“Healthy खाऊनही spikes का येतात?”
CGM series सुरू झाल्यापासून
हा प्रश्न खूप लोक विचारत आहेत
“मी sugar खात नाही…”
“Breakfast healthy असतो…”
“Weight पण फार नाही…”
“Reports जवळपास normal आहेत…”
मग spikes का येतात?
25 वर्षांच्या practice मध्ये
metabolism बद्दल एक गोष्ट वारंवार जाणवली
शरीर फक्त “food” ला response देत नाही.
शरीर:
👉 timing ला response देतं
👉 sleep ला response देतं
👉 stress ला response देतं
👉 inactivity ला response देतं
👉 आणि repeated overload ला response देतं
1 “Healthy food” म्हणजे “healthy response” असेलच असं नाही.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
काही लोकांमध्ये:
पोहे
oats
brown bread
smoothies
fruit juice
diet snacks
हे सुद्धा significant spikes देऊ शकतात.
कारण food पेक्षा
body response जास्त महत्त्वाचा असतो.
2 समान जेवण… पण वेगळे spikes
हा CGM मधला सर्वात interesting भाग असतो.
Same breakfast असूनही:
👉 एका दिवशी sugar stable
👉 दुसऱ्या दिवशी spike
का?
कारण मागच्या रात्रीची झोप, stress level, previous meal, physical activity आणि recovery हे सगळं glucose response बदलू शकतं.
म्हणून metabolism हा फक्त calories चा विषय नाही.
तो body signalling चा विषय आहे.
3 Poor Sleep हा hidden metabolic stress असू शकतो.
एका रात्रीची कमी झोप
दुसऱ्या दिवशी insulin response बदलू शकते.
काही patients मध्ये:
👉 cravings वाढतात
👉 spikes वाढतात
👉 recovery slow होते
👉 hunger signals बदलतात
आणि त्यांना वाटतं
“मी काही वेगळं खाल्लंच नाही…”
4 Stress (ताण) CGM वर दिसू शकतो
हे अनेकांना surprising वाटतं.
Body stress hormones release करते.
यामुळे glucose release वाढू शकतो.
म्हणून काही लोकांमध्ये:
👉 office stress
👉 emotional overload
👉 travel
👉 irregular routine
दरम्यान spikes वाढलेले दिसतात.
5 Meal नंतरची inactivity सुद्धा महत्त्वाची आहे.
काही वेळा meal पेक्षा
meal नंतरची inactivity जास्त समस्या निर्माण करते.
10-15 मिनिटांची walk सुद्धा काही patients मध्ये glucose handling सुधारताना दिसते.
Timing matters
6 CGM मधला सर्वात मोठा फायदा काय?
तो patient ला blame करत नाही.
तो patterns दाखवतो.
आणि अनेक वेळा patients पहिल्यांदाच समजतात
“माझ्या शरीराला नेमकं काय tolerate होत नाही?”
7 पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे
प्रत्येक spike dangerous नसतो.
Metabolic context समजून घ्यावा लागतो:
👉 sleep
👉 stress
👉 waistline
👉 fatty liver
👉 activity
👉 insulin resistance
👉 medicines
👉 overall lifestyle pattern
हे सगळं एकत्र पाहिल्यावरच खरी story समजते.
लक्षात ठेवा
“Healthy food” पेक्षा
“Healthy metabolic response” जास्त महत्त्वाचा आहे
कारण काही वेळा problem food मध्ये नसते…
Problem शरीराच्या response pattern मध्ये असते.
📲 आज रात्री WhatsApp Channel वर एक interesting CGM interpretation share करणार आहे
कालचा CGM graph interpretation पाहिलात का?
हा post pre-diabetes, obesity, fatty liver किंवा diabetes असलेल्या व्यक्तीला नक्की share करा
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉
@KulkarniRL
#SugarPatterns
#CGM
#MetabolicHealth
#PreDiabetes