Filter
Exclude
Time range
-
Near
नवी दिल्लीतील CIMSME (चेंबर ऑफ इंडियन मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस) च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीए मुकेश मोहन गुप्ता यांनी अत्यंत आत्मीयतेने स्वागत करून सन्मान केला. भारतीय उद्योजकतेचा आत्मा जपणारा सुंदर चरखा भेट देत त्यांनी स्वावलंबन, श्रमसंस्कृती आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या या आत्मीय सत्काराबद्दल मनस्वी आभार. भेटीदरम्यान MSME क्षेत्रातील विविध शासकीय योजना, नवउद्योजकांसाठी उपलब्ध संधी, उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, वित्तीय सहाय्य, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. तसेच MSME संदर्भातील माहितीपूर्ण पुस्तके भेट देऊन त्यांनी ज्ञानाची अमूल्य भेट दिली. यावेळी बैठकीत एक विचार प्रकर्षाने मांडला,भारताच्या युवा शक्तीने केवळ Job Seekers न राहता Job Givers बनले पाहिजे. युवकांच्या हातात कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची ताकद दिली तर रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील आणि देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.युवकांना उद्योग, नवोपक्रम आणि स्वावलंबनाची प्रेरणा दिली, तर समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचा पाया अधिक भक्कम होईल, असे यावेळी नमूद केले. @BJP4India @BJP4Maharashtra #NewDelhi #SMUpdate
1
1
15
361
भारताचे संरक्षण मंत्री मा. राजनाथजी सिंग यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ व डायरी देत त्यांचे स्वागत केले. देशाच्या सुरक्षा, सामर्थ्य आणि स्वाभिमानाला नवी उंची देणाऱ्या त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विविध विषयांवर आत्मीय संवाद साधला. तसेच चंद्रपूर येथील सैनिक शाळेसंदर्भातील विविध बाबींवरही सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्याशी झालेल्या आत्मीय संवादाने ही भेट संस्मरणीय ठरली. @rajnathsingh #NewDelhi #SMUpdate
1
4
39
745
SAFF Women’s Championship 2026 विजेतेपदावर आपले नाव कोरल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत आपण दाखवलेली जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट खेळ हा देशासाठी अभिमानास्पद आहे. हा ऐतिहासिक विजय देशातील लाखो युवा खेळाडूंना, विशेषतः मुलींना, फुटबॉलकडे प्रेरित करणारा ठरेल. भारतीय महिला फुटबॉलचा हा सुवर्णप्रवास अधिक यशस्वी होवो, यासाठी संपूर्ण संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #Football #Sports #India #SMUpdate
1
105
चंद्रपूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (GST) भवनाची पाहणी करून येत्या १८ जून रोजी होणाऱ्या लोकार्पणाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. आधुनिक प्रशासकीय सुविधांचे प्रतीक आणि कार्यक्षमतेचा मानदंड ठरणाऱ्या या इमारतीतील स्वच्छता, फायर सेफ्टी, सोलार व वातानुकूलित व्यवस्था, जनरेटर, फर्निचर तसेच इतर सर्व सुविधांची दर्जेदार आणि वेळेत पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सहआयुक्त कक्ष, प्रशिक्षण केंद्र, प्रतीक्षालय, उपहारगृह आदी सुविधांची पाहणी करताना नागरिकांना अधिक सुलभ, कार्यक्षम आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी उद्घाटनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूरच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये मानाचा तुरा ठरणारे हे वस्तू व सेवा कर भवन प्रत्येक बाबतीत उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण करेल, यासाठी सर्व कामे काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. @narendramodi @AmitShah @NitinNabin @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Development #SMUpdate
1
10
302
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! @BJP4India @BJP4Maharashtra #विधानपरिषद #SMUpdate #महायुती
10
489
आज विधानभवनातील अवर सचिव मा. सुरेशजी मोगल यांनी माझा सत्कार करून माझ्या कार्यशैलीचे तसेच विधानसभा कामकाजातील योगदानाबद्दल कौतुक केले. हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरवाचा क्षण नसून जनतेप्रती असलेल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली ही प्रशंसा माझ्या सेवाभावाला अधिक ऊर्जा देणारी आहे. या आत्मीय सन्मानाबद्दल मा. सुरेशजी मोगल यांचे मनःपूर्वक आभार! #VidhanBhavan #ThankYou #SMUpdate
