घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पांढऱ्या पट्ट्या हटविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवार, दुपारी ३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार प्रशासनाने सकाळीच घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कार्यवाही सुरू केली.
जैन बांधव आपल्या धर्मगुरूंप्रती श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या काढत असले, तरी सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवर कोणत्याही धर्म, पंथ किंवा समाजासाठी विशेष व्यवस्था निर्माण करणे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी समान असून, तेथे कोणालाही अडथळा निर्माण होईल किंवा वेगळे नियम लागू होतील अशी कृती टाळली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडली आहे.
#MNSAdhikrut