सुट्टीच्या दिवशी काम केलं म्हणून बॉसने झापलं
सुट्टीच्या दिवशी काम केलं म्हणून बॉसने झापलं! भारतीय कर्मचाऱ्याला नॉर्वेमध्ये मिळाला मोठा झटका; वाचा काय आहे कारण? आपल्या भारतात सुट्टीच्या दिवशी किंवा ओव्हरटाईम काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 'डेडिकेटेड' समजून त्याची पाठ थोपडली जाते. पण नॉर्वेमध्ये काम करणाऱ्या विनोद नावाच्या एका भारतीय व्यक्तीसोबत याच्या अगदी उलट घडलं. एका प्रोजेक्टसाठी त्याने स्वतःची हक्काची सुट्टी कॅन्सल केली, पण बॉसने कौतुक करण्याऐवजी त्याला केबिनमध्ये बोलावून चांगलंच झापलं! "तुमच्या अशा कामामुळे ज्युनियर्सवर चुकीचा परिणाम होईल आणि त्यांना वाटेल की ओव्हरवर्क म्हणजेच डेडिकेशन आहे," असं बॉसने विनोदला ठणकावून सांगितलं. नॉर्वेमधील हे 'वर्क-लाइफ बॅलन्स' आणि तिथलं अनोखं वर्क कल्चर नेमकं कसं आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Indian employee scolded by Norwegian boss for working on a holiday! The shocking reality of Norway's work culture! In India, working late hours, skipping lunch, or sacrificing weekends is often glorified as hard work and dedication. However, when Vinod, an Indian techie living in Norway, tried the same approach by canceling his leave to finish a project, he got a major reality check from his boss! Instead of a promotion or praise, Vinod was strictly reprimanded. His boss explained that overworking sets a toxic example for juniors, who might think sacrificing personal life is the only way to show dedication. Watch this video to find out how Norway prioritizes strict 'Work-Life Balance' over toxic hustle culture!
#WorkLifeBalance #NorwayWorkCulture #IndiaVsNorway #thodkyaat