरीराची Repair Shift आपण झोपलो तरी शरीर झोपत नाही. ❤️ हृदय काम करत असतं 🧠 मेंदू स्वतःची साफसफाई करत असतो 💧 द्रव संतुलन चालू असतं 🍬 metabolism काम करत असतं म्हणूनच सकाळी शरीर कसं वाटतं… हा एक महत्त्वाचा health marker असतो. 2 झोप झाली म्हणजे recovery झालीच असं नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. OPD मध्ये मला अनेकदा असे रुग्ण भेटतात… ज्यांची: 📈 BP ठीक असतो 🍬 Sugar ठीक असते ❤️ ECG ठीक असतो 🩺 Echo ठीक असतो पण एक तक्रार कायम असते “ सकाळी फ्रेश वाटत नाही.” 3 एक गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटेल काही वेळा शरीराला झोपेची कमतरता नसते… चांगल्या झोपेची कमतरता असते. 7-8 तास बेडवर पडून राहणं आणि 7-8 तास quality sleep मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 4 घोरणं आणि Sleep Apnea हे सर्वात जास्त दुर्लक्षित कारणांपैकी एक आहे. जर: 😪 मोठ्याने घोरणं 😴 रात्री वारंवार जाग येणं 🥱 दिवसभर झोप येणं 😵 सकाळी डोकं जड वाटणं असं असेल… तर शरीर रात्रभर पूर्ण recovery करत नसण्याची शक्यता असते. 5 BP चा संबंधही महत्त्वाचा असू शकतो. काही लोकांमध्ये: 📈 सकाळी BP जास्त असतो आणि त्यासोबत: 😵 डोकं जड वाटणं 😣 मानेत ताण 😑 अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. 6 कमी पाणी पिणंही कारण असू शकतं. विशेषतः: ☀️ उन्हाळ्यात 🏃 व्यायाम करणाऱ्यांमध्ये 💊 काही औषधांमध्ये रात्रभरच्या fluid loss मुळे सकाळी डोकं जड वाटू शकतं. 7 पण माझ्या अनुभवात… सर्वात मोठा culprit अनेक वेळा stress असतो. शरीर झोपलेलं असतं… पण मेंदू पूर्ण रात्र काम करत असतो. कालची चिंता… उद्याची काळजी… न सुटलेले प्रश्न… यांची किंमत अनेक वेळा सकाळी मोजावी लागते. 8 मी अनेकदा सांगतो सकाळी मोबाईलची battery किती आहे ते आपण पाहतो… पण शरीराची battery किती charge झाली आहे हे अनेकदा तपासतच नाही. आणि सकाळी डोकं जड वाटणं म्हणजे अनेक वेळा त्याच battery चा पहिला इशारा असतो. सकाळी उठल्यावर शरीर काय सांगतंय… याकडे लक्ष द्या. 9 एक छोटा Self-Test करा उद्या सकाळी स्वतःला विचारा: 👉 मी फ्रेश उठलो का? 👉 घोरणं आहे का? 👉 रात्री किती वेळा जाग आली? 👉 काल पुरेसं पाणी घेतलं होतं का? 👉 BP नियंत्रणात आहे का? 👉 मी सतत तणावात आहे का? काही वेळा योग्य प्रश्न विचारले… तर उत्तर शरीर आधीच देत असतं. 📱 एक छोटं अपडेट… Android आणि iOS App आता Launch च्या अगदी उंबरठ्यावर आहेत Posts वाचण्यापासून… स्वतःच्या आरोग्यप्रवासात सक्रिय सहभागी होण्यापर्यंतचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. Like | Share | Follow Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 Just for Hearts #MorningHealth #MetabolicHealth #Sleep #JustForHearts
2
17
149
6,186
सकाळची पहिली लघवीसुद्धा शरीराचा एक महत्त्वाचा health report असू शकते. आणि हा report रोज मोफत मिळतो 1 सकाळची पहिली लघवी म्हणजे शरीराचा “Night Shift Report” रात्रभर: ❤️ हृदय काम करत असतं 💧 Kidney द्रव संतुलित करत असतात 🍬 Sugar बदलत असते 🧠 Hormones काम करत असतात सकाळची पहिली लघवी म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा एक छोटासा summary report असतो. 