पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक संपन्न
पुणे मेट्रो भवन येथे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर व पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश आव्हाड यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो व पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत नवीन फीडर मार्ग विकसित करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, फीडरची वारंवारिता वाढवणे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ‘One Journey, One Ticket’ संकल्पना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि अखंड सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थांनी समन्वय अधिक बळकट करण्यावर भर दिला. यावेळी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक श्रीमती ॲलिस पोरे, जीप ट्रान्सपोर्ट मॅनेजर यशवंत हिंगे तसेच महामेट्रो, पुणे मेट्रो व पीएमपीएमलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Pune Metro and PMPML Hold Joint Review Meeting
A joint review meeting between Pune Metro and PMPML was held at Pune Metro Bhavan in the presence of MahaMetro Managing Director Mr. Shravan Hardikar and PMPML Chairman and Managing Director Mr. Mahesh Awhad.
The meeting focused on developing new feeder routes, strengthening last-mile connectivity, increasing the frequency of feeder services, and implementing the "One Journey, One Ticket" concept to enhance passenger convenience. Both organizations emphasized strengthening mutual coordination to provide citizens with a more seamless, safe, and integrated public transport system.
Also present at the meeting were Pune Metro General Manager Captain Dr. Rajendra Saner-Patil, PMPML Joint Managing Director Mrs. Alice Pore, Jeep Transport Manager Yashwant Hinge, along with officers and staff from MahaMetro, Pune Metro, and PMPML.
#PuneMetro #PMPML #LastMileConnectivity #OneTicketOneQR #PublicTransport #SmartCommute #PuneCommute #SustainableTransport #MetroServices #PuneMetroRail