वाल्मिकी विकास संघाने आयोजित केलेल्या समाजाला योग्य दिशा देणारे, विचारांच्या शुद्धतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहून मी भगवान महर्षी वाल्मिकी यांचं दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं.
कार्यक्रमादरम्यान मी उपस्थित त्यांची संवाद जपताना सांगितलं की “महर्षी वाल्मिकी ऋषींचे विचार आणि त्यांनी दिलेला संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात केला तर नक्कीच जग सुधारण्याच्या मार्गावर वाटचाल करेल.” कारण महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की मनुष्य कितीही अंधारात असो, पण अंतःकरणात प्रकाश जागवला तर बदल शक्य आहे. त्यांच्या चरित्रातून आणि विचारांतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनात सुधारणा घडवायची असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते.
वाल्मिकी विकास संघाने या उत्सवाचं आयोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केलं होतं. समाजातील विविध घटक, महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला होता. यासाठी मी त्यांचं मनापासून कौतुक केलं.
यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार करून वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
#nareshmhaske #MaharshiValmikiJayanti #ValmikiJayanti2025 #ValmikiVikasSangh #HumanityFirst #PathOfRighteousness #SocialHarmony #CulturalEvent #ThaneUpdates #MoralValues #PositiveChange #CommunityCelebration #UnityInSociety #ThaneDevelopment