महाराष्ट्रातील मोबाइल फॉरेन्सिक लॅब व्हॅन्स - क्रांतिकारी पाऊल!
महाराष्ट्र हे मोबाइल फॉरेन्सिक लॅब व्हॅन्स सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, या व्हॅन्स थेट क्राईम सीनवर जाऊन पुरावे गोळा करतील आणि तपास प्रक्रियेचा वेग वाढवतील. यामुळे पुराव्याअभावी आरोपी सुटण्याच्या घटना कमी होतील आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल.
मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, 'राज्यात २५६ व्हॅन्स कार्यान्वित करण्यात येत आहेत, ज्यामुळे तपास प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल.'
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सावंगी येथील शाळेतील अत्याचाराची घटना गंभीर असून यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. मात्र अशा घटनांना टाळण्यासाठी आणि जलद न्याय देण्यासाठी या मोबाइल लॅब्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास वाटतो..
#MobileForensicLab
#MaharashtraInnovation
#CrimeFreeMaharashtra
#महाराष्ट्र #मुख्यमंत्री