राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आणि विविध समित्यांवरील नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना,
कार्यकर्त्यांना मिळालेली पदे ही जनतेच्या सेवेसाठी असतात. त्यामुळे शासनाच्या योजना तालुक्याच्या तळागळात पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
तसेच पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केल्यास शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचतील आणि यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. विजय बलुगडे, शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष श्री. जालिंदर पाटील, शिवसेना गट नेते श्री. अरुण जाधव, पंचायत समिती सदस्य श्री के.एल. पाटील, श्रीमती. मंगल कांबळे, श्री. अशोक फराकटे, श्री. दत्ताजी उगले, श्री. दीपक शेट्टी, तालुकाप्रमुख श्री. तानाजीराव चौगुले, युवा तालुकाप्रमुख श्री. मयूर पोवार, श्री. सुधाकर साळोखे, श्री. संग्राम पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. विलास डवर, श्री. अनिल बडदारे, श्री. अभिजीत हुपरीकर, श्री. संदीप चौगले, श्री. युवराज पाटील, श्री. मंगेश चौगले, श्री. सचिन पालकर, श्री. महेश अडसूळ, श्री. विश्वास आरडे, श्री. विजय मोहिते, श्री. शशिकांत बैलकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २४ मे २०२६ l 📍 राधानगरी
#Shivsena #prakashabitkar #karyakartamelava #grassrootdevelopment #PublicService