महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गायरान फुलेवाडी, प्रभाग क्रमांक ९ येथे आयोजित कोपरा सभेस उपस्थित राहिलो. या वेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच युवक व महिलांसाठीच्या योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.
महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेत, भविष्यातही सातत्याने विकासाची गंगा या भागात पोहोचवण्याचे आश्वासन याप्रसंगी नागरिकांना दिले.
या प्रसंगी आमदार श्री. अमल महाडिक, शिवसेनेचे उमेदवार श्री. शारंगधर देशमुख, मा. संगीता संजय सावंत, भाजपचे उमेदवार श्री. विजयसिंह देसाई, मा. माधवी मानसिंग पाटील तसेच शिवसेना नेते श्री. हर्षल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
🗓️ १० जानेवारी २०२६ |📍गायरान फुलेवाडी, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #ConnectingWithPeople #developmentwithtrust #kolhapurprogress