संविधानाचा जागर : हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा; विजेत्यांचा सन्मान
हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा गोळेगाव (ता. औंढा नागनाथ) येथे "संविधानाचा जागर" या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माने उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजरत्न अनिल कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुतुब सय्यद, डॉ. दीपक मुळे, शाळेचे मुख्याध्यापक खिल्लारे, शिक्षक वृंद, राजरत्न सुतारे (ग्रामपंचायत सदस्य, माथा), अनिल मुळे (ग्रामपंचायत सदस्य, गोळेगाव), आशिष खंदारे (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संविधानाविषयीचे उत्कृष्ट ज्ञान सादर केले. यामध्ये प्रथम क्रमांक मगरे बबन (संविधान), द्वितीय क्रमांक योगिता वामन हाके तर तृतीय क्रमांक अंजली मोहिते यांनी पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सुमारे 100 विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र, वही व पेन वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने, संस्थेचे अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाजरत्न अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी बोलताना अनिल कांबळे म्हणाले की, भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचे भक्कम अधिष्ठान आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. समानता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा स्वीकार करूनच समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन ते भविष्यात जबाबदार नागरिक बनतील.
#ConstitutionAwareness #HingoliNews #QuizCompetition #VanchitBahujanAghadi #StudentAchievement #EducationMatters #IndianConstitution #YouthAwareness #SocialInitiative #CommunityEvent #MaharashtraNews #KnowledgeCompetition #CivicAwareness #EmpoweringStudents