2 सर्वात आधी रंगाकडे लक्ष द्या. सकाळची लघवी थोडी गडद असू शकते. कारण रात्रभर आपण पाणी पित नाही. पण: 💧 फिकट पिवळा रंग सामान्यतः चांगला मानला जातो. ⚠️ खूप गडद रंग वारंवार दिसत असेल तर hydration, औषधे किंवा इतर कारणांकडे लक्ष द्यावं लागतं. 3 खूप स्वच्छ (crystal clear) लघवी दिसणं हे नेहमीच आदर्श नसतं. अनेकांना वाटतं: “जितकं जास्त पाणी तितकं चांगलं.” पण शरीराला संतुलन हवं असतं. उद्दिष्ट overhydration नाही… उद्दिष्ट proper hydration आहे. 4 सकाळच्या लघवीचे प्रमाण (volume) सुद्धा काही सांगत असते. जर वारंवार: 💧 खूप कमी लघवी होत असेल तर dehydration चा विचार करावा लागतो. आणि जर: 🚽 खूप जास्त प्रमाणात होत असेल तर पाण्याचे प्रमाण, औषधे, Sugar किंवा इतर कारणांकडे लक्ष द्यावं लागतं. 5 फेस (foam) दिसला तर? एक-दोन वेळा दिसणारा फेस म्हणजे नेहमीच kidney चा आजार असतो असं नाही. पण: जर वारंवार फेस दिसत असेल… तर पुढे तपासणीची गरज असू शकते. 6 रात्री लघवीसाठी उठणं हा फक्त वयाचा भाग आहे का? , नेहमीच नाही. OPD मध्ये मी अनेकदा पाहतो: लोक म्हणतात : Sir, वय झालंय म्हणून उठतो. पण काही वेळा यामागे: 😴 खराब झोप 🍬 Diabetes 🚹 Prostate ❤️ Heart Failure 💊 औषधे अशी कारणे असू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… याचा परिणाम recovery वर होतो. 7 म्हणून मी अनेकदा सांगतो लघवी ही फक्त kidney ची गोष्ट नसते ती अनेक वेळा सांगत असते: 💧 Hydration कसं आहे 😴 Sleep quality कशी आहे 🍬 Metabolism कुठे चाललं आहे ❤️ Circulation कसं आहे 8 OPD मध्ये मला वारंवार जाणवणारी गोष्ट… लोक reports कडे लक्ष देतात. पण शरीर रोज देत असलेल्या संकेतांकडे नाही. सकाळची पहिली लघवी हा त्यापैकीच एक संकेत आहे. 9 एक छोटा Self-Test करा उद्या सकाळी स्वतःला विचारा: 👉 रंग कसा आहे? 👉 फेस वारंवार दिसतो का? 👉 रात्री किती वेळा उठावं लागलं? 👉 काल पाणी किती घेतलं? 👉 Sugar आणि BP नियंत्रणात आहेत का? काही वेळा शरीर आधी संकेत देतं… रिपोर्ट नंतर बदलतात. 📱 एक छोटं अपडेट… लवकरचं Android आणि iOS App Launch होत आहेत 🙂 आरोग्य फक्त वाचण्यापासून… ते समजून घेण्यापर्यंत आणि ट्रॅक करण्यापर्यंतचा प्रवास आता सुरू होणार आहे. Like | Repost | Follow Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #MorningHealth #MetabolicHealth #JustForHearts
6
27
267
14,116
Serum Creatinine = 1.8 हा report पाहिला की माझ्या मनात एक “Virtual Patient” उभा राहतो… तो ICU मध्ये नसतो. तो Dialysis वर नसतो. तो अनेकदा अगदी सामान्य आयुष्य जगत असतो. कामावर जातो. फिरतो. प्रवास करतो. आणि अनेकदा म्हणतो… “मला काहीच त्रास नाही.” पण थोडं बारकाईने पाहिलं तर काही गोष्टी दिसायला लागतात… 1️⃣ BP अनेक वर्षांपासून असू शकतो. 2️⃣ Diabetes “नियंत्रणात” असतो… पण त्याचा इतिहास बराच जुना असतो. 3️⃣ रात्री 2–3 वेळा लघवीला उठणं सुरू झालेलं असू शकतं. 4️⃣ पायांना किंवा घोट्याजवळ कधी कधी सूज येत असते. 5️⃣ पूर्वीसारखी ऊर्जा वाटत नाही… पण “वयामुळे असेल” म्हणून दुर्लक्ष केलं जातं. 6️⃣ Painkiller, अनियमित follow-up, कमी पाणी किंवा lifestyle मधील छोट्या चुका वर्षानुवर्षं जमा झालेल्या असू शकतात. 7️⃣ Reports मध्ये Creatinine आज दिसतं… पण Kidney वरचा ताण अनेकदा अनेक वर्षांपासून चालू असतो. 