माणगाव बायपास हायवेची प्रत्यक्ष पाहणी!
📍 माणगाव बायपास, मुंबई-गोवा हायवे
🗓️ १३ जून २०२६
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या कायमची सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या माणगाव बायपास हायवेच्या कामाची आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणी दरम्यान सध्या सुरू असलेल्या कामाची गती तपासली असता, कंत्राटदारांना भेडसावणारी मुरुमाची टंचाई आणि जागेची अडचण तात्काळ दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सूचना दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांचा आणि स्थानिकांचा प्रवास सुखकर व वेळेची बचत करणारा व्हावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वी या बायपासची एक लेन कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा आमचा ठाम मानस आहे.
जर येत्या काळात पावसाने काही अडथळा निर्माण केला, तर पाऊस ओसरल्यानंतर तातडीने उर्वरित काम पूर्ण करून ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल. कोकणवासीयांना सुरक्षित, गतिमान आणि कोंडीमुक्त प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत.
या पाहणीदरम्यान शासकीय अधिकारी, संबंधित कंत्राटदार, स्थानिक नगरसेवक आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#MumbaiGoaHighway #DevelopmentWorks #MangaonBypass #Shivsena #BharatshethGogawale