📖 Reports बोलतात…
फक्त ऐकायला शिकावं लागतं
Report ते Reality ह्या मालिकेतील पहिली post
TG (Triglycerides) = 345
वय : 45 वर्षे
असलेला patient कसा असेल ते बघूयात
1️⃣ कंबर वाढलेली असण्याची शक्यता जास्त.
वजन खूप जास्त असेलच असं नाही.
पण शरीर चरबी विशेषतः पोटाभोवती साठवायला लागलेलं असतं.
2️⃣ गेल्या काही वर्षांत खाण्यापेक्षा हालचाल कमी झालेली असते.
हा report अनेकदा exercise च्या कमतरतेबद्दल जास्त बोलतो.
3️⃣
#Sugar अजून Diabetes पर्यंत पोहोचलेली नसू शकते.
पण शरीर insulin (साखर नियंत्रित करणारा हॉर्मोन) ला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाहीये.
4️⃣
#FattyLiver आधीच सुरू असण्याची शक्यता मला शोधावीशी वाटते.
कारण TG आणि Fatty Liver अनेकदा एकत्र चालतात.
5️⃣
#Sleep आणि
#stress या दोघांचे ठसे report वर दिसायला लागलेले असतात.
शरीर रात्री recover कमी आणि survive जास्त करत असतं.
6️⃣
#Energy कमी झाल्याची तक्रार असू शकते.
“सर, काम करतो…
पण पूर्वीसारखं वाटत नाही.”
हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं.
7️⃣ हा report मला आजारापेक्षा metabolism ची दिशा सांगतो.
शरीर अजून आजारी नसतं…
पण निरोगीही राहत नाही.
8️⃣ Family history मध्ये
#Diabetes,
#BP किंवा Heart Disease सापडली तर आश्चर्य वाटणार नाही.
9️⃣ पुढची 5–10 वर्षं बदलली नाहीत तर…
Prediabetes.
Diabetes.
Fatty Liver.
BP.
Heart Disease.
यापैकी एखादं दार ठोठावू शकतं.
सगळं होणारच ,असं नाही.
पण रस्ता तिकडे जाताना दिसतो.
TG 345 हा फक्त fat चा report नाही.
तो अनेकदा वर्षानुवर्षे तयार झालेल्या lifestyle चा आरसा असतो.
एक शरीराचा एक शांत संकेत ही
“मी अजून तुटलेलो नाही…
पण मी योग्य दिशेने चाललोय असंही नाही.”
आजार अचानक येत नाहीत.
ते आधी reports मध्ये दिसतात.
नंतर शरीरात.
आणि शेवटी आयुष्यात.
🙂 आणि हो…
मी 100% बरोबर असेनच असं नाही.
रुग्ण पुस्तकातल्या chapter सारखे नसतात.
ते एकमेकांत मिसळलेले असतात.
पण दिशा ओळखण्यात…
reports अनेकदा खोटं बोलत नाहीत.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
Follow 👉
@KulkarniRL
#ReportToReality #ClinicalWisdom #MetabolicHealth #PreventiveCardiology