Filter
Exclude
Time range
-
Near
मानपाडा मनोरमा नगर परिसरात काल उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक भवन आणि अत्याधुनिक प्रकारच्या स्मशानभूमीचे लोकार्पण, माजी नगरसेविका पद्मा भगत यांच्या पाठपुराव्याने उभारण्यात येत असलेल्या दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन आणि स्थानिक नगरसेवक भूषण भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे ज्योतिबा मंदिर बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं मानपाड्यासारख्या झोपडपट्टी आणि कामगार वसाहतीत अत्यंत सुंदर, आधुनिक आणि सर्वसुविधांनी सज्ज अशी अभ्यासिका उभारणं हे निश्चितच उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या गरजांपैकी एक असणाऱ्या स्मशानभूमीचे लोकार्पण होऊन एक मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. या विभागातील नगरसेवक नेहमी जनतेच्या गरजा ओळखून त्यांना उपयुक्त असे उपक्रम राबवत असतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मानपाडा विभागात सकारात्मक बदल होत आहेत. यासाठी शिंदे साहेबांनी सर्वांचं मनापासून कौतुक केलं तसेच स्थानिकी नागरिकांनी देखील आमचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख राजू शिंदे,यशवंत भगत आणि विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. @mieknathshinde #nareshmhaske #ManoramaNagar #PublicWelfareProjects #EknathShinde #CommunityDevelopment #InfrastructureGrowth #APJAbdulKalamStudyCenter #SeniorCitizenBhavan #ModernCrematorium #PadmaBhagat #BhushanBhoir #WaterTankProject #JyotibaMandirHall #ManpadaDevelopment #SocialInitiatives #ThaneCity #PublicService
1
1
3
83