Thanks to all the members of
@ProfCong who participated in today's event.
@ProfCong -MH worked with the economic wing of MPCC to discuss the onslaught of economic tsunami in India.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक भवन येथे "भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?" या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
आज देशासमोर उभी असलेली बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती आर्थिक विषमता आणि ढासळणारी बँकिंग व्यवस्था ही केवळ आर्थिक आव्हाने नसून सामाजिक अस्थिरतेची गंभीर कारणे बनत आहेत. त्यामुळे जात-धर्माच्या राजकारणाऐवजी देशाच्या आर्थिक प्रश्नांवर केंद्रित चर्चा आणि राजकारण होणे ही काळाची गरज असल्याची भूमिका यावेळी मांडली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री मा. श्री. यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक दाव्यांमधील विसंगती उघड करत विकास दराच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले, तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरुणकुमार यांनी वाढती आर्थिक विषमता, MSME क्षेत्राची झालेली पडझड, बेरोजगारी आणि आर्थिक धोरणांच्या परिणामांचे सखोल विश्लेषण केले.
या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सत्य, अहिंसा आणि जनआंदोलनाच्या मार्गाने देशात नव्या वैचारिक लढ्याची गरज असल्याचे यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास माजी केंद्रीय अर्थमंत्री मा. श्री. यशवंत सिन्हा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार मा. श्री. कुमार केतकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.