8️⃣ आणि सर्वात महत्त्वाचं… हा report मला आजचा Creatinine कमी… आणि पुढच्या 10 वर्षांची Kidney Reserve जास्त सांगतो. लोक Creatinine कडे एक number म्हणून पाहतात. मी त्याकडे Kidney ची उरलेली क्षमता म्हणून पाहतो. Creatinine 1.8 म्हणजे Kidney ने काम थांबवलेलं नाही. पण ती शांतपणे सांगतेय… माझ्यावरचा ताण कमी करा. मी अजून बरीच वर्षं साथ देऊ शकते Clinical Practice मध्ये एक गोष्ट वारंवार पाहिली आहे… Heart अनेकदा वेदना देतं. Sugar report मध्ये दिसते. पण Kidney… शेवटपर्यंत शांत राहते. म्हणूनच Creatinine 1.8 हा घाबरण्याचा report नाही. पण दुर्लक्ष करण्याचा reportही नाही. Direction अजून बदलता येऊ शकते. आणि कदाचित… याच टप्प्यावर केलेले छोटे बदल पुढची अनेक वर्षं वाचवू शकतात. Like | Share | Subscribe Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ReportToReality #KidneyHealth #ClinicalWisdom #JustForHearts
7
17
118
5,681
“सकाळी चेहरा सुजल्यासारखा वाटतो?” सकाळी चेहरा सुजल्यासारखा वाटणं हे नेहमी चेहऱ्याची समस्या नसते… अनेक वेळा तो शरीराच्या recovery, sleep आणि metabolic health बद्दल संकेत देत असतो. 1 सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या रात्री आपण अनेक तास झोपल्यामुळे शरीरातील काही द्रव (fluid) तात्पुरते चेहरा आणि डोळ्यांभोवती जमा होऊ शकतात. म्हणून सकाळी थोडी puffiness दिसू शकते. हे अनेक वेळा सामान्य असतं. 2 पण रोजच असं होत असेल तर? मग प्रश्न चेहऱ्याचा नसतो… प्रश्न शरीर काय सांगतंय याचा असतो. कारण सकाळचा चेहरा अनेक वेळा सांगत असतो: 😴 झोप कशी झाली 💧 शरीरात fluid कसं हाताळलं जातंय 🧂 मीठ किती जास्त होतं ⚖️ metabolism कुठे चाललं आहे 3 OPD मध्ये मला वारंवार दिसणारा pattern रात्री: 🍕 उशिरा जेवण 🧂 जास्त मीठ 🥡 Processed food 😴 खराब झोप आणि सकाळी: “ चेहरा वेगळाच दिसतो.” 4 एक गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटेल. काही वेळा clinician ला चेहऱ्यावरचे बदल… रिपोर्टमध्ये बदल दिसण्यापूर्वी जाणवतात. विशेषतः: • वजन वाढणं • कंबर वाढणं • घोरणं • Sleep Apnea • Insulin Resistance यांच्यासोबत सकाळची facial puffiness अनेकदा दिसते. 5 म्हणून मी अनेकदा सांगतो सकाळचा चेहरा हा cosmetic issue नसून… काही वेळा recovery marker असतो. कारण चेहरा अनेक वेळा कालच्या जेवणापेक्षा… रात्रीची recovery कशी झाली याबद्दल जास्त सांगतो. 6 कमी झोप आणि Sleep Apnea हे मोठे दुर्लक्षित घटक आहेत. जर: ❌ मोठ्याने घोरणं ❌ सकाळी डोकं जड वाटणं ❌ दिवसभर थकवा ❌ चेहरा वारंवार सुजल्यासारखा वाटणं असेल… तर केवळ cream बदलून उपयोग होणार नाही 7 मग कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? जर: ❌ सूज वाढत असेल ❌ पायांनाही सूज असेल ❌ BP वाढलेला असेल ❌ श्वास लागणे असेल तर पुढील तपासणी आवश्यक असू शकते. 8 एक छोटा Self-Test करा उद्या सकाळी आरशात पाहा आणि स्वतःला विचारा: 👉 मी fresh दिसतोय का? 👉 डोळ्यांभोवती सूज आहे का? 👉 कालची झोप कशी होती? 👉 घोरणं वाढलंय का? 👉 वजन किंवा कंबर वाढतेय का? काही वेळा शरीर आधी संकेत देतं… रिपोर्ट नंतर बदलतात. 📱 एक छोटं अपडेट… लवकरचं Android आणि iOS App Launch होत आहेत आरोग्य फक्त वाचण्यापासून… ते समजून घेण्यापर्यंत आणि ट्रॅक करण्यापर्यंतचा प्रवास आता सुरू होणार आहे. Like | Repost | Follow Dr Ravindra L Kulkarni , MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow @KulkarniRL #MorningHealth #MetabolicHealth #HealthyAging #JustForHearts
