📍शिवसंवाद दौरा - जळगाव जिल्हा लोकसभा पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव ग्रामिण, अमळनेर विधानसभा आढावा बैठक
उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’च्या दुसऱ्या दिवशी आज पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, अंमळनेर, विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत स्थानिक संघटनात्मक स्थिती, आगामी निवडणुकांची तयारी, बूथ रचना, जनसंपर्क अभियान, पक्षविस्तार तसेच आगामी काळातील संघटनात्मक नियोजन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहाही मतदारसंघांमधील शिवसेनेची मजबूत संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनाधार पाहता आगामी काळात ही ताकद अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसेनेची खरी ताकद ही तिच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने आपल्या गावात, वॉर्डात आणि बूथ स्तरावर अधिक सक्रिय होत नवीन कार्यकर्ते जोडणे, युवा वर्गाशी संवाद वाढवणे आणि शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे हे संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी माझ्या समावेत मंत्री श्री. गुलाबराव पाटील, खासदार श्री. मिलिंद देवरा, आमदार श्री. किशोर पाटील, श्री. अमोल पाटील, आमदार आणि पाचोरा नगराध्यक्षा सौ. सुनीता पाटील, भडगाव नगराध्यक्षा सौ. रेखा मालचे, राज्यसंघटन प्रमुख श्री. आनंद परांजपे, महिला आघाडी संपर्क प्रमुख श्री. सरिता माळी, माजी खासदार श्री. उन्मेष पाटील, जिल्हाप्रमुख श्री. रावसाहेब पाटील, श्री. विष्णू भंगाळे, श्री. वासुदेव पाटील, उपस्थित होते.
#shivsena #Jalgaon #OrganizationBuilding #ElectionPreparation #GrassrootsLeadership
@Shivsenaofc
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@DrSEShinde