ठाणे शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, आधुनिक आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करत असतो. आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टेभींनाका येथे अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनीक सी.आर. वाडिया दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आज माझ्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंतविभागात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. अनेक वेळा गर्दीमुळे उपचार उशिरा होतो किंवा रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावं लागतं. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून, रुग्णांना वेळेवर, मोफत आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी म्हणून हे डेंटल क्लिनीक सुरू करण्यात आलं आहे.
या दवाखान्यात डेंटल चेकअप, डेंटल क्लिनींग, डेंटल फिलींग, टूथ एक्सट्रॅक्शन या सर्व सेवा मोफत करण्यात येणार आहे. तसेच या सेवांसाठी २ स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पशुवैद्यकीय विभागामार्फत ठाण्यातील पाळीव कुत्रे, मांजरे यांच्या नोंदणीसाठी ‘Pet Care Thane’ हे सॉफ्टवेअर सुरू केलं आहे. या डिजिटल सॉफ्टवेअरमुळे कुत्रे, मांजरे यांसारख्या पाळीव प्राण्यांची नोंदणी, लसीकरण नोंदी आणि मालकांची माहिती आता फक्त एका क्लिकवर समजेल.
उद्घाटन सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागरिकांच्या सेवेसाठी एकत्र काम करणारी ही संपूर्ण टीम हीच माझी खरी ताकद आहे.
तसेच जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सीएसआर निधीतून मिळालेल्या नवीन सोनोग्राफी मशीन्स आता आरोग्य केंद्रांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काजूवाडी आणि शिळ आरोग्य केंद्रामध्ये बसवण्यात आलेल्या नव्या एक्स-रे मशीनमुळे छातीचं, हाडांचं आणि इतर निदान प्रक्रियेचे एक्स-रे अधिक वेगवान आणि अचूक होणार आहेत. यामुळे रुग्णांवर योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मोठी मदत होणार आहे.
औषध पुरवठा व्यवस्थेतही मध्यवर्ती औषध भांडारगृहातून सर्व आरोग्य केंद्रे, प्रसूतीगृहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे औषधांचे नियमित व वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सप्लाय चेन प्रणाली अमलात आणली आहे. यामुळे औषधांचा तुटवडा, कालबाह्यता किंवा वितरणातील विलंब यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
आजच महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने २२ आयुष्यमान आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन अशा अनेक प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. ठाणेकरांना तात्काळ, आधुनिक आणि मोफत सुविधा मिळाव्यात यासाठी माझे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.
#nareshmhaske #FreeHealthcare #SuperSpecialityClinic #DentalClinic #CRWadiaHospital #ModernHealthcare
#ThaneMunicipalCorporation #TMCUpdates
#AyushmanArogyaKendra #ArogyaSeva #HealthInitiative
#DigitalThane #PetCareThane #PetRegistration
#UltrasoundMachine #XRayMachine #MedicalFacilities
#CSRInitiative #GICHousingFinance