25
775
मुल येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्मलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, न्यायनिष्ठा आणि संवेदनशील प्रशासनाचा आदर्श घालून दिला. राज्यकारभार करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारी ही लोकमाता आजही जनसेवेची प्रेरणास्थान आहे. भीमाशंकर क्षेत्राच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य अद्वितीय आणि दूरदृष्टीचे होते. त्या कार्यातून प्रेरणा घेत, अर्थमंत्री असताना भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी ₹१५० कोटींचा निधी मंजूर करण्याचे भाग्य लाभले. त्या निर्णयामागील खरी प्रेरणा आणि ऊर्जा ही राजमाता अहिल्यादेवींच्या लोकहितवादी विचारधारेतूनच मिळाली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे सेवा, समर्पण आणि सुशासनाचा तेजस्वी दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील वंचित, दुर्बल आणि शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन यावेळी केले. @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Mul #SMUpdate
2
10
267
मालधक्का विरोधी संघर्ष समिती मूल च्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात उपस्थिती. @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Mul #SMUpdate
1
2
328
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या 134 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून अभूतपूर्व प्रतिसाद! @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #NarendraModi #ManKiBaat #SMUpdate #Chandrapur #Ballarpur
1
2
113
ऊर्जानगर येथे आयोजित ‘मन कि बात’ कार्यक्रमास उपस्थिती! @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Urjanagar #SMUpdate #mankibaat
3
214
बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन लाकडापासून विविध निर्मितीच्या अत्याधुनिक प्रक्रिया, संशोधन आणि तंत्रज्ञानाबाबत शास्त्रज्ञांशी सविस्तर संवाद साधला. @BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate
1
2
349
बेंगळुरू येथील कर्नाटका स्टेट फॉरेस्ट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भेट देऊन सॉलिड वूड फर्निचर निर्मिती तसेच ब्लॉकबोर्ड उत्पादन प्रक्रियेची सविस्तर पाहणी केली. @BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate #SkillDevelopment
1
5
474
बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या केंद्र शासनाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेला भेट... @BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate
1
3
184
बेंगळुरू येथील चनापटनम परिसरातील विविध हस्तकला व ग्रामीण उद्योग प्रकल्पांना भेट देत कॉमन फॅसिलिटी सेंटर, वुडन टॉईज शोरूम, मंत्रा संस्था, शिल्पा ट्रस्ट तसेच बांबूपासून आकर्षक हस्तकला साकारणाऱ्या उद्योग केंद्रांचे अवलोकन केले. या भेटीत भारतीय परंपरा, कुशल कारागिरी आणि आधुनिक नवकल्पनांचा अप्रतिम संगम अनुभवण्याची संधी मिळाली. स्थानिक कारागिरांच्या कुशल हातांतून साकारलेली कलाकुसर, शासनाच्या पाठबळातून उभा राहिलेला रोजगारनिर्मितीचा आदर्श आणि भारतीय हस्तकलेचा जागतिक स्तरावर पोहोचलेला समृद्ध वारसा अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. विशेषतः महिला कारागिरांशी संवाद साधून त्यांच्या कार्यपद्धती, कौशल्य आणि रोजगारनिर्मितीतील योगदानाची माहिती घेतली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणाऱ्या अशा परिवर्तनशील संकल्पना युवक-युवतींसाठी आत्मनिर्भरता व रोजगारनिर्मितीचा प्रभावी मार्ग ठरत आहेत. याच धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (FIDC) मार्फत चंद्रपूर-बल्लारशा परिसरातील होतकरू युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन अशा प्रकारचे उद्योग व कौशल्याधारित युनिट उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. @BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate #Chanapatanam
1
1
12
388
