कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.