माता-भगिनींवरील अत्याचाराविरोधात विराट हिंदू आक्रोश मोर्चा संपन्न..!
माताभगिनींवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच राष्ट्रीय महामार्ग, नेकनूर व कळंबसर रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन आपले विचार व्यक्त करण्याचा योग आला.
या मोर्चामध्ये समाजात वाढत असलेल्या अन्यायकारक, असुरक्षितता निर्माण करणाऱ्या घटनांविरोधात संघटितपणे तीव्र लढा उभारण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदू समाजाने जागरूक राहून एकजुटीने उभे राहिले पाहिजे, हा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे सहकारी मित्र आमदार मा. संग्राम (भैय्या) जगताप यांची उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, नेकनूर (शेळी बाजार) येथे पार पडलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, युवक, माता-भगिनी सहभागी झाले होते.
हा मोर्चा म्हणजे हिंदू धर्मरक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी, न्यायासाठी आणि सुव्यवस्थेसाठी उभारलेला जागरूकतेचा आवाज ठरला..!
#ViralPost#HinduEkta#HinduJanAakroshMorcha#BeedNews#Neknoor#HinduSamaj#JusticeForWomen#MataBhaginiSuraksha#SocialAwareness#DevDeshDharm#MaharashtraPolitics#TrendingNow#PoliticalUpdate#HinduUnity#PublicVoice#MaharashtraNews#SangramJagtap#RajkiyaStyle#ProfessionalPost#YouthPower
शिरवळ येथे विराट हिंदू संमेलन
शिरवळ येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या संमेलनास उपस्थित राहण्याचा योग आला, ही बाब निश्चितच प्रेरणादायी ठरली.
यावेळी समाजात वाढत असलेल्या विकृत, जिहादी व समाजविघातक प्रवृत्तीविरोधात हिंदूंनी एकजूट करून ठाम भूमिका घेतली पाहिजे, असा स्पष्ट संदेश देण्यात आला. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी, तसेच आपल्या माता–भगिनींच्या सुरक्षिततेसाठी समाज म्हणून सजग राहणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायांविरोधात प्रभावीपणे लढा देण्याची भूमिका व्यक्त केली. या संमेलनात शेकडोच्या संख्येने हिंदू तरुण, माता–भगिनींची उपस्थिती लाभली.
#ViratHinduSammelan#HinduEkta#Shirwal#SanatanDharma#HinduSamaj#HinduYouth#Maharashtra#Pune#Hindutva#ShivajiMaharaj#DevDeshDharm#Unity#TrendingNow#India#Bharat#SocialAwareness#Heritage#CulturalPride#JaiShriRam#HinduRashtra
देव-देश-धर्माचं राज्य..!
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आता जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षांची कैद होणार आहे. तसेच, 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा देखील होणार आहे. धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला भाजपा महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संस्था-संघटना, कार्यकर्ते मागणी करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ या नव्या कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हिंदु समाजातील माता-भगिनींना भूलथापा लावून लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारख्या प्रवृत्तींना आता आळा बसेल, असा विश्वास आहे. धर्मरक्षणासाठी मंजुर केलेल्या या कायद्याचे तमाम शिव-शंभूप्रेमी आणि धर्मनिष्ठ सकल हिंदु समाजाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत.
जय श्रीराम... एकच तत्व... हिंदुत्व..!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra#Maharashtra#AntiConversionLaw#Hindutva#JayShriRam#DevDeshDharm#ShivajiMaharaj#SambhajiMaharaj#HinduUnity#DharmaRaksha#IndianPolitics#MaharashtraPolitics#BJP#Mahavikas#SanatanDharma#CulturalIdentity