आज ठाणे रेल्वे स्थानकातील विविध प्रलंबित प्रश्न, प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी मी मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. ठाणे रेल्वे स्थानक लाखो प्रवाशांच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सर्व सोयीसुविधा मिळाल्याच पाहिजेत.
यावेळी नव्याने उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कामाचा आढावा घेतला. डी-मार्टच्या सीएसआर फंडातून सुरू असलेल्या या कामामध्ये होत असलेल्या विलंबाबाबत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचं कामही जलद गतीने पूर्ण व्हावं, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय कमी होईल यावर भर देण्यात आला. तसेच फलाटांवर मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय कक्ष सुरू करणं आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामं वेळेत पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्यासाठीही प्रशासनाला निर्देश देण्यात आलं.
तसेच ठाणे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्याने पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, ही समाधानाची बाब आहे. तसेच मुलुंड दिशेला नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्यामुळे भविष्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामावरही चर्चा करण्यात आली. ठाणे पूर्वेकडील सॅटिस पुलावरून लवकरच टीएमटी बस सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांच्या वाहतूक सुविधेत आणखी भर पडणार आहे. याचवेळी नवी मुंबई परिसरातील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन रेल्वेच्या मालकीच्या मोगली धरणासंदर्भातही चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात हे धरण दिलं तर परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते, यासाठी माझ्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नगरसेविका सौ. चांदणी विजय चौगुले, अॅड. श्वेता सुभाष काळे, गौरी किशोर आंग्रे यांनी डीआरएम हिरेश मीना यांना या बैठकीत लेखी निवेदन दिलं.
याशिवाय बी केबिन परिसरातील रहिवाशांना देण्यात आलेल्या निष्कासन नोटिसांमुळे निर्माण झालेली चिंता देखील या बैठकीत मांडण्यात आली. विकासाच्या कामांसोबत नागरिकांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षणही तितकेच महत्त्वाचं आहे, म्हणून स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी योग्य तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही विकासकामं सुरू आहेत. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ही सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू, असा विश्वास मी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माझ्यासह भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार माधवी नाईक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, किरण नाकती, रमाकांत पाटील, विकास पाटील, निखिल बुडजडे, विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, वृषाली वाघुले, संतोष बोडके, ज्येष्ठ शिवसैनिक प्रीतम राजपूत तसेच शिवसेनेचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@Central_Railway @indianrailway__ @adv_madhavi @sanjay_waghule
#nareshmhaske #ThaneRailwayStation #ThaneDevelopment #CentralRailway #RailwayInfrastructure #PassengerConvenience #ThaneUpdates #RailwayModernization #ShivSena