MAITRI is forum of volunteers. We started our work in 1997 with Korku people in Melghat to help them fight malnutrition. It is now one of our many activities.
Mangesh Joshi, a dedicated Tata Motors employee, believes in creating a lasting impact. Led by Mangesh Joshi, the Melghat Mitra Group has been recognised by Tata Group for their exceptional volunteering work. These Tata employees took on the challenge of child hunger in Melghat. Through grain banks, sustainable farming initiatives, and youth training, they were able to create lasting change which empowered the community.
#BuildingTogetherMillionDreams#TataMotors#ConnectingAspirations
‘मैत्री’ काम करत असलेल्या मेळघाटातील १२ गावातल्या १ ते १४ वयोगटातील मुलांचे दंतआरोग्य तपासणी शिबिर नुकतेच झाले. दंतवैद्य स्वानंदी केळकर यांनी ४ ते ७ एप्रिल दरम्यान कुटिदा गावात घरासमोरच एक खाट टाकून हे शिबीर घेतलं. धन्यवाद स्वानंदी केळकर !
२ ते ८ वयोगटातील मुलांचा यात अधिक सहभाग होता. दंतआरोग्य तपासणी करुन त्याचं महत्व सांगितलं. दात घासण्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. हाथरु आणि जारिदा आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचीही दात तपासणी त्यांनी केली.
मेळघाटमध्ये जारिदा नावाच्या गावात “विज्ञान प्रकल्प स्पर्धा” पार पडली.. विज्ञानविषयक मुला-मुलींमध्ये रूची निर्माण व्हावी हा हेतू होता.. पुण्याहून जाऊन काही मित्रांनी तिथल्या आयोजनात भाग घेतला. स्थानिक मित्र तर होतेच.
तुम्हीही अशा सामाजिक कामात सहभागी होऊ शकता. किती दिवस आपण “त्यांनी हे करावं, ह्यांनी हे करावं” असं म्हणत बसणार? आपल्याला कायमस्वरूपी पूर्णवेळ सामाजिक काम तर करता येणार नाही परंतु वर्षातून एकदा आठवडाभर सामाजिक कामासाठी का देता येणार नाही का? अवश्य जोडून घ्या.. @Maitripune ला किंवा मला Direct Message करा किंवा maitri1997@gmail.com लिहा. “मैत्री” संपर्क साधेल.
#मैत्री#समाजकार्य#मेळघाट#मैत्रीसंस्था#समाजसंघटन
पळण्याचा व्यायाम करणारे पुण्यात किमान ५,००० आहेत आणि ते हवेच्या प्रदूषणानं अत्यंत त्रस्त आहेत. तर ह्यावर उपाय काय करता येईल असा सगळे विचार करत होतो.
एक खरं आहे की एखाद्या शहराच्या हवेची गुणवत्ता एका रात्रीत सुधारणार नाही किंवा त्याला एकच एक उत्तरही नाही. पण, "शुध्द हवा हा आमचा मानवी, मुलभूत हक्क आहे" असे फलक घेऊन हे पळणारे ५,००० आणि त्यांना साथ देणारे ५,००० रस्त्यावर आले आणि पुणे महानगरपालिकेसमोर तासभर उभे राहिले तर येत्या वर्षभरात ज्या तीन निवडणुका होणार आहेत त्यातल्या उमेदवारांना तरी त्यावर काही भूमिका तरी जाहीर करावीच लागेल..
आज आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस आहे, त्या दिवशी "शुध्द हवा" हा आमचा मानवी हक्क आहे, अशी आठवण ठेवायलाच हवी.
#HumanRightsDay2023#HumanRights#मानवीहक्क#प्रदूषण#हवाप्रदूषण#pollution#AirQuality#पुणे
त्या येतील की नाही माहीत नाही परंतु ह्या भेटीच्या निमित्तानं देशाच्या अत्युच्च पदावरील व्यक्तीनं “मैत्री” ची दखल घेतली हे फार महत्वाचं. ह्यानं आनंदाची भावना तर आहेच पण जबाबदारीची जाणीवही आहे. आपल्या सर्वांची समूहशक्ती ही “मैत्री” ची उर्जा आहे. त्या जोरावरच आपण इथवर आलो.
ह्या भेटीनं एका अर्थानं आपण आजवर करत असलेल्या आपल्या कामाची नोंद सरकारनं घेतली आहे असं वाटतं..
म्हणून सर्वांना माहितीसाठी अतिशय आनंदानं कळवलं….
शुभेच्छांसह,
“मैत्री”
संपर्क: ९३०९९ ३००१० (फक्त SMS आणि Email साठी) ,
ईमेल: maitri1997@gmail.com
भेट १० मिनिटांचीच झाली. त्यात आपण तिथले प्रश्न तर मांडलेच पण सोबत आपण त्यावर काय उत्तर शोधतो आहोत ते ही सांगितलं. त्यांना आपण मेळघाटात येण्याचं निमंत्रण आणि तिथल्या मुली-महिला, तिथले लोक ह्यांना प्रोत्साहन देण्याची विनंती केली आहे.
