कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागाने आपल्या कौशल्याने एक आदर्श निर्माण केला आहे. २०१६ मधील भंगारात निघालेल्या कचरा गाड्यांचे नूतनीकरण करून, त्या आता 'अतिक्रमण निर्मूलन ट्रक' म्हणून रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची ही संकल्पना सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील व वर्कशॉप प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी अवघ्या ६ दिवसांत पूर्ण केली. नवीन वाहने खरेदी करण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च या उपक्रमामुळे वाचला आहे. या गाड्यांमुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला आता अधिक गती मिळणार असून, ४ वॉर्ड कार्यालयांना स्वतंत्र वाहने उपलब्ध होणार आहेत.
महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी वर्कशॉपच्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अहोरात्र मेहनतीबद्दल व कल्पकतेबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा. आयुक्त डॉ. विजय पाटील, कार्यशाळा प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व वर्कशॉप विभागाचे सर्व कर्मचारी.
#WasteToBest #KMCKolhapur #WorkshopTeam #Innovation #DevelopmentNews