Filter
Exclude
Time range
-
Near
महायुतीचा निर्धार - एकजूट कोल्हापूरच्या विकासासाठी! कोल्हापूरमध्ये शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा पार पडली. या विराट जनसभेत महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि कोल्हापूरकरांचे प्रेम महायुतीसोबत असून, येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित आहे, असा प्रतिसाद यावेळी दिसून आला. “आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना” या मंत्रावर विश्वास ठेवून, कोल्हापूरचा गौरवशाली वारसा जपत आधुनिक आणि सक्षम शहर घडवण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. प्रभू श्रीरामाने जसा १४ वर्षांचा वनवास सहन केला होता, तसाच कोल्हापूरकरांनी १५ वर्षांचा काँग्रेस राजवटीचा वनवास सहन केला आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून महायुतीला मत देऊन परिवर्तन घडवावे असे आवाहन याप्रसंगी शिंदे साहेबांनी कोल्हापूरकरांना केले. या मेळाव्याला आमदार श्री. राजेश क्षीरसागर, खासदार श्री. धैर्यशील माने, खासदार श्री. धनंजय महाडिक, आमदार श्री. चंद्रदीप नरके, माजी खासदार श्री. संजय मंडलिक, मा. जयश्रीताई जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विजय बलगुडे, जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, श्री. शारंगधर देशमुख, श्री. सत्यजित कदम आणि शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कोल्हापूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🗓️ १० जानेवारी २०२६ | 📍 कोल्हापूर @Rajesh9099 @mpdhairyasheel @dbmahadik @Sanjaymandlik09 @jcjadhav3100 #Shivsena #prakashabitkar #MahayutiForDevelopment #StrongLeadership #kolhapurprogress
1
22
35
130
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गायरान फुलेवाडी, प्रभाग क्रमांक ९ येथे आयोजित कोपरा सभेस उपस्थित राहिलो. या वेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच युवक व महिलांसाठीच्या योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेत, भविष्यातही सातत्याने विकासाची गंगा या भागात पोहोचवण्याचे आश्वासन याप्रसंगी नागरिकांना दिले. या प्रसंगी आमदार श्री. अमल महाडिक, शिवसेनेचे उमेदवार श्री. शारंगधर देशमुख, मा. संगीता संजय सावंत, भाजपचे उमेदवार श्री. विजयसिंह देसाई, मा. माधवी मानसिंग पाटील तसेच शिवसेना नेते श्री. हर्षल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 🗓️ १० जानेवारी २०२६ |📍गायरान फुलेवाडी, कोल्हापूर #Shivsena #prakashabitkar #ConnectingWithPeople #developmentwithtrust #kolhapurprogress
20
35
118
कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक निर्णय; ६०,००० गट नंबर ‘डीम्ड एनए’ प्रक्रियेला वेग..! कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथमच एक महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सुमारे १२०० गावांमधील तब्बल ६०,००० गट आणि सर्वे नंबर यांना 'मानीव अकृषिक' (Deemed NA - डीम्ड एनए) दर्जा देण्याची प्रक्रिया आता औपचारिकरित्या गतिमान झाली आहे. भूमी अभिलेख विभागाने यासाठी अत्यंत बारकाईने काम पूर्ण केले आहे. गावठाणांच्या २०० मीटर परिसरामध्ये येणाऱ्या सर्व गट आणि सर्वे नंबरचे अचूक नकाशे आणि तपशीलवार याद्या तयार करून त्यांची नोंदणी केली आहे. हे सर्व प्रस्ताव आता पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहेत. हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर, कोल्हापुरातील विकासकामांना निश्चितच मोठी चालना मिळेल. हा निर्णय ग्रामस्थ, शेतकरी आणि भूमालकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. प्रशासकीय कामांना गती देत जनतेला जलद न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न यापुढेही अविरतपणे सुरू राहील. 🗓️ ५ डिसेंबर २०२५ | 📍 कोल्हापूर #shivsena #prakashabitkar #landreforms #farmerrelief #kolhapurprogress
2
1
5
163
३१ ऑक्टोबर २०२५ | 📍 कोल्हापूर कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला वेग — पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व वाहतूक सुविधांचा विकास आराखडा कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांना कायमस्वरूपी उपाय मिळवण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या विकास आराखड्याला प्रारंभ झाला आहे. शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती मिळाली असून येत्या आठवड्यात अनेक कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. महापालिकेने दोन टप्प्यांत ४१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असून यात सुरू असलेल्या कामांना गती, पाणीपुरवठा योजनेचे अत्याधुनिकरण, रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेसाठी नवी साधने तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. रस्ता दुरुस्ती व निर्मितीसाठी महापालिका आता स्वतःचा डांबर निर्मिती प्लांट उभारणार आहे. नवीन प्लांट कार्यान्वित होईपर्यंत भाडेतत्त्वावर प्लांट घेऊन रस्त्यांच्या कामांना दिली जाईल. तसेच टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स) प्रक्रियेलाही वेग मिळेल. टीडीआरमुळे शहरातील रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा विकसित होण्यास मदत होते, शासनाचा खर्च कमी होतो आणि शहराचा नियोजित विकास साधता येतो. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे इतर वाहतूक सुधारणा उपाययोजना राबविण्यात येतील. शहरातील ४०,००० प्रॉपर्टीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, १४० ओपन स्पेस महापालिकेच्या नावावर नोंदवली जाणार आहेत. तसेच तेरा मेगावॅट सौरऊर्जेच्या प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे, महापालिका आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी, अधीक्षक अभियंता श्री. तुषार बुरुड, अतिरिक्त आयुक्त श्री. रविकांत अडसूळ, उपजिल्हाधिकारी श्री. संपत खिलारी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Shivsena #prakashabitkar #UrbanDevelopment #SmartCityMission #PublicInfrastructure #kolhapurprogress
2
76
🗓️ २२ ऑक्टोबर २०२५ l📍 नरतवडे, ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा MIDC कामगार संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या तसेच त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ती दिशा दिली. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण व औद्योगिक विकास यांचा समन्वय साधत सर्वांसाठी न्याय्य व सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच मोठ्या संख्येने MIDC परिसरातील कामगार उपस्थित होते. #shivsena #prakashabitkar #workersmeet #IndustrialDevelopment #EmpoweringWorkers #LabourRights #kolhapurprogress
3
118
राज्यात कोल्हापूरचाच डंका! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावत यावर्षी १२१९ नवउद्योजकांना २०० कोटींचे कर्ज देऊन १११% उद्दिष्ट पूर्ण केले. #Shivsena #Prakashabitkar #YouthEmpowerment #SkillDevelopment #KolhapurProgress #Maharashtra
1
2
173