वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) 2025 Future of Jobs Report नुसार, शिक्षक हे भविष्यातील सर्वात जास्त मागणी असणाऱ्या टॉप 15 नोकरी भूमिकांमध्ये समाविष्ट झाले आहेत. 2020 च्या रिपोर्टमध्ये शिक्षकांची ही जागा नव्हती. हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे! शिक्षकांना आता कामकाजातील बदल, नवकौशल्य प्रशिक्षण, आणि लोकसंख्या व आर्थिक घडामोडींना आधार देणारा प्रमुख घटक म्हणून ओळख मिळाली आहे.
हा बदल का झाला
1. तरुण लोकसंख्या, प्रचंड गरजा: भारतासारख्या विकसनशील देशात तरुण लोकसंख्या प्रचंड आहे. शिक्षण क्षेत्रात लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत.
2. कौशल्यांचा बदलता वेग: WEF नुसार, 2030 पर्यंत 39% मूलभूत कौशल्ये बदलणार आहेत. यामुळे शिकवण्याचे पद्धतीशास्त्रही बदलणार.
3. आयुष्यभर शिकणे ही जीवनशैली: सतत शिकत राहण्याच्या या युगात शिक्षक हे मार्गदर्शक आणि शिकणारे दोन्ही असतील.
4. AI चा उदय, मानवी कौशल्यांची गरज: AI च्या युगात धैर्यशीलता/चिकाटी, लवचिकता, सर्जनशीलता, नेतृत्व यांसारख्या मानवी कौशल्यांना मागणी वाढली आहे. ही कौशल्ये शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
5. शिक्षक = मूल्यशिक्षणाचा पाया: मूल्ये, विचारशक्ती, उद्योजकता हे शिक्षकच घडवतात. ही भूमिका मशीन घेऊ शकत नाही; ती शिक्षकाच्या उपस्थितीतच साकार होते.
वर्ष २०३० चं शिक्षण हे फक्त कंटेंट डिलिव्हरी म्हणजे माहिती सांगणे नसेल, तर ते संवाद, समज, आणि संगोपन असेल.
#FutueofJobs #2030Skills #WEF2025 #TeachersOfTomorrow #भारत #शिक्षक