भांडुप येथील श्री. साईभजन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री. साईभजन प्रिमियर लीग (SPL) या क्रिकेट स्पर्धेला श्री. विठ्ठलजी परब यांच्यासह उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
#Bhandup#SPL#Cricket#SaiBhajanMandal
वरळी येथे जल अभियंता यांच्यासोबत विविध प्रश्नांवर संयुक्त बैठक…!
भांडुप विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आज वरळी येथे जल अभियंता श्री. दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी नगरसेवक श्री. सुरेशजी शिंदे, नगरसेविका दिपमालाताई बडे, शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम यांच्यासह प्रभागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाशी सकारात्मक संवाद साधण्यात आला.
#Worli#Water#Bhandup#WardNo114#Mumbai#Shivsena#RajoolSanjayPatil
वाढत्या महागाईच्या विरोधात भांडुपमध्ये तीव्र आंदोलन…!
गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असून दैनंदिन गरजा भागवणे अधिक कठीण होत चाले आहे. या वाढत्या महागाईचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबाच्या जीवनमानावर होत आहे.
या दरवाढीच्या निषेधार्थ भांडुप विधानसभेच्या वतीने भांडुप स्टेशन रोड परिसरात आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, नगरसेवक श्री. सुरेशजी शिंदे, नगरसेविका दिपमालाताई बढे, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वाढत्या महागाईविरोधात निषेध व्यक्त केला.
#Bhandup#lpgpricehike#Protest#Mumbai#petrolpricehike
गॅस व पेट्रोल दरवाढीविरोधात निषेध आंदोलन!
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक कठीण होत आहे. गॅस व पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात आयोजित जाहीर निषेध आंदोलनात सहभागी व्हा.
📅 दिनांक: सोमवार, ८ जून २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 स्थळ: भांडुप रेल्वे स्थानक, भांडुप (पश्चिम)
महागाई आवरा, जनतेला वाचवा!
आपली उपस्थिती हा जनतेच्या हक्काचा आवाज अधिक बुलंद करेल.
#Bhandup#ShivSenaUBT#Mumbai#Andolan
आज युवासेनेच्या वतीने उपनगरातील युवा सडेतोड वक्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला उपस्थित राहून युवक-युवतींची प्रभावी मते आणि विचार ऐकण्याची संधी मिळाली.
#Yuvasena#Bandra#Mumbai#Upnagar
गोवंडी येथील नटवर पारेख कंपाउंड परिसरात असणाऱ्या CBSE शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी प्रस्तावित करून घेतलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.
या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होण्यास मदत होईल.
#Govandi#MankhurdShivajinagar#CBSESchool
मिठागरांचे संरक्षण झाले तर पर्यावरणाचे संवर्धन होईल…!
मुलुंड येथे मिठागरे वाचवा समितीच्या वतीने मिठागरांच्या संवर्धन व संरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या जन आंदोलनात सहभागी झाले.
मुंबईच्या पर्यावरणीय समतोलासाठी आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मिठागरांचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक आहे.
आज मुलुंड येथील केळकर परिसरातील मिठागर येथे मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहून मिठागरांच्या संरक्षणासाठी विरोध दर्शवला.
#SaveSaltPans#MithagarVachva#Mulund#EnvironmentProtection
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या राज्याभिषेकाने स्वराज्याला नवे तेज दिले, त्या ऐतिहासिक क्षणाला आणि शिवरायांना मानाचा मुजरा!
#rajabhishek_sohla#chatrapatishivajimaharaj
Attended the World Environment Day event organized by The Bhamla Foundation. Every year Asif Bhamla ji and Saher Bhamla organise this event to make people aware of the importance of saving our environment and have been doing great initiatives of cleaning beaches for more than 500 weeks. It is always a great pleasure in joining the collective effort towards a cleaner, greener, and healthier tomorrow.
#WorldEnvironmentDay#SaveEnvironment#PlantTrees#BhamlaFoundation