Filter
Exclude
Time range
-
Near
नागरिकांसाठी सडेतोड ..बिनधास्त ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही घरगुती गॅस जोडणी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित परिसरातील रहिवाशांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक सोसायट्यांमधील प्रतिनिधींनी आपापल्या अडचणी मांडल्या. यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं की, जर लवकरात लवकर घरगुती गॅस जोडणी न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @TMCaTweetAway @BJP4India @BJPMahilaMorcha #NareshMhaske #ThaneGasIssue #MGLMeeting #PublicDemand #GasConnectionProblem #ThaneResidents #MGLResponsibility #CitizensFirst #BasicNeedsMatter #UrbanWelfare #ThaneDevelopment #RightToBasicServices #ThaneUpdate #AnandAshram #Shivsena #MGL
1
4
100
ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही घरगुती गॅस जोडणी झालेली नाही, ही बाब अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कित्येक वेळा महानगर गॅस लिमिटेड (MGL) या कंपनीकडे या संदर्भात मागण्या करण्यात आल्या, अर्ज दिले, बैठकाही घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नव्हती. म्हणून, या भागातील नागरिकांना घरगुती गॅसऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत होते. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक नौपाड्यातील आनंद आश्रम येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत MGL चे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही. महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीचे जबाबदारीने काम करणं अत्यावश्यक आहे. या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी स्वतः अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि MGL प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या. तसेच मी MGL अधिकाऱ्यांना थेट सांगितले “तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” यामुळे महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांनी आश्वासन दिले की, लवकरात लवकर सर्व प्रलंबित तक्रारी सोडवून गॅस जोडणी पूर्ण केली जाईल. यावेळी विलास जोशी, भास्कर पाटील, किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी, प्रीतम रजपूत,महानगर गॅस लिमिटेडचे प्रमुख अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. @Shivsenaofc @mieknathshinde @DattaramGawas4 #NareshMhaske #ThaneGasIssue #MGLMeeting #PublicDemand #GasConnectionProblem #ThaneResidents #MGLResponsibility #CitizensFirst #BasicNeedsMatter #UrbanWelfare #ThaneDevelopment #RightToBasicServices #ThaneUpdate #AnandAshram #Shivsena #MGL
1
3
81