Pandharpur - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाचं खंडन
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ७३ कोटींच्या विकास आराखड्याचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मंदिर समिती फक्त देखरेखीची भूमिका पार पाडत आहे आर्थिक व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असल्याने कामामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप निराधार अपुऱ्या माहितीच्या आधारे केला गेला आहे असं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितले विकास आराखड्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजकीय नेत्याकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावकर महाराजांनी हे नमूद केले आहे .
.
#VitthalRukminiTemple #PandharpurNews #CorruptionAllegations #DevelopmentProject #MaharashtraNews