3
19
179
9,641
“रात्रभर झोपूनही सकाळी थकवा का वाटतो?” अनेक लोक म्हणतात: “Sir… मी 7 - 8 तास झोपतो… पण सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही.” थकवा हा अनेक वेळा कामामुळे नसतो… तो recovery अपुरी असल्याचा संकेत असतो. 1 झोपेचा वेळ आणि झोपेची गुणवत्ता वेगवेगळी असते. 8 तास बेडवर पडून राहणं म्हणजे 8 तास चांगली झोप झालीच असं नाही. मी अनेकदा पाहतो: • झोप पूर्ण • पण शरीर थकल्यासारखं कारण प्रश्न झोपेच्या कालावधीचा नसून गुणवत्तेचा असतो. 2 सकाळी उठल्यावर तुम्हाला कसं वाटतं? हा एक महत्त्वाचा health marker आहे. कारण शरीर रात्रभर स्वतःची दुरुस्ती (repair) आणि recovery करत असतं. सकाळी उठल्यावर जर शरीर तयार वाटत नसेल… तर शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. 3 OPD मध्ये सर्वात जास्त दिसणारा pattern कोणता? ❌ उशिरापर्यंत mobile ❌ तुटक झोप ❌ कामाचा ताण ❌ अनियमित झोपेची वेळ आणि मग: “energy च राहत नाही.” 4 काही वेळा समस्या झोपेची नसते… श्वासाची असते. विशेषतः: • घोरणे • रात्री वारंवार जाग येणे • सकाळी डोके जड वाटणे • दिवसा झोप येणे अशी लक्षणे असतील तर Sleep Apnea चा विचार करावा लागतो. मी अनेक रुग्णांमध्ये BP, Diabetes, Fatty Liver आणि सततचा थकवा यामागे हेच कारण पाहिलं आहे. 5 Metabolic Health आणि सकाळचा थकवा यांचा संबंध खूप जवळचा आहे. विशेषतः: • Obesity • Diabetes • Fatty Liver • Insulin Resistance असताना “मी झोपतो… पण refresh होत नाही.” ही तक्रार वारंवार ऐकायला मिळते. 6 एक छोटा Self-Test करा 🙂 सकाळी उठल्यावर: ✅ चालायला उत्साह वाटतो? ✅ शरीर हलकं वाटतं? ✅ मेंदू स्पष्ट विचार करतो? की ❌ Snooze पुन्हा पुन्हा दाबता? ❌ चहा किंवा कॉफीशिवाय दिवस सुरू होत नाही? ❌ उठल्यावरही थकल्यासारखं वाटतं? हे सुद्धा शरीराचे संकेत आहेत. 7 माझ्या अनुभवात एक मनोरंजक गोष्ट दिसते काही लोकांची: ✅ Sugar सुधारते ✅ BP नियंत्रणात येतो ✅ Weight कमी होतो पण ते म्हणतात: “Doctor, अजूनही fresh वाटत नाही.” कारण शरीरातील numbers आधी सुधारतात… Recovery नंतर सुधारते. म्हणूनच reports बरोबरच शरीराची भावना (body feedback) सुद्धा महत्त्वाची असते. 8 माझ्या मते एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा “मी किती तास झोपलो?” यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे: “मी किती fresh उठलो?” कारण झोपेचं खरं उद्दिष्ट झोपणं नसतं… तर recovery असतं. आणि recovery होत नसेल… तर शरीर अनेक वेळा सकाळच्या थकव्यामधून आधीच संकेत देत असतं. 9 मग सुधारणा कुठून सुरू करावी? माझ्या अनुभवात: 🚶 नियमित हालचाल 😴 झोपेची निश्चित वेळ 📱 रात्री स्क्रीन टाइम कमी ⚖️ वजन आणि कंबर नियंत्रण 🫁 घोरणे किंवा Sleep Apnea कडे दुर्लक्ष न करणे यातून खूप चांगले परिणाम दिसतात. आणि एक छोटं अपडेट पुढच्या आठवड्यात Android आणि iOS App येत आहेत 🙂📱 आपली साथ posts आणि comments पुरती मर्यादित राहणार नाही… तर आरोग्य अधिक सुरक्षित, गोपनीय आणि सक्रियपणे समजून घेण्याचा नवा टप्पा सुरू होईल ❤️ Like | Share | Follow Dr Ravindra L Kulkarni , MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow @KulkarniRL #MorningFatigue #MetabolicHealth #HealthyAging
