प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
- मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते
- भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी
- १९६४ ते १९९८ याकाळात अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, गोवा, लंडन, मुंबई अशा विविध ठिकाणी अध्यापक म्हणून काम.
- फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात ‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता प्रकाशित
- पहिला कवितासंग्रह - मेलडी (१९७०)
- १९६३ च्या कोसला या कादंबरीमुळे त्यांना ओळख मिळाली
नेमाडे यांची साहित्यसंपदा
– कवितासंग्रह - मेलडी (१९७०), देखणी (१९९१)
- कादंबऱ्या - कोसला (१९६३), बिढार (१९७५), झूल (१९७९) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०)
- समीक्षात्मक पुस्तके- साहित्याची भाषा (१९८७), टीकास्वयंवर (१९९०), तुकाराम (१९९४), साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (२००१) दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी (१९९०)
त्यांच्या साहित्यसेवेच्या सन्मानार्थ त्यांना ह. ना. आपटे पुरस्कार (१९७६ बिढारसाठी), कुरुंदकर पुरस्कार (१९८७), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), बहिणाबाई पुरस्कार (१९९१), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (२००१), लाभसेटवार फाउंडेशन पुरस्कार (२००३), पद्मश्री (२०११), जनस्थान पुरस्कार (२०१३), साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (२०१४) इ. अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.