Jalgaon - यावल-भुसावळ रस्त्यावर केळीच्या शेताला आग; शेतकऱ्याचे 6 लाखांचे नुकसान
शहरातून भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात विद्युत शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आणि आगीमध्ये केळीचे पीक, शेतात पसरवलेली ठिबक व पाईप असे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी भर दुपारी घडली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे देखील शक्य झाले नाही. तर यात शेतकऱ्याचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले आहे.
.
#Jalgaon #Yaval #Bhusawal #FarmFire #BananaFarming #ShortCircuit #MaharashtraNews #MarathiNews