4
33
228
16,762
Uric Acid = 8.2 हा report पाहिला की माझ्या मनात साधारण असा “Virtual Patient” उभा राहतो… Report to Reality 1️⃣ त्याला सांधेदुखी असेलच असं नाही. पण शरीर आधीच metabolic stress मध्ये असण्याची शक्यता मला दिसते. 2️⃣ पोटाभोवती चरबी वाढलेली असू शकते. कारण Uric Acid आणि Insulin Resistance अनेकदा एकत्र चालतात. 3️⃣ Sugar अजून normal असू शकते. पण शरीरातील metabolism आधीच संघर्ष करत असण्याची शक्यता असते. 4️⃣ BP वाढण्याचा प्रवास सुरू असू शकतो. आज नसेल… पण पुढच्या काही वर्षांचा विचार करावा असं वाटतं. 5️⃣ पाणी कमी पिणं, अनियमित खाणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, किंवा sedentary lifestyle यांचे ठसे अनेकदा दिसतात. 6️⃣ Report मध्ये Uric Acid दिसतं… पण मला अनेकदा त्यामागची संपूर्ण lifestyle story दिसते. 7️⃣ Family history मध्ये Diabetes, BP, Obesity किंवा Heart Disease सापडली तर आश्चर्य वाटणार नाही. 8️⃣ अनेकांना वाटतं… “सांधा दुखत नाही म्हणजे काही समस्या नाही.” पण माझ्यासाठी Uric Acid 8.2 हा gout चा report कमी… आणि metabolic health चा report जास्त असतो. 9️⃣ पुढची 5–10 वर्षं बदलली नाहीत तर… Weight gain. Prediabetes. Diabetes. BP. Fatty Liver. Kidney issues. यापैकी एखादं दार ठोठावू शकतं. सगळंच होईल असं नाही. पण दिशा तिकडे जाताना दिसते. Uric Acid 8.2 हा अनेकदा सांध्यांचा report नसतो. तो शरीराचा एक शांत संदेश असतो “मी अजून त्रास देत नाहीये… पण मी पूर्णपणे आनंदीही नाहीये.” Report भविष्य सांगत नाही. पण तो भविष्याची दिशा नक्की दाखवतो. Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ReportToReality #ClinicalWisdom #UricAcid #MetabolicHealth #JustForHearts
6
15
151
7,873
सकाळची stiffness (शरीर जड वाटणं) हा फक्त सांध्यांचा विषय नाही. अनेक वेळा ती शरीराच्या recovery, mobility, muscle health आणि metabolic health बद्दल संकेत देत असते. 1 सकाळची stiffness नेहमी आजार नसते रात्रभर: • हालचाल कमी असते • स्नायू निष्क्रिय असतात • सांध्यांची हालचाल कमी असते • शरीर recovery करत असतं म्हणून उठल्यावर काही मिनिटं शरीर ताठर वाटू शकतं. हे अनेक वेळा सामान्य असतं. 2 पण stiffness किती वेळ टिकते हे महत्त्वाचं ✅ 5-15 मिनिटं अनेक वेळा सामान्य. ⚠️ 30 मिनिटांपेक्षा जास्त विशेषतः सूज, वेदना किंवा थकवा सोबत असेल तर पुढे तपासणीची गरज असू शकते. 3 OPD मध्ये मला वारंवार दिसणारा गैरसमज लोक म्हणतात: “वय झालंय.” पण अनेक वेळा समस्या वयाची नसते… शरीराचा वापर कमी होण्याची असते. यालाच deconditioning म्हणतात. कारण: 🚶 हालचाल कमी 💪 स्नायू कमी 🪑 बसून काम जास्त 📱 स्क्रीन टाइम जास्त हे सर्व मिळून शरीर हळूहळू ताठर करू लागतात. 4 एक छोटा Self-Test करा गेल्या ५ वर्षांत: • जमिनीवर बसणं कमी झालंय का? • पटकन उठणं कठीण झालंय का? • जिने चढताना फरक जाणवतो का? • खाली वाकणं टाळू लागलात का? जर उत्तर “हो” असेल… तर stiffness ही फक्त सकाळची समस्या नसून mobility कमी होण्याचा संकेत असू शकतो. 