(Tech News In #Marathi#मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal
Son of Thanjai या गेमचा (open world) गेमप्ले ट्रेलर प्रकाशित झाला असून गेमचं कथानक चोला साम्राज्याची भव्यता, त्या काळातील राजकीय कारस्थाने यांपासून प्रेरित आहे.
लिंक youtu.be/f5YbhRagGnE
(⚠️या ट्रेलरमध्ये हिंसात्मक दृश्ये आहेत)
#SonOfThanjai#Marathi#मराठी
सन ऑफ थंजईमध्ये Surul Vaal या अनोख्या शस्त्रासह ॲक्शन, स्टेल्थ आणि सिनेमॅटिक स्टोरी अशा गोष्टी एकत्रित दिसतील.
ही गेम चेन्नईच्या Ayelet Studio ने तयार केली असून PC, PS5 आणि Xbox Series X|S साठी उपलब्ध होईल.
#SonOfThanjai#Marathi#मराठी
ही गेम पुण्याच्या Nodding Heads Games कंपनीने बनवली आहे!
यांची यापूर्वीची Raji: An Ancient Epic गेमसुद्धा बरीच लोकप्रिय ठरली होती. ट्रेलर लिंक : youtu.be/V5TMzD6Ngnk
Artemis II मोहिमेद्वारे नासाचे चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते चंद्राच्या कक्षेत जाऊन त्याला एक फेरी (flyby) करून परत येणार आहेत.
नियोजित वेळ : २ एप्रिल पहाटे ३:५४ वाजता (भारतीय वेळेनुसार)
लाईव्हस्ट्रीम लिंक : youtube.com/watch?v=Tf_UjBMI…
यावेळी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नसून त्यासाठी Artemis III नंतर नियोजित आहे. या मोहिमेत Reid Wiseman, Victor Glover, Christina Koch व Jeremy Hansen यांचा समावेश आहे.
Apollo 17 या १९७२ मोहिमेनंतर तब्बल ५३ वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राजवळ जाणार आहे! #NASA#ArtemisII#Moon