चेहऱ्यावर गोळी झेलूनही जो न थांबता लढतच राहिला, तो वीर योद्धा म्हणजे लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए (34 RR, KC) 19 डिसेंबर 2024 रोजी काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादविरोधी ऑपरेशनमधे, भारतीय सैन्याचा हा शूर जवान अक्षरशः मृत्यूशी हातमिळवणी करुन आला!!!
34 RR मध्ये कार्यरत असलेल्या लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. यांना या भीषण चकमकीदरम्यान चेहऱ्यावर आणि उजव्या खांद्यावर गोळ्या लागल्या. या जखमा इतक्या भयंकर व भीषण होत्या की त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य माणसाने तिथून माघारच घेतली असती..
पण भारत मातेचा, भारतीय सेनेचा हा सैनिक सामान्य नव्हता! जबरदस्त रक्तस्त्राव, प्राणांतिक वेदना आणि साक्षात मृत्यू समोर असतानाही ते जराही डगमगले नाहीत. अविश्वसनीय, अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवत, त्याही स्थितीत, एका जहाल दहशतवाद्याचा खात्मा केला आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवत संपूर्ण मोहिमेच्या यशात मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या या या अद्वितीय शौर्यासाठी आणि अदम्य साहसासाठी, त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलं. काल, म्हणजेच 8 जून 2026 रोजी मान. राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने कीर्ती चक्र पावन झालं...
लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. यांनी संपूर्ण राष्ट्राला दाखवून दिले की भारतीय सैनिक कोणत्या मातीचे बनलेले असतात, त्यांची जिगर आणि त्यांची राष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठा काय असते ते...
लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. यांना शिरसाष्टांग दंडवत!!!
🙏🏻🇮🇳जय हिंद🇮🇳🙏🏻