5 Metabolic Health चा याच्याशी काय संबंध? खूप मोठा विशेषतः: • obesity (लठ्ठपणा) • diabetes • fatty liver • insulin resistance असलेल्या व्यक्तींमध्ये “सकाळी शरीर जड वाटतं” ही तक्रार जास्त दिसते. कारण chronic inflammation (दीर्घकालीन सूज प्रक्रिया) शरीराच्या हालचालीवर परिणाम करू शकते. 6 कमी झोप हा दुर्लक्षित घटक आहे OPD मध्ये वारंवार दिसतं: ❌ उशिरापर्यंत mobile ❌ तुटक झोप ❌ sleep apnea आणि दुसऱ्या दिवशी: “Doctor, शरीरच साथ देत नाही.” काही वेळा stiffness ही सांध्यांची समस्या नसते… ती recovery ची समस्या असते. 7 वेदना सुरू होण्याआधी काय घडतं? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लोक डॉक्टरांकडे वेदना सुरू झाल्यावर येतात. पण: • हालचाल कमी होणं • लवचिकता कमी होणं • stiffness वाढणं ही प्रक्रिया अनेक वेळा वर्षांपूर्वीच सुरू झालेली असते. 8 मग काय करावं? माझ्या अनुभवात: 🚶 रोज चालणं 🤸 सकाळी 5 मिनिटं stretching 💪 आठवड्यातून 2-3 वेळा strength training 😴 झोप सुधारणं ⚖️ कंबर आणि वजनावर लक्ष यांचा stiffness वर खूप चांगला परिणाम दिसतो. 9 माझ्या मते 50 वर्षांनंतर एक नवीन Vital Sign पाहायला हवं जसं आपण: ❤️ Heart Rate 🩸 BP 🍬 Sugar पाहतो… तसंच Mobility (हालचालीची क्षमता) सुद्धा पाहायला हवी. कारण mobility कमी होणं हे अनेक वेळा शरीराच्या इतर बदलांपूर्वी दिसू लागतं. Like | Repost | Follow Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #HealthyAging #MorningStiffness #MetabolicHealth #JustForHearts
2
11
89
3,644
📖 Reports बोलतात… फक्त ऐकायला शिकावं लागतं Report ते Reality ह्या मालिकेतील पहिली post TG (Triglycerides) = 345 वय : 45 वर्षे असलेला patient कसा असेल ते बघूयात 1️⃣ कंबर वाढलेली असण्याची शक्यता जास्त. वजन खूप जास्त असेलच असं नाही. पण शरीर चरबी विशेषतः पोटाभोवती साठवायला लागलेलं असतं. 2️⃣ गेल्या काही वर्षांत खाण्यापेक्षा हालचाल कमी झालेली असते. हा report अनेकदा exercise च्या कमतरतेबद्दल जास्त बोलतो. 3️⃣ #Sugar अजून Diabetes पर्यंत पोहोचलेली नसू शकते. पण शरीर insulin (साखर नियंत्रित करणारा हॉर्मोन) ला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाहीये. 4️⃣ #FattyLiver आधीच सुरू असण्याची शक्यता मला शोधावीशी वाटते. कारण TG आणि Fatty Liver अनेकदा एकत्र चालतात. 5️⃣ #Sleep आणि #stress या दोघांचे ठसे report वर दिसायला लागलेले असतात. शरीर रात्री recover कमी आणि survive जास्त करत असतं. 6️⃣ #Energy कमी झाल्याची तक्रार असू शकते. “सर, काम करतो… पण पूर्वीसारखं वाटत नाही.” हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं. 7️⃣ हा report मला आजारापेक्षा metabolism ची दिशा सांगतो. शरीर अजून आजारी नसतं… पण निरोगीही राहत नाही. 8️⃣ Family history मध्ये #Diabetes, #BP किंवा Heart Disease सापडली तर आश्चर्य वाटणार नाही. 9️⃣ पुढची 5–10 वर्षं बदलली नाहीत तर… Prediabetes. Diabetes. Fatty Liver. BP. Heart Disease. यापैकी एखादं दार ठोठावू शकतं. सगळं होणारच ,असं नाही. पण रस्ता तिकडे जाताना दिसतो. TG 345 हा फक्त fat चा report नाही. तो अनेकदा वर्षानुवर्षे तयार झालेल्या lifestyle चा आरसा असतो. एक शरीराचा एक शांत संकेत ही “मी अजून तुटलेलो नाही… पण मी योग्य दिशेने चाललोय असंही नाही.” आजार अचानक येत नाहीत. ते आधी reports मध्ये दिसतात. नंतर शरीरात. आणि शेवटी आयुष्यात. 🙂 आणि हो… मी 100% बरोबर असेनच असं नाही. रुग्ण पुस्तकातल्या chapter सारखे नसतात. ते एकमेकांत मिसळलेले असतात. पण दिशा ओळखण्यात… reports अनेकदा खोटं बोलत नाहीत. Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ReportToReality #ClinicalWisdom #MetabolicHealth #PreventiveCardiology
