सातारा जिल्ह्यातील सैदापूर, ता. कराड येथे सदिच्छा भेटीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सैदापूरचे सरपंच श्री. फत्तेसिंह धनाजीराव जाधव (भैय्या) यांच्या निवासस्थानी आयोजित कोपरा सभेत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी नेतृत्वाची आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आली.
भारताच्या लोकशाही इतिहासात सर्वाधिक काळ लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून कार्य करण्याचा मान, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी, एकाही निवडणुकीत पराभव न स्वीकारलेली राजकीय कारकीर्द, जगभरातील ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान आणि विविध देशांच्या संसदांना १९ वेळा केलेले संबोधन या माध्यमातून आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजी यांनी भारताची जागतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातील २५ कोटींपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आले असून भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गरीब कल्याण, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या संकल्पनेमुळे देश नव्या उंचीवर पोहोचत आहे. या सर्व जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी ही कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री. सागर शिवदास, श्री. नानासो पाटसुपे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. राजकीरण जाधव, माजी खरेदी-विक्री संघ संचालक श्री. प्रकाश पवार, बेलवडे बुद्रुकचे सरपंच डॉ. सुशांत मोहिते तसेच सौ. मंजिरी कुलकर्णी, सौ. सविता देसाई, श्री. सौरभ टोंनपे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
📍 सैदापूर, ता. कराड, जि. सातारा
🗓️ १३ जून २०२६
#NarendraModi #12YearsOfModiGovernment #CornerMeeting #NirantarDhyas #NiranjaDavkhare