देशाच्या राष्ट्रपतींशी “मैत्री” ची भेट
कळवायला अत्यंत आनंद होतो आहे की मागच्या आठवड्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना आपली “मैत्री” ची टीम भेटली. गेली अनेक वर्ष आपण जे सातत्यानं काम करतो आहोत त्याचीच ही पावती आहे असं वाटलं.
@rashtrapatibhvn
maitri1997@gmail.com
दूरपल्ल्याचं नियोजन काय करता येईल? असं पुन्हा होणार नाही म्हणून नागरिकांच्या संघटना आणि स्वयंस्फूर्त संस्था कशा एकत्र करता येतील? त्यांचा सरकारी संस्थांशी समन्वय कसा साधता येईल? @Maitripune@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
नदीकाठची झाडं बेसुमार तोडली की काय होतं पहा.. हे मुंसियारी खोऱ्यातलं खोतीला गावचं दृश्य आहे. तिथल्या सरपंच नंदा बिश्त ह्यांनी पाठवलंय.
२०१३ मध्ये “मैत्री” चे ‘मित्र’ तिथे जाऊन त्यांनी पुनर्वसनाचं, मदतीचं काम केलं होतं. प्रशांत, दत्ता, शिरीष सांगत होते की गेल्या ११ वर्षांत आपण मागच्या संकटातून काहीच शिकलो नाही..
#महापूर
हिमाचल प्रदेश आणि एकूणच उत्तर भारतात मुसळधार पावसानं आणि पूरानं धुमाकूळ घातला आहे.. मागच्या पूराच्या वेळी "मैत्री" नी तिथे @Maitripune तातडीच्या मदतीचं आणि पुनर्वसनाचं काम केलं, तेंव्हाच अशा घटना वारंवार होणार हा अंदाज होता.. शास्त्रज्ञांनीही अशा घटना वारंवार होत रहाणार असल्याचं सांगितलं आहेच.
सरकार, नागरी स्वयंस्फूर्त संस्था आणि ह्या विषयातले प्रशिक्षित कार्यकर्ते ह्यांनी अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेतआणि झाल्या तरी त्याचा दाह कमी व्हावा म्हणून दूरगामी नियोजन करून काम करत रहायला पाहिजे. #disasterpreparedness
Was watching a documentary on #netflix last night,#OurPlanet2 narrated by #DavidAttenborough, the importance of preserving our natural habitat worldwide for the future generations is emphasized on, this meeting will be able to make us understand our role in preserving the environment locally and will be able to build consensus on the need to protect the natural habitat surrounding our very city #Pune, this is our opportunity to be a part of a movement of which our future generations would be proud and thankful for. #DoJoin.
*खास online बैठक*
मंगळवारी २० जून सायंकाळी ०६:३० ते ७:३०
पुण्यातील “नदी सुधार प्रकल्पाच्या” विरोधात सध्या नागरिक आंदोलन करत आहेत. मध्यंतरी झालेल्या ‘चिपको’ आंदोलनात आपल्यापैकी काही सहभागीही झाले होते.
हा प्रकल्प काय आहे? ह्यात काय धोके आहेत? पर्यावरणाचं काय होणार आहे? (1/3)
*खास online बैठक*
मंगळवारी २० जून सायंकाळी ०६:३० ते ७:३०
पुण्यातील “नदी सुधार प्रकल्पाच्या” विरोधात सध्या नागरिक आंदोलन करत आहेत. मध्यंतरी झालेल्या ‘चिपको’ आंदोलनात आपल्यापैकी काही सहभागीही झाले होते.
हा प्रकल्प काय आहे? ह्यात काय धोके आहेत? पर्यावरणाचं काय होणार आहे? (1/3)
अशा आशयाची मांडणी करण्यासाठी आपण येत्या मंगळवारी त्यातल्या काही कार्यशील नागरिकांना आपल्या online बैठकीसाठी बोलावलं आहे.
हा प्रकल्प झाल्यास अख्ख्या पुणे शहरावर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता आहे, म्हणून तो समजून घेणं अत्यंत निकडीचं आहे.
यासाठी नक्की वेळ राखून ठेवा. (2/3)
*Invite: A special Tuesday meeting*
Are you curious about the River Development Project? Do you have Qs about it? Not yet decided as to what to make of it? Looking for ways to actively contribute to this cause?
Join us online on Tuesday, 20th June, at 6.30 pm. (DM for link)
We invite you to be part of an expert panel discussion on this topic that is going affect each and every one of us. We have assembled a panel of ecological experts and dedicated activists from esteemed organizations such as Jeevitnadi and Oikos. @Jeevitnadi@ForOikos
Together, we will delve into the details of the Pune Riverfront Development Project, exploring its significance and potential impact on our environment.
Your participation matters! Share with your friends, urging them to join us too.