2
9
86
5,369
सकाळची Sugar जास्त… म्हणजे Diabetes वाढलाय का? OPD मध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो Sir… काल आहार पाळला… चाललो सुद्धा… तरी सकाळची sugar वाढली कशी? एक महत्त्वाची गोष्ट समजुन घेतली पाहीजे सकाळची sugar ही नेहमी कालच्या जेवणाची गोष्ट नसते. काही वेळा ती रात्री शरीरात काय घडलं याची गोष्ट असते. 1 सर्वात मोठा गैरसमज अनेकांना वाटतं: Fasting sugar जास्त = Diabetes बिघडला नेहमीच असं नसतं 🙂 कारण fasting sugar वर फक्त pancreas (स्वादुपिंड) नियंत्रण ठेवत नाही. रात्री: • liver (यकृत) • hormones (हार्मोन्स) • झोप • stress (ताण) हे सुद्धा परिणाम करत असतात. 2 रात्रभर काही खाल्लं नसताना sugar वाढते कुठून? आपलं liver पहाटे glucose रक्तात सोडत असतं. कारण शरीर दिवसासाठी तयारी करत असतं. काही लोकांमध्ये ही प्रक्रिया जास्त सक्रिय असू शकते. यालाच Dawn Phenomenon म्हणतात. 3 म्हणून एक विचित्र गोष्ट दिसू शकते • HbA1c सुधारत असतो • वजन कमी होत असतं • post-meal sugar चांगली असते पण fasting sugar अपेक्षेइतकी कमी होत नाही. आणि रुग्ण घाबरतो. प्रत्यक्षात metabolism सुधारत असतानाही हे काही वेळा दिसू शकतं. 4 कमी झोप आणि stress यांची किंमत अनेकदा sugar भरते OPD मध्ये वारंवार दिसणारा pattern: ❌ उशिरापर्यंत mobile ❌ तुटक झोप ❌ मानसिक ताण आणि सकाळची sugar वाढलेली. काही वेळा शरीराला झोपेची कमतरता गोड पदार्थांपेक्षा जास्त महाग पडते. 5 म्हणून fasting sugar हा फक्त sugar चा report नसतो तो अनेक वेळा indirect report असतो: • झोपेचा • recovery चा • stress चा • liver metabolism चा 6 सर्वात मोठी चूक कोणती? एका दिवसाच्या reading वरून निष्कर्ष काढणं. पाहा: • 2-4 आठवड्यांचा trend • HbA1c • वजन • कंबर • activity कारण: Pattern > Single Reading हे diabetes मध्ये अनेक वेळा खरं असतं. आजची Take Home Learning 👇 सकाळची sugar वाढली म्हणजे काल रात्री तुम्ही काहीतरी चुकीचं खाल्लंय… असं नेहमीच नसतं काही वेळा शरीर सांगत असतं: “माझी झोप तपासा.” “माझा stress तपासा.” “माझा metabolism समजून घ्या.” अनुभवातून सांगतो की Diabetes फक्त जेवणामुळे वाढत नाही. तो शरीराच्या संपूर्ण जीवनशैलीचा आरसा असतो. तुमची fasting sugar कधी वाढलेली दिसली आहे का… जरी मागच्या रात्री सर्व काही नीट पाळलं होतं? Comments मध्ये नक्की सांगा जर हा post उपयुक्त वाटला असेल… तर तो स्वतःपुरता ठेवू नका कारण अनेक लोक आजही सकाळची sugar वाढली की स्वतःलाच दोष देतात… जेव्हा प्रत्यक्षात प्रश्न जेवणाचा नसून #metabolism चा असू शकतो ❤️ Like | Share | Subscribe Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #FastingSugar #DiabetesCare #MetabolicHealth
1
8
77
2,850
🎉🏆 Congratulations to Dr. Obadah Aqtash, MD, FSCAI! 🏆🎉 The Arab American Society of Cardiology (AASC) proudly celebrates the remarkable achievement of Dr. Obadah Aqtash on being named one of the SCAI 30 in Their 30s Class of 2026 by the (SCAI). 🌟
