आज जहांगिरपूर ता. मोताळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहवर्धक स्वागत करण्यात आलं. लहानग्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता . तसेच गावातील नागरिक, पालक, शिक्षक, आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली ! जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळेला गावातील शेख सुपडू शेख आलम, फिरोज खान, युनूस खान, शेख अमीन, उस्मान शहा यांनी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. तसेच शेख रहिम, शेख सईद यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. या सर्वांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. जि प मराठी प्राथमिक शाळेलाही यावेळी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला! यावेळी कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी धंदर साहेब, पंचायत समितीचे माजी उपसभापती युनूसशेठ, शिवसेना तालुकाप्रमुख विजय इंगळे, सरपंच प्रभाकर इंगळे, उपसरपंच जयचंद्र चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष रहिम ठेकेदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख सईद, समाधान राऊत, ग्राम पंचायत सदस्य शेख खलिल ठेकेदार, जयंत चोपडे, रेखाताई इंगळे, विजय चव्हाण, शेख अन्वर, मौलाना युसुफ, केंद्र प्रमुख नंदिनी पवार, जि.प.उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जुनेद सर, सहाय्यक शिक्षक नसीम सर, जि.प.मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र वाघ, सहाय्यक शिक्षक सुनिल वाघ यांची उपस्थिती होती!
#Motala #स्कूलचलेहम #शाळाप्रारंभ #जि_प_उर्दू_प्राथमिक_शाळा #जि_प_मराठी_प्राथमिक_शाळा #गणवेश_वाटप #UniformDistribution #schoolsupplies #school #ChildrenBackToSchool #NewAcademicYear2025 #FreshStart2025 #शुभेच्छा