बल्लारपूर येथे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समर कॅम्पच्या समारोप सोहळ्यात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांची चमक आणि भविष्याची उज्ज्वल पहाट अनुभवता आली. ज्ञान, संस्कार आणि क्रीडेचा सुरेख संगम घडवणाऱ्या या उपक्रमाने अनेक कोवळ्या मनांना नवे आकाश गाठण्याची प्रेरणा दिली. सेवाभावाच्या दीपस्तंभातून समाज परिवर्तनाचा प्रकाश पेरणाऱ्या आयोजक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक. ध्येयाप्रती असलेले जिद्द , मेहनतीची कास आणि संस्कारांची शिदोरी असेल तर यशाचे शिखर गाठणे अशक्य नाही. धनवान होण्यापेक्षा गुणवान होण्याचा मंत्र देत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, शिक्षण आणि वाचन संस्कृतीची बीजे रुजवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून उद्याचे ऑलिम्पिक पदकविजेते घडावेत, तरुणांच्या स्वप्नांना यशाची पंख लाभावीत आणि प्रत्येक आई-वडिलांच्या चेहऱ्यावर या तरुणांच्या यशस्वी कामगिरीमुळे अभिमानाचे हास्य खुलावे, हीच मनापासून सदिच्छा. @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Ballarpur #SMUpdate
1
3
7
218
चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील प्राचीन हनुमान मंदिराला भेट देत महाबली हनुमानजींचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले.बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. श्रद्धा, संस्कार आणि इतिहासाचा सुगंध लाभलेल्या या पावन स्थळी उभे राहिल्यावर मन भावविश्वात हरवून गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी स्पंदन पावलेल्या या मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पुनर्बांधणीचा संकल्प अधिक दृढ झाला. या पाहणी दौऱ्यावेळी मंदिर परिसरातील भगवान महादेव मंदिराचे नूतनीकरण, सभागृह उभारणी तसेच भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधांचा समावेश असलेला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. येत्या काळात या पवित्र स्थळाला नवचैतन्य आणि नवसंजीवनी देण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. श्रद्धा, इतिहास आणि विकास यांचा सुंदर त्रिवेणी संगम घडवत या मंदिराच्या वैभवाला नवी झळाळी देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. #Chandrapur #SMUpdate #HanumanMandir
3
19
329
बल्लारपूर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करत न्याय मिळवून देण्याच्या निर्धाराने राजे बल्लारशाह नाट्यगृह, बल्लारपूर येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहिलो. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #SMUpdate #Ballapur
2
214
सहकार्यातून मिळाले समाधान! आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. वसुमना पंत यांच्या हस्ते श्री. रोशन कुळे रा.मिंथूर ता. नागभीड यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरण करण्यात आला. सावकारीच्या विळख्यात अडकून किडनी विक्रीसारख्या अत्यंत वेदनादायी परिस्थितीला सामोरे जावे लागलेल्या श्री. रोशन कुळे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस नव्या आशेचा किरण ठरला. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून, संकटाच्या अंधारात आधार देणारा माणुसकीचा हात आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या वेदना समजून घेत मदतीसाठी मला पुढाकार घेता आला, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. आयुष्यातील कठीण क्षणी कुणाच्या डोळ्यातील अश्रूंना पुसण्याचा प्रयत्न करता आला, यापेक्षा मोठे समाधान दुसरे असू शकत नाही. मी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे अंतःकरणपूर्वक आभार. @Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #SMUpdate
2
12
251
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बिनविरोध विजयी! सर्व विजयी नवनिर्वाचित आमदारांचे हार्दिक अभिनंदन! @BJP4India @BJP4Maharashtra #विधानपरिषद #SMUpdate #महायुती
3
24
453
पुडुचेरी राज्य के मुख्यमंत्री के रूप में शपथ ग्रहण करने पर श्री. एन. रंगास्वामी जी तथा मंत्रिमंडल के सभी मंत्रियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं! पुडुचेरी में पुनः एनडीए की विजय जनआकांक्षा, विकास और सुशासन पर जनता के विश्वास की जीत है। आदरणीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में पिछले वर्षों में अभूतपूर्व जनकल्याणकारी योजनाओं और विकास कार्यों के माध्यम से पुडुचेरी ने प्रगति की नई दिशा प्राप्त की है। आने वाले समय में व्यापार, पर्यटन और उत्पादन के सशक्त केंद्र के रूप में विकसित पुडुचेरी निर्माण का संकल्प निश्चित ही नई ऊंचाइयों तक पहुंचेगा। @narendramodi @CM_NRangaswamy @BJP4India @BJP4Puducherry #puducherry #OathCeremony #SMUpdate #bjp
1
3
200