1
10
502
घरच्या BP Machine वर विश्वास ठेवायचा का?🤔 Morning BP post नंतर हा प्रश्न सर्वात जास्त विचारला गेला “Sir… एकदा 150/90 येतं… पुन्हा 135/85 येतं… मग खरं BP कोणतं?” लक्षात ठेवा BP चा योग्य उपचार करण्यापूर्वी… BP योग्य पद्धतीने मोजणं शिकणं अधिक महत्त्वाचं आहे 1 घरचं BP मोजणं खरंच उपयुक्त आहे का? हो 🙂 आज ACC, AHA आणि अनेक guidelines मध्ये Home BP Monitoring ला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कारण काही लोकांमध्ये: • Clinic मध्ये BP जास्त येतं तर काही लोकांमध्ये: • Clinic मध्ये normal दिसतं • पण घरी वाढलेलं असतं म्हणून घरचं BP अनेक वेळा वास्तव चित्र दाखवतं. 2 BP मोजण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी: ✅ उठल्यानंतर ✅ लघवी करून ✅ चहा/कॉफीपूर्वी ✅ BP ची गोळी घेण्यापूर्वी ✅ ५ मिनिटं शांत बसल्यानंतर आणि संध्याकाळी: ✅ जेवणापूर्वी ✅ ५ मिनिटं विश्रांतीनंतर 3 BP मोजताना कोणत्या चुका टाळाव्यात? ❌ बोलू नका ❌ पाय क्रॉस करू नका ❌ धावतपळत येऊन BP मोजू नका ❌ चहा, कॉफी, सिगारेट किंवा व्यायामानंतर लगेच BP मोजू नका ❌ हात हवेत ठेवू नका हात हृदयाच्या पातळीवर (heart level) असावा. 4 एक reading पुरेशी असते का? नाही 🙂 BP दोनदा मोजा., 1 मिनिट अंतर ठेवा. दोन्ही readings चा average घ्या. यामुळे accuracy वाढते. 5 किती दिवस BP नोंदवावा? जर खरा BP समजून घ्यायचा असेल तर: किमान 7 दिवस सकाळ-संध्याकाळ readings लिहून ठेवा. Healthcare मध्ये: Pattern > Single Reading हे अनेक वेळा खरं असतं. 6 घरच्या BP चे target काय? साधारणपणे: ✅ 135/85 mmHg पेक्षा कमी हे home BP monitoring मध्ये चांगलं मानलं जाते , पण: • वय • diabetes • kidney disease • heart disease यानुसार target बदलू शकतो. 7 BP ची गोळी घेत असाल तर? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सकाळचं BP: 👉 गोळी घेण्यापूर्वी मोजा कारण त्यातून औषधाचा पूर्ण २४ तासांचा परिणाम समजू शकतो. पण: ❌ एका reading वरून dose बदलू नका ❌ स्वतःहून गोळी बंद करू नका डोस बदलण्यासाठी trend महत्त्वाचा असतो. 8 Machine वर विश्वास ठेवायचा का? हो 🙂 पण Upper Arm Automatic Machine वापरा. Wrist Machine अनेक वेळा कमी अचूक असू शकतात. आणि लक्षात ठेवा: Machine पेक्षा technique जास्त महत्त्वाची असते. 9 कधी तातडीने डॉक्टर किंवा Hospital शी संपर्क करावा? जर BP खूप वाढलेलं असेल आणि त्यासोबत: ⚠️ छातीत दुखणं ⚠️ श्वास घेण्यास त्रास ⚠️ अचानक कमजोरी ⚠️ बोलण्यात अडचण ⚠️ चेहरा वाकडा होणं ⚠️ तीव्र डोकेदुखी ⚠️ दृष्टी धूसर होणं अशी लक्षणं असतील… तर तातडीची वैद्यकीय मदत घ्या. फक्त BP number नाही… Symptoms सुद्धा महत्त्वाचे असतात. 10 घरचं BP मोजण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता? तो फक्त diagnosis साठी नाही. तो मदत करतो: • औषधांचा परिणाम समजायला • dose adjustment करायला • lifestyle बदलांचा फायदा पाहायला • वजन कमी झाल्यावर सुधारणा पाहायला • मीठ, झोप आणि stress चा परिणाम समजायला Like | Repost | Subscribe Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #BloodPressure #HeartHealth #HomeMonitoring #JustForHearts
10
31
142
8,583