निराधारांना आधारासाठी आता वाट पाहावी लागणार नाही!
निराधार व्यक्तींना जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये आणि त्यांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राधानगरी तालुक्यातील तहसील विभागामार्फत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मंजूर लाभार्थ्यांना नरतवडे येथे मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या १८८, इंदिरा गांधी योजनेच्या ७७ व श्रावण बाळ योजनेच्या १०३६ अशा एकूण १३०१ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली.
याप्रसंगी राधानगरी प्रांत अधिकारी श्री. प्रसाद चौगुले, तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष श्री. अरुणराव जाधव, श्री. नंदकिशोर सूर्यवंशी, श्री. सुभाष पाटील, श्री. अजित देसाई, श्री. अशोक वारके, श्री. दादासो पाटील चंद्रे, श्री. रमेश घारे यांसह अनेक मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l📍नरतवडे, राधानगरी, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #WelfareSchemes #supportforneedy #GovernmentForPeople