विकास की पर्यावरणाचा विनाश?
🌳पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण स्टेटस ठेवून झाडे लावण्याच्या गप्पा मारतोय,
पण आपल्याच देशात विकासाच्या नावाखाली अधिकृतपणे झालेल्या वृक्षतोडीची ही धक्कादायक आकडेवारी डोळे उघडणारी आहे:
🚨 राष्ट्रीय पातळीवरील महा-प्रकल्प:
अंदमान निकोबार: १.५ कोटींहून अधिक झाडे
केन-बटवा नदी जोड प्रकल्प: ४० लाखांहून अधिक झाडे
हसदेव अरण्य: १२ लाखांहून अधिक झाडे
बिहार (विविध प्रकल्प): १० लाखांहून अधिक झाडे
सिंगरोली कोळसा खाण: ६ लाखांहून अधिक झाडे
🚧 महाराष्ट्रातील अधिकृत वृक्षतोड:
पुणे (मनपा क्षेत्र व रिंग रोड): ७०,००० हून अधिक झाडे
मुंबई (मेट्रो, कोस्टल रोड व इतर - १० वर्षे): १.५ लाख झाडे
कोल्हापूर (महामार्ग विकास): २५,४३३ झाडे
पिंपरी-चिंचवड (PCMC): २१,३३८ झाडे
चंद्रपूर (खाण प्रकल्प - ताडोबा क्षेत्र): १८,००० झाडे
ठाणे (विकास व बांधकाम): ६,५२६ झाडे
अहिल्यानगर (हायवे): ५,७०० झाडे
अमरावती (हायवे): ५,१०० झाडे
(टीप: ही फक्त 'अधिकृत' आकडेवारी आहे. अनधिकृतपणे होणाऱ्या वृक्षतोडीची तर गणतीच नाही!)
🩸 'बळी' विकासाचा की निसर्गाचा?
आपल्या संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ फोडून (किंवा काही ठिकाणी कोंबडा-बकरा देऊन) केली जाते.
पण आज कोणतीही विकासकामे सुरू करताना सगळ्यात आधी लाखो झाडांचा 'बळी' दिला जात आहे, हेच भीषण वास्तव आहे.
🔥 परिणाम आपण रोज भोगतोय
या सामूहिक विनाशाचे परिणाम आज आपल्यासमोर आहेत – उन्हाळ्यातील ५० अंशांपर्यंत जाणारी असह्य उष्णता, पावसाचे अनिश्चित दिवस, कमी वेळात होणारी ढगफुटी आणि गायब होत चाललेला हिवाळा!
निसर्गाचा गळा घोटून आपण ५ ट्रिलियन इकॉनॉमी आणि 'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहोत!
या महा-विकासासाठी आणि निसर्गाच्या विनाशासाठी सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#झाडखाऊ #लाकूडतोड्या
#EnvironmentDay #SaveTrees #DevelopmentVsNature #GlobalWarming #Maharashtra #ClimateChange #SaveHasdeo #SaveWesternGhats
#Punekar #SavePune
@cm